बुधवार, २१ जानेवारी, २०२६

पाटण तालुक्यात शिवसेनेचा रणसंग्राम — मंदुळकोळे व सणबुरमध्ये ‘शिवसेना पॅटर्न’चा जोरदार झंझावात! मंदुळकोळे–सणबुरमध्ये पारडे जड असल्याची चर्चा?

 पाटण तालुक्यात शिवसेनेचा रणसंग्राम — मंदुळकोळे व सणबुरमध्ये ‘शिवसेना पॅटर्न’चा जोरदार झंझावात! 

 मंदुळकोळे–सणबुरमध्ये पारडे जड असल्याची चर्चा?


पाटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ जाहीर होताच राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, शिवसेनेने उमेदवार जाहीर करताच तालुक्यात निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू झाली आहे. शिवसेनेने मंदुळकोळे व सणबुर परिसरात मजबूत आणि लोकसंपर्क असलेले उमेदवार मैदानात उतरवून विरोधकांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

🔶 मंदुळकोळे जिल्हा परिषद गटासाठी बनपुरीचे उद्योजक श्री. महेश पाटील यांची कन्या कु. मृणाल महेश पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महेश पाटील हे या संपूर्ण विभागात मोठ्या जनसंपर्कासाठी ओळखले जातात. सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कामांचा त्यांचा दांडगा अनुभव मृणाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. विशेष म्हणजे या परिसराला जिल्हा परिषद गटासाठी प्रथमच अशी सक्षम उमेदवारी मिळाल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शिवसेनेच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. त्यामुळे या गटात विरोधकांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

🔶 मंदुळकोळे पंचायत समिती गणासाठी मालदनचे युवा उद्योजक व समाजसेवक नितीन काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नितीन काळे यांची स्वच्छ प्रतिमा, तळागाळातील लोकांशी असलेला थेट संपर्क आणि शांत-संयमी स्वभाव ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. प्रत्येकाशी आपुलकीने वागणारा नेता अशी त्यांची ओळख असून, युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या गणात शिवसेनेची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे.

🔶 सणबुर पंचायत समिती गणासाठी सणबुरचे माजी उपसरपंच श्री. संदीप जाधव यांच्या पत्नी सौ. संपदा संदीप जाधव यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. गेली अनेक वर्षे संदीप जाधव हे सक्रिय राजकारणात असून त्यांचा दांडगा जनसंपर्क व संघटनात्मक ताकद या गणात निर्णायक ठरत आहे. याशिवाय पालकमंत्री ना. मा. श्री. शंभूराज देसाई यांनी या भागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून, रस्ते, पाणी व मूलभूत सुविधांच्या विकासामुळे शिवसेनेच्या कामाचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो. हाच विकासाचा मुद्दा शिवसेनेसाठी मोठा प्लस पॉईंट ठरत असून, सणबुर गणात शिवसेनेचे पारडे जड असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

 एकूणच या गणात शिवसेनेने उमेदवारांची निवड करत विकास, जनसंपर्क आणि संघटनशक्ती या त्रिसूत्रीवर भर दिला असून, आगामी निवडणुकीत शिवसेना आघाडीवर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांसाठी ही निवडणूक कठीण ठरण्याची चिन्हे आताच स्पष्ट दिसू लागली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...