बुधवार, २१ जानेवारी, २०२६

कुंभारगाव–काळगाव गणात तिरंगी सामना ? — अर्ज मागे घेतले नाहीत तर थेट महासंग्राम!

कुंभारगाव–काळगाव गणात तिरंगी सामना ? — अर्ज मागे घेतले नाहीत तर थेट महासंग्राम!

पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून कुंभारगाव–काळगाव गण सध्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) हे तिन्ही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने या गणात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे.

आज निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) गटाकडून श्री.संजय देेेसाई यांच्या नेेतृत्व व मार्गदर्शनाखालीअधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

🔹 कुंभारगाव–काळगाव जिल्हा परिषद गण
➡️ सौ. वैशाली संतोष पवार (रा. शेंडेवाडी)

🔹 पंचायत समिती कुंभारगाव गण
➡️ श्री. तुकाराम धुमाळ
➡️ श्री. बाबुराव हारूगडे

🔹 पंचायत समिती काळगाव गण
➡️ श्री. गणेश शिवाजी मोरे

दरम्यान, शिवसेना व राष्ट्रवादी (अजितदादा पवार) गटात संभाव्य युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन काका पाटील यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.

👉 ही चर्चा यशस्वी ठरली तर युती निश्चित, अन्यथा कुंभारगाव–काळगाव गणात तिरंगी लढत अढळ मानली जात आहे.
👉 अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच अंतिम चित्र स्पष्ट होणार असून तोपर्यंत राजकीय सस्पेन्स कायम राहणार आहे.

⚔️ एकूणच, पाटण तालुक्यातील ही निवडणूक केवळ स्थानिक न राहता, नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...