गुरुवार, २२ जानेवारी, २०२६

पाटण तालुक्यात निवडणूक रणधुमाळी!अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी – १४२ उमेदवार मैदानात, राजकीय तापमान शिगेला.



पाटण तालुक्यात निवडणूक रणधुमाळी!

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी – १४२ उमेदवार मैदानात, राजकीय तापमान शिगेला


पाटण, दि. २१ :
पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण अक्षरशः तापले होते. बुधवार, दि. २१ रोजी जिल्हा परिषद गटांसाठी ५० तर पंचायत समिती गणांसाठी ९२, असे एकूण १४२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोम्पे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत गुरव यांनी दिली.

शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते व उमेदवारांनी तहसील परिसरात मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशे, घोषणा, समर्थकांची गर्दी यामुळे परिसराला जणू निवडणुकीचा उत्सवच साजरा झाल्याचे चित्र होते.


नाराजी असूनही बंडखोरी आटोक्यात?

निवडणूक प्रक्रियेदरम्यान नाराजीचे सूर उमटले असले तरी उघड बंडखोरी फारशी दिसून आली नाही, असे सध्याचे चित्र आहे. मात्र अपक्ष उमेदवारांच्या वाढलेल्या संख्येमुळे अनेक गटांत लढती अटीतटीच्या होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


जिल्हा परिषद गट – ५० उमेदवार रिंगणात

जिल्हा परिषदेसाठी विविध गटांतून खालीलप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत –

सविस्तर बातमी - कुमजाई पर्व न्यूज

  • गोकुळ तर्फ हेळवाक – १३
  • म्हावशी – ९
  • काळगाव – ८
  • मल्हारपेठ – ६
  • मंद्रुळकोळे – ६
  • तारळे – ४
  • मारूल हवेली – ४

➡️ एकूण ५० उमेदवारांनी जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केले आहेत.


पंचायत समिती – सर्वाधिक चुरस, ९२ उमेदवार मैदानात

पंचायत समिती निवडणुकीसाठी तर खऱ्या अर्थाने राजकीय रणसंग्राम सुरू झाल्याचे चित्र आहे. विविध गणांतून दाखल झालेले अर्ज –

  • गोकुळ तर्फ हेळवाक – १०
  • काळगाव – १०
  • मंद्रळकोळे – ९
  • येराड – ७
  • मल्हारपेठ – ७
  • नाटोशी – ७
  • मुरूड – ६
  • नाडे – ६
  • मारूल हवेली – ६ 
  • कुंभारगाव – ६
  • म्हावशी – ५
  • चाफळ – ५
  • सणबूर – ५
  • तारळे – ३
  • सविस्तर बातमी - कुमजाई पर्व न्यूज

➡️ एकूण ९२ उमेदवारांनी पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केले आहेत.


आज छाननी, त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार

आज गुरुवार, दि. २२ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून त्यानंतरच वैध व अवैध अर्जांचे चित्र स्पष्ट होईल. तसेच अर्ज माघारीच्या टप्प्यानंतरच निवडणुकीतील खरे राजकीय गणित समोर येणार आहे.

सध्या तरी सर्व प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार तयारी करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाटण तालुक्यातील राजकारण आणखी तापणार हे मात्र निश्चित!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...