गुरुवार, २२ जानेवारी, २०२६

*कराड–पाटणमध्ये घरफोड्या व शेतीपंप चोऱ्यांचा पर्दाफाश**पोलिसांचा धडाका : दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळत 10 गुन्हे उघड, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त*

*कराड–पाटणमध्ये घरफोड्या व शेतीपंप चोऱ्यांचा पर्दाफाश*

*पोलिसांचा धडाका : दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळत 10 गुन्हे उघड, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त*


कराड व पाटण तालुक्यातील घरफोड्या तसेच शेतीपंप चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना पोलीसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन सराईत चोरट्यांना अटक करून तब्बल 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या टोळींकडून सुमारे 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गणेश दिलीप जाधव (वय 30, रा. उंब्रज, ता. कराड) आणि अमोल लालासो शेळके (वय 36, रा. ढेबेवाडी, ता. पाटण) अशी असून, त्यांनी कराड शहर, कराड तालुका, मसुर, कोयनानगर आणि पाटण परिसरात घरफोड्या व शेतीपंप चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घरफोडीतील काही संशयित कोळेवाडी येथील एका बारमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. संशयास्पद हालचाली करत असलेल्या दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.

पोलिस कोठडीत सखोल चौकशीदरम्यान आरोपींनी एकूण 10 चोऱ्या केल्याचे उघड केले. त्यांच्या ताब्यातून चोऱ्यांसाठी वापरलेले वाहन, हत्यारे, तसेच 4 तोळे सोने, चांदीसह एकूण 8 लाख 86 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे. या कारवाईमुळे कराड–पाटण परिसरातील चोरट्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...