संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६
मंदुळकोळे गटात शिवसेनेचा झंझावाती प्रचार! गणेश जयंतीनिमित्त गणेश दर्शन ते थेट जनसंवाद—धनुष्यबाणाची ताकद गावोगावी.!
मंदुळकोळे गटात शिवसेनेचा झंझावाती प्रचार! गणेश जयंतीनिमित्त गणेश दर्शन ते थेट जनसंवाद—धनुष्यबाणाची ताकद गावोगावी.
मंदुळकोळे जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार कु. मृणाल महेश पाटील आणि पंचायत समितीसाठी श्री. नितीन दत्तात्रय काळे यांनी गणेश जयंतीच्या पावन पर्वावर प्रचाराला वेग देत संपूर्ण परिसरात शिवसेनेचा आक्रमक आणि लोकाभिमुख चेहरा समोर आणला.
पानवळवाडी मालदन, उमरकांचन, पाटील आवाड, शितपवाडी, अंबवडे, बनपुरी आदी गावांतील गणेश मंदिरांत दर्शन घेत प्रचाराची सुरुवात करत, अनेक ठिकाणी भेटी देऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला.
या दौऱ्यात विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेशी नाळ या मुद्द्यांवर भर देत दोन्ही उमेदवारांनी मतदारांना साद घातली. “येणाऱ्या ५ फेब्रुवारी रोजी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा” असे ठाम आणि थेट आवाहन यावेळी करण्यात आले. गावोगावी मिळालेल्या प्रतिसादामुळे शिवसेनेच्या विजयाची चाहूल लागल्याचे दोन्ही उमेदवारांनी सांगितले.
प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन दोन्ही उमेदवारांचा उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला.
या वेळी बनपुरीचे उद्योजक महेश पाटील, ढेबेवाडी विभागाचे नेते मनोज मोहिते बापू, रणजित पाटील तात्या, अंकुश महाडिक दादा, पाटण बाजार समितीचे संचालक जोतिराज काळे, संदीप जाधव आबा, राहुल दादा पेंढारकर, उद्योजक प्रविण कदम, सचिन पाटील, सुधीर नाना हारूगडे, अमित पाटील, आनंदा भालेकर, सुनील पाटील आदी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, गणेश जयंतीच्या मंगलमय वातावरणात झालेला हा दौरा म्हणजे मंदुळकोळे गटात शिवसेनेच्या विजयाचा शंखनाद ठरला असून, धनुष्यबाणाच्या निशाण्यावर विश्वास टाकत जनता निर्णायक कौल देणार असल्याचे चित्र ठामपणे दिसत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार
ढेबेवाडी प्रतिनिधी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा