बुधवार, २१ जानेवारी, २०२६

काळगाव–कुंभारगावात भाजपचा निर्णायक एल्गार! रणशिंग फुंकले… ‘कमळ’ विजयासाठी सज्ज — विकासाची सत्ता आता भाजपचीच!

काळगाव–कुंभारगावात भाजपचा निर्णायक एल्गार! रणशिंग फुंकले… ‘कमळ’ विजयासाठी सज्ज — विकासाची सत्ता आता भाजपचीच! 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणात भारतीय जनता पार्टीने आक्रमक आणि निर्णायक पवित्रा घेत विजयाचा संकल्प जाहीर केला आहे. काळगाव जिल्हा परिषद गट तसेच कुंभारगाव व काळगाव पंचायत समिती गणात भाजपने विकासाचे नेतृत्व मैदानात उतरवत विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.

शक्ती प्रदर्शनासाठी नव्हे, तर विकासाच्या निर्धारासाठी!
या ब्रीदवाक्यासह भाजप एकदिलाने एकत्र आला असून, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, प्रशासनाची सखोल जाण असलेले आणि कामातून ओळख निर्माण केलेले कर्तृत्ववान उमेदवार भाजपने उभे केले आहेत.

भाजपचे रणधुरंधर उमेदवार मैदानात 

🔹 श्री. रमेश विठ्ठल मोरे (बापू)कुंभारगाव पंचायत समिती गण
🔹 श्री. अनिल हरी डाकवे (साहेब)काळगाव पंचायत समिती गण
🔹 सौ. प्राजक्ता भरत पाटीलकाळगाव जिल्हा परिषद गट

या तिन्ही उमेदवारांनी आज अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपच्या विजयाचा रणशंख फुंकला. अर्ज दाखल होताच परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली, तर विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरल्याचे चित्र दिसत आहे.

🚜 विकासाचा अजेंडा — कामाची ग्वाही!

काळगाव–कुंभारगाव परिसरात रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, शेतीपूरक सुविधा, रोजगारनिर्मिती आणि मूलभूत विकासकामांसाठी ठोस नियोजन, पारदर्शक कारभार आणि वेगवान अंमलबजावणी हीच भाजपची ओळख आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा थेट लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या उमेदवारांनी व्यक्त केला आहे.


👉 गुरुवार, दि. ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटन दाबा
👉 भाजपच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा
👉 आणि काळगाव–कुंभारगावच्या विकासाला अभूतपूर्व गती द्या! असे आवाहन उमेदवारांनी यावेळी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...