संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शुक्रवार, २ जानेवारी, २०२६
शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश; आयु. आदित्यनाथ माने (पपू दादा) यांची पाटण तालुका युवाध्यक्षपदी निवड.
शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश; आयु. आदित्यनाथ माने (पपू दादा) यांची पाटण तालुका युवाध्यक्षपदी निवड.
पाटण | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली असून शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते मा. आयु. आदित्यनाथ माने (पपू दादा) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश खासदार मा. नितिन काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सातारा जिल्हा कार्याध्यक्ष मा. संजय देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
याच वेळी आदित्यनाथ माने यांची पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) युवाध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे पाटण तालुक्यातील पक्ष संघटन अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना मा. संजय देसाई साहेब यांनी आदित्यनाथ माने यांच्या सामाजिक, संघटनात्मक कार्याचा विशेष उल्लेख करत, युवकांना सोबत घेऊन पक्ष वाढवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असल्याचे सांगितले. तर खासदार मा. नितिन काका यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवकांना मोठी संधी असल्याचे नमूद केले.
यावेळी आदित्यनाथ माने यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले,
“आदरणीय संजय देसाई साहेब यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, ती मी पूर्ण ताकदीने व प्रामाणिकपणे पार पाडेन. पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन, पक्षाची एकजूट व वाढ यासाठी सातत्याने काम करेन.”
यावेळी पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) श्री विक्रमबाबा पाटणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदित्यनाथ माने यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्यात पक्ष संघटनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...
-
ढेबेवाडी - राजकीय वारसा, जनतेचा कौल आणि शिवसेनेची ताकद!मंद्रुळकोळे जि. प. गणात कु.मृणाल महेश पाटील यांना उमेदवारी, पाटण तालुक...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा