मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

कॉलेजमधून थेट कॉर्पोरेटरपर्यंतची झेप!अवघ्या 21 व्या वर्षी रचना गवस मुंबई महापालिकेच्या रणांगणात.



कॉलेजमधून थेट कॉर्पोरेटरपर्यंतची झेप!अवघ्या 21 व्या वर्षी रचना गवस मुंबई महापालिकेच्या रणांगणात.

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम पेटला असून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांनी प्रचारात संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार रस्त्यावर उतरले असताना मुंबई महापालिकेच्या राजकारणात मात्र एका नावाने संपूर्ण चित्र बदलून टाकले आहे.

अवघ्या 21 वर्षांची रचना रवींद्र गवस — कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच थेट मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरल्याने ती सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने प्रभाग क्रमांक 143 मधून सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून रचना गवस हिच्यावर विश्वास टाकत, तरुणाईच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

तरुणाईचा जल्लोष, अनुभवाची साथ

रचना गवस ही केवळ वयाने तरुण, तर विचारांनीही आक्रमक असल्याचे प्रचारादरम्यान दिसून येत आहे. कॉलेज, अभ्यास, वकिलीचे शिक्षण आणि त्याच वेळी प्रचंड वेगाने सुरू असलेला प्रचार — या सगळ्यामुळे रचना गवस ही “तरुण नेतृत्वाचं नवं प्रतीक” म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

वडिलांचा जनसंपर्क, मुलीची उमेद

रचनाच्या पाठीशी उभा असलेला राजकीय किल्ला दुर्लक्षित करता येणार नाही. तिचे वडील रवींद्र गवस हे अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून माजी शाखा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, विधानसभा निवडणूक संयोजक अशा जबाबदाऱ्या पार पाडत आले आहेत.
त्यांचा प्रचंड जनसंपर्क आणि संघटनात्मक ताकद हीच रचना गवससाठी सर्वात मोठी राजकीय शिदोरी ठरत असल्याचे बोलले जात आहे.

नवाब मलिक – सना मलिक शेख यांची ताकद मैदानात

राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे माजी मंत्री नवाब मलिक आणि अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सना मलिक शेख यांची राजकीय ताकद, त्यात रवींद्र गवस यांचा जमिनीवरचा संपर्क — यामुळेच वार्ड 143 मध्ये समीकरणे झपाट्याने बदलत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मुंबईची सर्वात तरुण नगरसेविका ठरणार का?

कॉलेजमध्ये शिकणारी, कायद्याचे शिक्षण घेणारी आणि थेट महापालिकेची निवडणूक लढवणारी रचना गवस — हा केवळ उमेदवार नाही, तर मुंबईच्या राजकारणातील बदलाचा इशारा मानला जात आहे.
मुंबईकर या तरुण चेहऱ्यावर विश्वास टाकून तिला नगरसेवकपदाची संधी देतात का, आणि रचना गवस मुंबईची सर्वात तरुण नगरसेविका ठरते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...