संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
गुरुवार, ४ डिसेंबर, २०२५
कामोठे परिसरातील हायप्रोफाईल ‘प्रतीक जेम्स’ सोसायटीत घडलेल्या तब्बल २८ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा धक्कादायक खुलासा.
कामोठे (पनवेल) – शहरालगतच्या कामोठे परिसरातील हायप्रोफाईल ‘प्रतीक जेम्स’ सोसायटीत घडलेल्या तब्बल २८ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा धक्कादायक खुलासा अखेर कामोठे पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे ही चोरी कोणत्याही बाहेरील चोरट्यांनी नव्हे, तर थेट सोसायटीच्या चेअरमन मोनिका दिघे यांनीच केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून चोरीचा शंभर टक्के मुद्देमाल जप्त केला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
दि. १६ सप्टेंबर रोजी प्रतीक जेम्स सोसायटीमधील म्हसकर कुटुंबाच्या घरातून सुमारे २८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. सुरुवातीला अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सोसायटीत आणि परिसरात खळबळ उडाली होती.
मात्र तपास जसजसा पुढे जात गेला, तसतसे संशयाचे बोट अधिकाधिक सोसायटीतीलच एका व्यक्तीकडे वळू लागले – आणि ती व्यक्ती होती सोसायटीची चेअरमन मोनिका दिघे!
CCTV डिलीट… पण चुकूनच मिळाला पुरावा
चोरी लपवण्यासाठी मोनिका दिघे यांनी सोसायटीतील जवळपास १० मिनिटांचे CCTV फुटेज डिलीट केले होते. मात्र स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याच्या नादात त्यांनीच पोलिसांना जे फुटेज दिले, त्याच फुटेजमुळे त्यांचा गुन्हा उघडकीस आला.
तांत्रिक तपासात फुटेजमध्ये छेडछाड (एडिटिंग/डिलिटींग) केल्याचे ठोस पुरावे पोलिसांना मिळाले. त्यानंतर सीसीटीव्ही डेटा, टाइम-स्टॅम्प आणि हालचालींची बारकाईने पडताळणी केल्यानंतर दिघे यांच्यावर संशय अधिक बळावला.
बँक स्टेटमेंटमध्ये फेरफाराचा प्रयत्न
फक्त सीसीटीव्हीच नव्हे, तर मोनिका दिघे यांनी त्यांच्या बँक स्टेटमेंटमधील काही एन्ट्री एडिट करण्याचाही प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. आर्थिक व्यवहार लपवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांचा संशय अधिक गडद झाला.
त्यानंतर तांत्रिक पुरावे, आर्थिक व्यवहारांचा मागोवा आणि चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीतील संपूर्ण सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
चोर असूनही पीडितांसोबत जेवायला!
या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे – दिघे यांनी दागिने चोरल्यानंतर त्याच म्हसकर कुटुंबासोबत जेवणालाही गेल्या होत्या. चोरच मालकाच्या जवळ बसून सहानुभूती दाखवत असल्याचे हे धक्कादायक चित्र आहे.
समाजात खळबळ, नागरिकांमध्ये नाराजी
या घटनेमुळे संपूर्ण सोसायटीत आणि कामोठे परिसरात संतापाचे वातावरण आहे. सोसायटीच्या जबाबदार पदावर असलेली व्यक्तीच गुन्हेगार निघाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.
“आजकाल कोणावर विश्वास ठेवायचा, हा खरा प्रश्न आहे. ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, त्यांच्या मनातच कुठे काय सुरु असतं हे सांगता येत नाही,” अशी प्रतिक्रिया एका रहिवाशाने व्यक्त केली.
पोलीसांचे कौतुकास्पद काम
कामोठे पोलिसांनी सांगितले की हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता. परंतु अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही तपास आणि आर्थिक चौकशीमुळे सत्य समोर आले. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयामुळे गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले.
सध्या आरोपी मोनिका दिघे पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...
-
ढेबेवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ गवत कापणाऱ्या महिलेवर अचानक झडप; हाताला गंभीर दुखापत. ढेबेवाडी (ता. पाटण) : तालुक्यातील भालेकरवाडी (बनप...
-
ढेबेवाडी - राजकीय वारसा, जनतेचा कौल आणि शिवसेनेची ताकद!मंद्रुळकोळे जि. प. गणात कु.मृणाल महेश पाटील यांना उमेदवारी, पाटण तालुक...
-
ढेबेवाडी खोऱ्यात अंगावर काटा आणणारा थरार! एसटी बससमोरच ‘तारा’ वाघिणीचा रस्त्यावर अवतार. |साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी ढेबेवाडी - पाट...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा