शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५

*पाटण पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा फडकणार – भरत पाटील.* *मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातील भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न..*

ाटण पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा फडकणार – भरत पाटील मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातील भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न.
ढेबेवाडी (ता. पाटण) | कुमजाई पर्व न्यूज नेटवर्क आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा ढेबेवाडी, ता. पाटण येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात भाजपने तालुक्यात पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून निश्चितपणे विजय मिळवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला गेला. यावेळी बोलताना राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक भरत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत म्हटले, “जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक कधीही लागूद्या, भारतीय जनता पक्ष ही निवडणूक ताकदीने लढणार आणि जिंकणारही. आमचे पैलवान लढायला तयार आहेत, पण विरोधकांना अजून उमेदवारही सापडत नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला. मेळाव्यास माजी शेती सभापती हिंदुराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष गणेश यादव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिपकराव महाडीक, प्रतापराव देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. भरत पाटील पुढे म्हणाले की, “या मतदारसंघात भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्याचे नेते सत्यजितसिंह पाटणकर भाजपाच्या प्रवाहात सहभागी झाल्यानंतर पाटण तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली असून येणाऱ्या निवडणुकीत याचा थेट फायदा भाजपाला होणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “गेल्या निवडणुकीत हिंदुराव पाटील आणि मी एकमेकांच्या विरोधात लढलो होतो. मात्र आज आम्ही सर्वजण भाजपाच्या झेंड्याखाली एकत्र आलो आहोत. आता भाजप देईल त्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तसेच माजी शेती सभापती हिंदुराव पाटील म्हणाले, “पाटण तालुका आता परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. आपण सर्वांनी जुना-नवा भेदभाव विसरून भाजप म्हणून एकत्रित काम केले, तर विकासाची नवी दिशा या भागाला मिळेल.” या मेळाव्यात मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीच्या सदस्या प्रमिला पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिपक महाडीक (महाड), अभिजित पाटील, नितीन पाटील, तुकाराम जाधव, रामचंद्र मत्रे यांनीही आपली भाषणे केली. मेळाव्याचे प्रास्ताविक सचिन जाधव यांनी केले, सूत्रसंचालन अभिजित कडव यांनी केले, तर अंकुश मोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...