बुधवार, ३ डिसेंबर, २०२५

मानखुर्द - महिलांच्या आरोग्यासाठी शिवसेनेचा मायेचा हात – प्रभाग क्रमांक १४३ मध्ये मोफत महिला आरोग्य शिबिर यशस्वी.

मानखुर्द - महिलांच्या आरोग्यासाठी शिवसेनेचा मायेचा हात – प्रभाग क्रमांक १४३ मध्ये मोफत महिला आरोग्य शिबिर यशस्वी मुंबई | मानखुर्द प्रतिनिधी :
महिलांच्या आरोग्य रक्षणासाठी आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने शिवसेना प्रभाग क्रमांक १४३ मधील माझ्यासह सर्व शिवसैनिकांच्या संकल्पनेतून भव्य मोफत महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर अत्यंत यशस्वीपणे पार पडले असून मोठ्या संख्येने महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये महिलांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि आवश्यक असलेल्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. त्यामध्ये गर्भाशयमुख कर्करोग तपासणी , स्तन तपासणी , रक्तदाब तपासणी यांचा समावेश होता. अनेक महिलांना या शिबिरातून आजाराची प्राथमिक लक्षणे ओळखण्याचे मार्गदर्शन मिळाले, तसेच नियमित तपासणीचे महत्त्व समजले. “प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार” हा संदेश उपस्थितांना प्रभावीपणे देण्यात आला. या समाजोपयोगी उपक्रमासाठी शिवसेना उपनेते तथा खासदार मा. राहुल शेवाळे साहेब आणि मा. नगरसेविका सौ. कामिनी शेवाळे वहिनी यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले. त्यांच्या प्रेरणेतूनच हा उपक्रम अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणामकारक ठरला. तसेच रिलायन्स फाउंडेशनच्या तज्ज्ञ वैद्यकीय टीमने या शिबिरात महिलांना योग्य वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन दिले. या टीममध्ये आशा बनकर (सोशल वर्क) डॉ. मैथिली सावंत,ज्योत्स्ना पाटील,वर्षा भालेराव,अनिरुद्ध जामसंडेकर यांचा समावेश होता. उपस्थित तज्ञ डॉक्टरांनी महिलांना विविध आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व अत्यंत सुलभ आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगितले. त्यांच्या सेवाभावाचे उपस्थित महिलांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, महिला शाखा प्रमुख सौ. प्रेरणा खरात, माजी नगरसेविका सौ.ऋतुजा तारी शाखा समन्वयक, उपशाखा प्रमुख, महिला व पुरुष गटप्रमुख तसेच विभागातील सर्व महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. सर्वांच्या एकजुटीमुळे आणि मेहनतीमुळेच हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. यावेळी बोलताना शाखा प्रमुख श्री. नवनाथ मतकर व महिला शाखा प्रमुख सौ. प्रेरणा खरात यांनी सांगितले की, “शिवसेना म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी अखंडपणे काम करणारी संघटना आहे. महिलांचे आरोग्य सुरक्षित असेल तर कुटुंब, आणि पर्यायाने समाज सुदृढ राहतो. अशाच समाजोपयोगी उपक्रमांची मालिका पुढेही सुरू राहणार आहे.” या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढीस लागली असून शिवसेनेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...