मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

गुरुवारी पाटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक.

 गुरुवारी पाटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक.



पाटण प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढण्यात आली आहे. ही यात्रा सोमवार दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी पाटण विधानसभा मतदारसंघ धडकणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ही यात्रा पाटणमध्ये दाखल होणार आहे. या यात्रेचे  नियोजन करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची नियोजन बैठक गुरुवार दि. ३ सप्टेंबर रोजी पाटण येथील सरदार पाटणकर वाड्यातील श्रीराम मंदिर येथे दुपारी १ वा. होणार आहे. अशी माहिती पक्षाचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. तरी या बैठकीस पक्षाचे सर्व आजी/माजी पदाधिकारी,  जि.प.सदस्य,  पं.स.सदस्य, सर्व संस्थाचे चेअरमन, व्हॉ. चेअरमन, संचालक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक/नगरसेविका, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...