ढेबेवाडी पोलीस ठाणे हददीतील नागरीकांचे गहाळ हरवलेले एकूण 3,60,000/- रुपये किंमतीचे एकूण 23 मोबाईल हस्तगत करुन मुळ मालकांना परत (ढेबेवाडी पोलीसांची उल्लेखनीय कामगीरी)
ढेबेवाडी पोलीस ठाणे हददीतील नागरीकांचे गहाळ हरवलेले मोबाईल यांची शोध मोहिम राबविने बाबत मा.श्री समिर शेख मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुशंगाने ढेबवाडी पालीस ठाणेचे सपोनि दाईंगडे यांनी नागरीकांचे मोबाईल शोध घेणे कामी पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना सुचना देण्यात आल्या होत्या त्या प्रामाणे पथकातील पोलीस अमंलदार यांनी सीईआयआर पोर्टल व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे हरवलेल्या मोबाईल बाबतची माहिती प्रात्प करुन चिकाटीने व अथक परिश्रम करुन सदर ची मोहीम राबविल्याने ढेबेवाडी पोलीस ठाणे हददीतून नागरीकांचे हरवलेले
गहाळ झालेले एकून 3,60,000/- रुपये किंमतीचे एकून 23 मोबाईल हस्तगत करणेत यश आलेले आहे. आज दि.04/10/2024 रोजी सपोनि दाईगडे ढेबेवाडी पोलीस ठाणे यांचे हस्ते मूळ तक्रार दारांना त्यांचे मोबाईचे परत करणेत आले. अशाच प्रकारे सातत्याने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि दाईगड यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई मा. समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. विजय पाटील सो पोलीस उपअधिक्षक सो पाटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि दाईगडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. भोसले. पो. हवा.283 मुळगावकर, पो हवा. 1409 कुंभार, पो हवा 1969 माने, मपोना 2353 दोडके, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस कॉस्टेबल श्री महेश पवार, पोलीस कॉस्टेबल श्री शिवाजी आवळे, पोलीस कॉस्टेबल मानिक पाटील, पोलीस कॉस्टेबल गणेश किर्वे, पोलीस कॉस्टेबल अशोक निकम, पोलीस कॉस्टेबल सौरभ कांबळे मपोकों अश्विनी माने यांनी केलेली आहे.
Nice work
उत्तर द्याहटवा