पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून विविध विकास कामांसाठी 4 कोटी 84 लक्ष रुपयांचा निधी.
स्थानिक व डोंगरी विकास निधी,लघु पाटबंधारे,स्मशानभूमी,क वर्ग तिर्थक्षेत्र व नागरी सुविधांची कामे लागणार मार्गी.
पाटण दि.01:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील असणारी नागरी सुविधांची कामे तातडीने मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी स्थानिक व डोंगरी विकास निधी,लघु पाटबंधाऱ्यांची कामे,स्मशानभूमी,क वर्ग तिर्थक्षेत्र विकास व नागरी सुविधांची कामे सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये प्रस्तावित केली होती. त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 4 कोटी 84 लक्ष 46 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांत विकासाची कामांसाठी निधी होण्यासाठी संबंधित गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांना भेटून मागणी केली होती.त्या-त्या गावातील महत्त्वाची असलेली विकास कामांना निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ही कामे स्थानिक व डोंगरी विकास निधी,लघु पाटबंधाऱ्यांची कामे,जनसुविधा योजना,क वर्ग तिर्थक्षेत्र विकास व नागरी सुविधा योजना या योजनांमधून सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये प्रस्तावित केली. त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 4 कोटी 84 लक्ष 46 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून स्थानिक विकास निधीमधून वजरोशी वाकेश्वर मंदिर रस्ता 20 लक्ष, मेंढोशी वरची अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लक्ष, मोळावडेवाडी (कुठरे) येथे मारुती मंदिरासमोर सभामंडप 13 लक्ष, पाळशी सावंतवस्ती येथे सभामंडप 13 लक्ष, कराटे हनुमान मंदिर सभामंडप 13 लक्ष, ढोरोशी येथे सभामंडप 13 लक्ष, पाडळी येथे मुस्लिमवस्ती मध्ये शादीखाना 20 लक्ष, बेलदरे येथे रामोशी समाज सभामंडप 13 लक्ष, येरफळे बौध्दवस्तीमध्ये सभामंडप 13 लक्ष या कामांसाठी 01 कोटी 28 लाख तर डोंगरी विकास निधीतून मौजे साकुर्डी अंतर्गत रस्ता सुधारणा 8.28 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लघु पाटबंधारे विभागांतर्गत शेतीच्या पाण्याची सोय होण्यासाठी वन येथे साठवण हौद व शेतीसाठी पाण्याचा आडवा पाट 18.93 लक्ष, कळकेवाडी कुसरुंड येथे साठवण हौद व शेतीसाठी पाट 15.76 लक्ष, आचरेवाडी नं.2 येथील ग्रामतलाव दुरुस्ती 8.06 लक्ष, पाठवडे येथे शेतीसाठी आडवे पाट 15 लक्ष, पळासरी कुसवडे येथे साठवण हौद व शेतीसाठ पाण्याचे पाट 18 लक्ष, माईंगडेवाडी जिंती येथे वळण बंधारा दुरुस्ती व पाट पाईप लाईन 14.19 लक्ष, बाटेवाडी पाठवडे येथे शेतीचे आडवे पाट 15.04 लक्ष, दिक्षी थोरला ओढा येथे वळण बंधारा दुरुस्ती व पाट पाईप लाईन 15 लक्ष, येराड केळीचा ओढा येथे वळण बंधारा व पाट पाईप लाईन 19.20 लक्ष या कामांसाठी एकूण 1 कोटी 39 लक्ष 18 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.तर क वर्ग तिर्थ क्षेत्र विकास योजनेमधून येराड येथे श्री येडोबा मंदिर परिसरात बाग बगीचासह सुधारणा 15 लक्ष, येराडवाडी येथे श्री रुद्रेश्वर मंदिर परिसर सुधारणा 10 लक्ष, विहे येथे श्री जोतिर्लिंग मंदिर परिसर सुधारणा 10 लक्ष या कामांसाठी एकूण 35 लक्ष तर मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्याच्या कामांमध्ये तांबवे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, मल्हारपेठ दिंडुकलेवाडी वार्ड क्र. 3 अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, मंद्रुळकोळे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, मल्हारपेठ येथे सातामा भाजी मंडई ते पवारआळी रस्ता सुधारणा 10 लक्ष, मल्हारपेठ येथे महादेव वार्ड क्र. 1 मधील अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लक्ष, मल्हारपेठ येथे कराड चिपळूण रोड ते प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता 5 लक्ष व विहे येथे गावांतर्गत रस्ता 5 लक्ष असा एकूण 90 लक्ष रुयांचा निधी मंजूर झाला आहे. तर जनसुविधा योजने अंतर्गत विविध गावांतील स्मशानभूमींच्या कामांमध्ये मोडकवाडी जिंती स्मशानभूमी शेड व निवारा शेड 4 लक्ष, आंबळे येथे स्मशानभूमी 4 लक्ष, धनगरवाडी तारळे येथे स्मशानभूमी 4 लक्ष, राहुडे येथे स्मशानभूमी 4 लक्ष, केळेवाडी खालची कडवे येथे स्मशानभूमी 4 लक्ष, नाणेगाव खुर्द स्मशानभूमी 4 लक्ष, माथणेवाडी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, आटोली स्मशानभूमी 4 लक्ष, सातेवाडी नाटोशी येथे स्मशानभूमी 4 लक्ष, कुसरुंड येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, दिवशी खुर्द स्मशानभूमी 4 लक्ष, खाडेकरवाडी सोनवडे स्मशानभूमी 4 लक्ष, शिंदेवाडी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, नवीवाडी जिंती येथे स्मशानभूमी 4 लक्ष, शिद्रुकवाडी काढणे स्मशानभूमी 4 लक्ष, मराठवाडी वरची स्मशानभूमी 4 लक्ष, किल्ले मोरगिरी स्मशानभूमी 4 लक्ष, मळा काढोली स्मशानभूमी 4 लक्ष, मणेरी स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, बेलवडे खुर्द स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, घोट स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष या 21 स्मशानभूमींचे कामांसाठी 84 लक्ष असा एकूण 4 कोटी 84 लक्ष 46 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा