संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१
तळमावळे : राजेसंघर्ष प्रतिष्ठान कडून जि. प शाळा वाझोली येथे पाहणी.:
तळमावले : सतिष वाघ यांना कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार प्रदान
*कराड : इंदिरा गांधी व सरदार पटेल यांच्या स्मृतिदिनी काँग्रेसच्या वतीने अभिवादन सभा*
कुंभारगाव : माणुसकीने उजळली वंचितांची दिवाळी गोजाई फौंडेशन व ग्रामविकास मंडळ गलमेवाडी मुंबई यांच्याकडून दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप
कुंभारगाव :माणुसकीने उजळली वंचितांची दिवाळी गोजाई फौंडेशन व ग्रामविकास मंडळ गलमेवाडी मुंबई यांच्याकडून दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप
गलमेवाडी : कुंभारगाव ता.पाटण - भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि उज्वल सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक आहे. हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे, दागिने, फराळ या गोष्टींबरोबर हा सण साजरा करतात. पण समाजात काही कुटुंब अशी आहेत कि ते केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे सण साजरा करू शकत नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन गोजाई फौंडेशन व ग्रामविकास मंडळ गलमेवाडी मुंबई यांच्या वतीने दिवाळीत मोफत फराळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काल शनिवारी दि.30 रोजी त्यांनी समाजातील गरजू व गरीब कुटुंबांना मोफत फराळ वाटप करण्यात आले. याप्रकारे त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण देण्याचा आमचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होतो असे संपत यशवंत चोरगे यांनी सांगितले यावेळी 60 कुटुंबाना फराळाचे वाटप करण्यात आले. अतिशय कौटुंबिक स्वरूपाच्या समारंभात हे फराळ वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोजाई फौंडेशन व ग्रामविकास मंडळ गलमेवाडी मुंबई मधील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली यावेळी गलमेवाडीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सर्वांनी संस्थेचे अभिनंदन केले.
ढेबेवाडी : सहा हातबॉम्ब सह तीन शिकारी अटकेत : दोन रानडुक्करांचा मृत्यू
या प्रकरणात एकूण पाच सशयितांचा समावेश आहे. जागोजागी ठेवलेले हात बॉम्ब दाखवताना त्यातील दोघे अंधाराचा गैरफायदा उठवत पसार झाले असून तिघांना वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे
याबाबत वनपाल सुभाष राऊत दिलेल्या माहितीनुसार,काल दि.30 च्या रात्री ढेबेवाडी वनक्षेत्रातील भोसगाव वनकक्ष क्रमांक ५५३ मध्ये शिकारी टोळी हात बॉम्ब गोळ्याच्या साह्याने रानडुकरांची शिकार करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता त्या परिसरात सापळा रचला,शिकाऱ्यांचा अचूक माग काढत वनविभागाची टीम तेथे पोहचताच संशयित शिकारी आढळून आले.त्यावेळी त्यांच्याकडून शिकारीसाठी तयार केलेले सहा हातबॉम्ब व दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात एकूण पाच सशयितांचा समावेश आहे.
जागोजागी ठेवलेले हात बॉम्ब दाखवताना त्यातील दोघे अंधाराचा गैरफायदा उठवत पसार झाले असून तिघांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे व पळून गेलेल्या संशयितांचा वनविभागाकडून काल रात्रीपासून शोध सुरू आहे. उपवनसंरक्षक एम.एन मोहिते,सहायक वनसंरक्षक महेश झाजुरणे यांच्या मार्गदर्शनानुसार वनक्षेत्रपाल एल.व्ही पोतदार,वनपाल सुभाष राऊत,वनरक्षक जयवंत बेंद्रे,विशाल डुबल,सुभाष पाटील,सुरेश सुतार,अमृत पन्हाळे,नथुराम थोरात,अनिकेत पाटील,अजय कुंभार आदींनी ही कारवाई केली. सशयितांवर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्यांना पाटण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१
*मुंबई : पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी साहित्य मुंबई पोलीस कल्याण निधीतून; राज्य शासनातर्फे नाही – मुंबई पोलिसांचा खुलासा*
पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी साहित्य मुंबई पोलीस कल्याण निधीतून; राज्य शासनातर्फे नाही – मुंबई पोलिसांचा खुलासा
मुंबई दि. 30- मुंबई शहर पोलीस दलातील कार्यरत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित्त शुभेच्छापत्र, दिवाळी फराळ, मिठाई आणि छोटीशी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. या दिवाळी शुभेच्छा खर्चासाठी मुंबई पोलीस कल्याण निधीचा वापर करण्यात येतो. ही योजना राज्य शासनाची नसून पूर्णतः पोलीस कल्याण निधीची योजना आहे. यंदा मुंबई पोलिसांकरिता कार्यरत असलेल्या 6 पोलीस कॅन्टीनमध्ये दिवाळीसाठी आवश्यक साहित्यावर 750/- रुपये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.
पोलीस कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, प्रोत्साहन, विविध अधिकारी कर्मचारी सत्कार, आरोग्यविषयक सुविधा, व्यायामशाळा, वाचनालय तसेच पोलिसांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालय दिवाळी शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तू स्वरूपात दरवर्षी देत होते.
गेले दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शुभेच्छा पत्र, मिठाई आणि भेटवस्तू वितरित करताना येणाऱ्या अडचणी टाळण्याच्या उद्देशाने भेटवस्तूंऐवजी या रकमेचे थेट साहित्य खरेदी करण्याचा पर्याय सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनमधून खरेदी केलेल्या साहित्यावर 30 टक्के सवलत मिळत आहे. याबरोबरच यावर्षी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पसंतीचे व आवश्यक असे दिवाळी सणासाठी लागणाऱ्या साहित्यामधील 750/- रु किमतीचे साहित्य देखील मोफत मिळणार आहे.
मुंबई पोलिसांकरिता कार्यरत असलेल्या 6 पोलीस कॅन्टीनमधून हे साहित्य खरेदी करावयाचे असून ही योजना दि. 30 ऑक्टोबरपासून कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार
दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार
विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेण्याचे शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन
मुंबई, दि. 30 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
या सुविधेनुसार विद्यार्थी 22 नोव्हेंबरपासून नावनोंदणी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरू शकतील. तर 23 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करता येतील. इ. दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in तर इ. बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच हे अर्ज भरावयाचे आहेत. त्याचबरोबर दि. 11 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याचे नावनोंदणीसाठी (प्रथम मुदत व द्वितीय मुदतवाढ यामधील) प्राप्त अर्जातील दुरूस्त्या करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित विद्यार्थ्यी आपल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधू शकतील.
विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याकरिता 1) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र 2) आधारकार्ड 3) स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो आवश्यक असून ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य असणार आहे. संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाईल. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावी.
खासगी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावीसाठी एक हजार रूपये नोंदणी शुल्क तर 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल तर इयत्ता बारावीसाठी 500 रूपये नोंदणी शुल्क तर 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल. एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही, तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल.
दिव्यांग विद्यार्थ्यांना खासगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या किंवा प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावीविद्यार्थ्याना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र अथवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील सूचना वाचून अर्ज भरावेत तसेच अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२०- २५७०५२०७/ २५७०५२०८ अथवा २५७०५२७१ यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.
शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१
*महानगरपालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना दीपावली -२०२१ साठी सानुग्रह अनुदान जाहीर*
महानगरपालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना दीपावली -२०२१ साठी सानुग्रह अनुदान जाहीर
मुंबई /प्रतिनिधी - विजय साबळे
बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी / कर्मचारी यांना दीपावली – २०२१ सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबईच्या महापौर श्रीमती किशोर पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक २९ ऑक्टोबर २०२१) मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला येथे झालेल्या बैठकीत रुपये २० हजार इतके सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
दीपावली -२०२१ करीता महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या बैठकीत घोषित करण्यात आला.
1 ) महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचारी, प्राथमिक शिक्षक -20,000/- 2 ) माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित शाळा यातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते व शिक्षकेतर कर्मचारी -10,000/- 3 ) प्राथमिक शिक्षण सेवक -5,600/- 4 ) आरोग्य सेविका -5,300/- 5 ) विनाअनुदानित माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षण सेवक -2,800/- | |||||
रु. २,८००/- |
गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१
*अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर*
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर
मुंबई, दि. 28 : एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रूपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
सन २०२१-२०२२ या वित्तीय वर्षासाठी भाऊबीज भेट दोन हजार रूपये देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २८ ऑक्टोबर २०२१ रोजी जारी करण्यात आले आहे. यासाठी यंदाच्या वित्तिय वर्षात एकूण 37 कोटी 97 लाख 32 हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना ही भाऊबीज भेट अदा करण्यात येणार आहे.
बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१
*सातारा : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन*
या फळाचा नाद केला…अन समृद्धी आली…!!
या फळाचा नाद केला…अन समृद्धी आली…!!
लातूर जिल्हा म्हणजे पक्क्या बेसाल्टवर बसलेला डेक्कन प्लाटूवरचा सगळ्यात टणक भाग… बोली भाषेत मांजरा खडक म्हणतो त्याच मांजरा नदीच्या खोऱ्याचा हा भाग…अशी भौगोलिक ओळख असलेल्या या भागात निसर्गाला पूरक असलेल्या अनेक फळापैकी एक फळ म्हणजे ‘सीताफळ’ येतं … रानफळातलं सगळ्यात गोड आणि आरोग्यदायी फळ म्हणून ओळखलं जातं.. याचे शास्त्रीय नाव चेरीमोया असे असून याची मूळ उत्पती दक्षिण अमेरिकेतील अंडस पर्वत राजी इथली… हे उष्ण कटीबंधीय फळ आहे.
हे सगळं सांगण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल… फार काळ तुमची उत्कंठा न ताणता, मूळ विषयावर येतो..!!
जानवळ येथील ‘येलाले’ हे प्रयोगशील शेतकरी, ते खरे द्राक्षबागायतदार. पण काही वर्षांपूर्वी युरोप खंडात पाठवलेल्या द्राक्षात पेस्टीसाईडचा तांत्रिक दोष दाखवून ते द्राक्ष समुद्रात फेकून दिले… त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यात ‘येलाले’ यांचाही माल होता.. त्यामुळे त्यांनाही लाखोचा फटका बसला. त्यातच त्यांनी द्राक्ष बाग मोडली. या लाखोच्या तोट्यामुळे काय करावं या विवंचनेत ते सिताफळाकडे वळले…!!
बाळकृष्ण नामदेव येलाले, तरुण शेतकरी.. शेती आणि शेती मार्केट कोळून प्यायलेले … कमी वयात अधिक अभ्यास करून शेती करणारे… त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलेली गोष्ट हजारो शेतकऱ्यांना नवी दृष्टी देऊ शकते. म्हणून त्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी केलेला थेट संवाद तुमच्यासाठी…
सीताफळाचीच का लागवड?
येलाले म्हणाले,” एन एम के गोल्डन ” या जातीच्या सिताफळाची 2011 ला लागवड केली… या जातीच्या सीताफळाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणात फळ धारण क्षमता आणि फळ तयार झालं तरी देठ सोडत नाही…फळ तोडल्यानंतर टौ थ्या दिवशी तयार होते, एक फळ 500 ते 700 ग्रॅम भरते…लागवडी नंतर फक्त चार वर्षात फळ लागायला सुरुवात होते. जानवळ हा डोंगरी भाग आहे… इथे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि तापमान अधिक हमखास असते. जानवळचा डोंगर जवळ आहे त्यामुळे रानटी जनावरं मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी करतात. सीताफळाच्या पानाचा उग्रवास असल्यामुळे कोणतेही रानटी जनावर ते खात नाही. अत्यल्प पाणी हवं असलेलं हे फळ आहे. याला जास्त पाणी झालेतर फळ कमी लागते. यावर्षी फूल धारण करतांना सुरुवातीला पाऊस कमी झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळं धरली गेली. आता झाड फळानी लगडले आहेत. येत्या आठ दिवसात याची तोड सुरु होईल.
सीताफळ इतर पिकापेक्षा परवडते का?
2011 ला सात एकर क्षेत्रात लागवड केली त्यानंतर आता पर्यंत तीन ते चार सिझन मिळाले… सुरुवातीला तेजी होती म्हणून फार म्हणावा तसा भाव मिळाला नाही.त्यानंतर बाजारपेठेचा अभ्यास झाला दलाला शिवाय स्वतः मार्कटला जाऊ लागलो.. त्यामुळे देशभरातल्या मार्केटचा अभ्यास झाला. सिताफळाला एकरी दरवर्षी खर्च अधिकाधिक 50 हजार होतो. एकरी उत्पन्न 5 ते 10 टन होतं, कमीत कमी 25 रुपये किलोचा भाव मिळतो. मागच्या दोन वर्षात या सात एकर मध्ये 40 लाख रुपयाचे सिताफळ
विकल्याचे बाळकृष्ण येलाले सांगतात.
आता शासनाचा कृषि विभाग “विकेल ते पिकेल ” या योजनेखाली प्रोत्साहन देत आहे. सीताफळ या सारख्या फळाला पल्प तयार करणाऱ्या कंपन्या हे मोठे मार्केट आहे.
सिताफळ मार्केट
हैद्राबाद, दिल्ली आणि नवी मुंबई ( वाशी ) हे देशातील मार्केट आहेत. यातील सर्वात मोठे मार्केट नवी मुंबई ( वाशी ) येथे आहे. अनेक पल्प तयार करणाऱ्या कंपन्या यातले सर्वात मोठे ग्राहक आहे. त्यामुळे चांगल्या जातीचे थोडे जास्त काळ राहणारे सिताफळ कोरडवाहू शेतीत बागायती शेतीचे उत्पन्न काढू शकतात तेही कमी खर्चात… बघा ज्याला रानटी जनावरं खाणार नाहीत पण माणसं आवडीने खातात ती शेती करा. एक फायद्याच्या शेतीचा उत्तम पर्याय आहे.
सिताफळ आरोग्यदायी
सिताफळ वाताळ असते असे म्हटले जाते मात्र एका आंतरराष्ट्रीय न्यूट्रिशन जर्नलमध्ये आलेल्या आलिसा पल्लाडिनो यांच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, सिताफळात उच्च प्रतीचे फायबर असते, व्हिटॅमिन, मिनरल हे घटक तर असतातच त्या शिवाय प्रतिकारशक्ती वाढविणारे असल्यामुळे सिताफळ खाल्यास शरीरातल्या व्याधी म्यूकर रूपात बाहेर येत असल्यामुळे सर्दी झाल्यासारखे वाटू शकते. डोळे आणि हृदयाला आरोग्यदायी आहे. यातून अँटीऑक्सिडेंट व्हिटॅमिन सी, बी (6) मिळत असल्यामुळे हे पृथ्वीवरचं अमृत आहे असं म्हणायला हरकत नाही…!!
— युवराज पाटील,
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर
डाॅ.संदीप डाकवे यांना कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार प्रदान
*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी*
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी
मुंबई, दि. २६ : ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने 26 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित केला आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021 या काळात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासानाच्या निधीमधून निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी 75 टक्के एवढा असा एकूण 2 हजार 860 कोटी 84 लाख 7 हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यात येणार आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. शेतकऱ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१
सातारा : जिल्ह्यातील भोजनालय उपहारगृह व इतर सर्व।आस्थापनांच्या वेळेत सुधारणा
सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१
"बार्डो" ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदाननर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ‘ताजमाल’ तर सामाजिक विषयासाठी ‘आनंदी गोपाळ’ ला पुरस्कार
"बार्डो" ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ‘ताजमाल’ तर सामाजिक विषयासाठी ‘आनंदी गोपाळ’ ला पुरस्कार
दिल्ली, दि.25 : ‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला 67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन आज उपराष्ट्रपती वैकंया नायडू यांनी गौरव केला. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारासाठी ‘ताजमाल’ तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘आनंदी गोपाळ’ या मराठी सिनेमाला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विज्ञान भवनात 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आज दिले गेलेले पुरस्कार वर्ष 2019 चे आहेत.
अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
सुप्रसिद्ध तसेच बहुभाषिक अभिनेता रजनीकांत यांना आज दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी कन्नड, तेलगु, तमिळ, हिंदी, मल्ल्याळम, इंग्लिश, बंगाली या भाषेतील सिनेमांमध्ये अभिनय केलेला आहे. रजनीकांत यांचे मुळ नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड असून ते कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील मराठी कुटूंबातील आहेत. त्यांची चित्रपट सृष्टीतील कारर्कीद 1975पासून सुरू केली.
अभिनेता मनोज वाजपेयी यांना ‘भोसले’ या हिंदी चित्रपटासाठी तर दक्षिण भारतीय अभिनेता धनुष्य यांना ‘असुरन’ यांना तमिळ चित्रपटासाठी यावर्षीचा उत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील पुरस्कार विभागुन प्रदान करण्यात आला. अभिनेत्री कंगना रणावत यांना ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’ आणि ‘पंगा’ या दोन चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘बार्डो’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे हे आहेत. रितु फिल्मस कट एलएलपीने हा चित्रपट निर्माण केलेला आहे. याच चित्रपटातील ‘रान पेटला…’ या गाण्याच्या गायिका सावनी रवींद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यासोबतच या सिनेमाला उत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइनचाही पुरस्कार मिळाला आहे. प्रोडक्शन डिसाइन सुनील निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केले आहे.
राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ‘ताजमाल’ या सिनेमाला प्रदान करण्यात आला आहे. हा सिनेमा नियाज मुजावर यांनी दिग्दर्शीत केला आहे. तर टूलाईन स्टूडियो प्रा.लि. यांची निर्मिती आहे.
‘ताकश्ंत फाईल’ या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘सुपर डिलक्स’ या तमिळ सिनेमासाठी विजय सेथुपथी यांना सहायक अभिनेता या श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
स्पेशल मेन्शन या श्रेणीत 2 मराठी चित्रपटांना पुरस्कार प्रदान
स्पेशल मेन्शन या श्रेणीत सत्य घटनावर आधारित ‘लता भगवान करे’ या मराठी सिनेमात अभिनय करणाऱ्या लता करे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्रीमती करे यांचे पती आजारी होते त्यांच्या आजारपणासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी त्या बारामतीतील मॅरॉथॉनमध्ये धावुन प्रथम पुरस्कार मिळवणाऱ्या लता करे या आहेत. त्यांच्या या विलक्षण कृतीवरच हा सिनेमा बनविलेला आहे. याच श्रेणीत ‘पिकासो’ या मराठी सिनेमाला सुद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत वारंग हे आहेत.
‘त्रिज्या’ या सिनेमाला उत्कृष्ट ऑडीयोग्राफी (साऊंड डिजाइनर) चा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
चित्रपटांवरील उत्कृष्ट समिक्षात्मक पुस्तक या श्रेणीत ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला स्पेशल मेन्शन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हे पुस्तक अशोक राणे यांनी लिहीले आहे.
*दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा*
परिवहन मंत्री श्री. परब म्हणाले, या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार यंदा नोव्हेंबरच्या 1 तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.अजित पवार यांचे श्री.परब यांनी आभार मानले.
महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचे श्री. परब यांनी यावेळी सांगितले.
*कराड : नवीन महामार्गाचे काम नियोजनपूर्वक करून गतीने पूर्ण करा - पृथ्वीराज चव्हाण*
रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१
भारत सरकारने थोर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात यावे. यासाठी पाठपुरावा करणार - मा.ना.श्री. रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री
शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१
शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई, दि.23 : इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित केला असल्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका आणि पतपेढ्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा केला जातो. यात शेतकऱ्यांचा कल हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जास्त असतो. सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत कर्जाचे वितरण केले जाते. शेतकरी नवीन पीक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेत असतांना त्याला सात-बारा उताराऱ्यापसून ते बँकांचे ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे गोळा करण्यास बराच कालावधी लागतो व कधी कधी हंगाम ही संपून जातो. नाईलाजाने शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडून जास्तीच्या व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. यास्तव शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी कर्ज मित्र योजना राबविण्यात येत आहे.
अल्प मुदतीकरिता प्रथमत: पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यास प्रति प्रकरण रुपये 150 तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या नवीन कर्ज प्रकरणाचा सेवाशुल्क रूपये 250 इतका असेल. मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्ज प्रकरणाच्या नुतनीकरणाचा दर प्रति प्रकरण रूपये 200 इतका आहे.
कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार झाल्यानंतर त्यास जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मान्यता असणार आहे. कृषी कर्ज मित्र कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्याच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून मंजुरीसाठी बँकेकडे सादर करेल. कृषी कर्ज मित्राने पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यास सहाय्य व सल्ला देणे याविषयीचे बंधपत्र देणे आवश्यक आहे.
कृषी कर्ज मित्राला शेतकऱ्याच्या शिफारशीसह सेवाशुल्क मागणी यादी बँकेकडे सादर करावी लागणार असून बँकेकडून त्याची शहानिशा झाल्यानंतर त्या गट विकास अधिकारी यांच्याकडे सेवा शुल्क अदायगीसाठी यादी सादर केली जाणार आहे. या योजनेचा कालावधी सन 2021-22 असा असून आवश्यकतेनुसार योजनेचा कालावधी वाढवणे वा कमी करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे.
या शासन निर्णयामुळे गरजू शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचेही ग्रामविकास व कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.
शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१
कुंभारगाव : शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जेव्हा बिबट्या करतो शेळीवर हल्ला :चाळकेवाडीतील घटना
तळमावले :सर्पमित्र अमित पाटील यांनी दिले मण्यार जातीच्या विषारी सापाला जीवनदान
भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन
भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन

मुंबई, दि. 22 : भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी, 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे‘ आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वतंत्र भारत @ 75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.
दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फत या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक २६ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख किंवा ज्येष्ठतम अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी / कर्मचारी प्रतिज्ञा घेतील. प्रतिज्ञा घेतल्यानंतर मा.राज्यपाल व मा.मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येईल.
दक्षता जनजागृती सप्ताहासंदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करताना कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी त्या-त्या क्षेत्रात लागू असलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन होईल याबाबत आयोजकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुजाण नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक 022-24921212, वेबसाईट acbmaharashtra.gov.in, ईमेल – acbwebmail@mahapolice.gov.in/ addlcpacbmumbai@mahapolice.
*कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करा*- व्ही.ए. तावरे
सोलापूर : ड्रीम फाऊंडेशन करणार डाॅ.संदीप डाकवे यांचा गौरव
गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१
युवकांच्या लसीकरणासाठी ‘मिशन युवा स्वास्थ्य अभियान’ २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान राबविणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे महाविद्यालयातच होणार विद्यार्थ्यांचे लसीकरण
युवकांच्या लसीकरणासाठी ‘मिशन युवा स्वास्थ्य अभियान’ २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान राबविणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
महाविद्यालयातच होणार विद्यार्थ्यांचे लसीकरण

मुंबई, दि. 21 : राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील उपस्थित होते.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. युवकांचे लसीकरण केले जावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात महाविद्यालय परिसरातच विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरण कक्ष, विश्रांती कक्ष आणि निरीक्षण कक्ष उभारण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविण्यात आली आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, लस आणि लसीकरणासाठी आवश्यक असणारे कर्मचारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर नियोजन केले जात आहे.
राज्यात उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या सुमारे पाच हजार संस्था आहेत. त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी, खासगी विद्यापीठे अशा सर्व संस्थात मिळून सुमारे चाळीस लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना या अभियानाच्या कालावधीत लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, या अभियानाच्या नियोजनाबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व्हिसीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत मिशन युवा स्वास्थ्यची अमंलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण कर्मचारी आणि लस उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी महाविद्यालयात कक्ष उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यार्थ्यांची माहिती प्राचार्याकडून संकलित केली जाईल, असे सांगितले.
पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी महाविद्यालये सुरू झाली असल्याने युवकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लसीकरण झाल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल, असे सांगितले.
बैठकीत अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, अभियान संचालक डॉ. सतीश पवार, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, सहसंचालक प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. सोनाली रोडे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
*राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तत्वत: मंजुरी – कामगार मंत्री हसन मुश्रीफ*
राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तत्वत: मंजुरी – कामगार मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. 21 : राज्यातील ॲटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्वत: मंजुरी दिली.
तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी बोर्ड स्थापन करण्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, असंघटित विकास आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे, कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते.
असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी संबंधित विभागांकडून प्रस्ताव सादर करण्याबाबत तसेच यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याबाबतच्या सूचना मंत्री श्री.मुश्रीफ यांनी संबंधित विभागाला यावेळी दिल्या.
सातारा : 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी
कराड : अथणी शुगर्स - रयत साखर कारखाना शेतकऱ्यांना देणार एक रक्कमी प्रति मे.टन २ हजार ९२५ रु
श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले, अथणी शुगर्स -रयत ने मागील गळीत हंगामातील गाळपास आलेल्या उसास एफआरपी २हजार ८६७ रुपये इतकी असताना २ हजार ९०० रुपये एक रक्कमी दर देत एफआरपी पेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
चालू गळीत हंगामात एफआरपी तीन टप्यात देण्याचे शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी संभ्रमित अवस्थेत होता. मात्र, अथणी शुगर्स-रयत ने ऊस उत्पादक शेतकऱ्याची मागणी विचारात घेता एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबर मागील हंगामापासून प्रति टन सवलतीच्या दरात १ किलो साखर दिली जात आहे.
कारखान्याने २०२१-२२हंगामात ५ लाख मे. टन गळीताचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादकांनी आपला जास्तीतजास्त ऊस अथणी शुगर्स रयत युनिट या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, योगेश पाटील यांची वेस्टर्न इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रयत कारखान्याचे संचालक अधिकारी सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्याकडून अभिनंदनाचा वर्षाव
अथणी रयत कारखान्याने एक रकमी एफआरपीची रक्कम जाहीर करून सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडल्या बद्दल ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून कारखान्याचे अभिनंदन होत आहे.
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...