रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

तळमावले : सतिष वाघ यांना कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार प्रदान


तळमावले : सतिष वाघ यांना कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार प्रदान
तळमावले/वार्ताहर
तळमावळे :धरणीमाता फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध वन्यजीव व वृक्षसंवर्धनावर विविध उपक्रम राबवत असल्याबद्दल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री सतिष वाघ यांना पुणे येथे डाॅ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
धरणीमाता फौंडेशन हे वन्यजीव व वृक्षसंवर्धन ह्या विषयावर काम करत आहे.गतसाली फौंडेशन ने वन्यजीवासाठी झाडावर पाणी व चाऱ्याची सोय करून परिसरातील पक्षाची भूक भागवली होती त्याचबरोबर डोंगर परिसरातील झाडांना पाणी देण्याचे कामही सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली धरणीमाता फौंडेशन च्या वतीने करण्यात आले.त्यांचे वन्यजीव व वृक्षसंवर्धन विषयी तळमळीचे काम पाहून त्यांना पुणे येथे डाॅ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सतीश वाघ यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.मिळालेल्या पुरस्काराबद्दल सतिष वाघ यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी यशदाचे उपमहासंचालक डाॅ.मल्लिनाथ कलशेट्टी, ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी, कृशी सहसंचालक बसवराज बिराजदार, उद्योजक हरीश पुजारी, कुमार दादा करजगी, शिवाजी चमकिरे, संजय लाड, रवींद्र टापरे, डाॅ.सचिन मांजरेकर, सचिन जाधवर,  शंकरराव अक्कलकोटे, अमोल उंबरजे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...