जि. प शाळा वाझोली येथे राजेसंघर्ष प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक श्री योगेश पाटणकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठान चे खजिनदार व करपेवाडी गावचे सरपंच श्री रमेश नावडकर यांनी वाझोली शाळेस भेट देत शाळेला राजेसंघर्ष प्रतिष्ठान च्या माध्यमातून शाळेस भौतिक सुविधा देण्यास व पाटणकर साहेब यांच्या प्रयत्नातून विविध कामे शाळेस दिली जातील असे आव्हान केले
जि. प शाळा वाझोली येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करत संघाचे अध्यक्ष श्री प्रवीण पाटील यांनी गावातील युवक वर्ग यांना एकत्र घेत संघाची स्थापना केली व शाळेला एक उत्तम दर्जा देण्याचा प्रयत्न केला याच पार्श्वभूमीवर राजेसंघर्ष प्रतिष्ठान ला शाळेचे निवेदन दिल्यानंतर तातडीने शाळेस मदत करण्यास कटिबद्ध राहणार असे सांगण्यात आले.
समाजसेवक पाटणकर साहेब यांच्या माध्यमातून विविध गावांना सामाजिक कार्यातून विविध कामे केली असून व यापुढेही असेच सामाजिक काम साहेबांच्या माध्यमातून केली जातील असे आव्हान नावडकर साहेब यांनी केले.
या वेळी गावचे पोलीस पाटील विजय सुतार,शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप वीर,उपशिक्षक सतीश कोकाटे,संघाचे सदस्य संदीप पाटील,जयवंत सुतार आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा