तळमावले: समाजसेवक मा.योगेश पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नि:शुल्क आधारकार्ड पॅनकार्ड शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तळमावळे दि. 28 ( प्रतिनिधी ) राजे संघर्ष प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक मा.योगेश पाटणकर साहेब यांचा वाढदिवसानिमित्त परिसरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये करपेवाडी ग्रामपंचायत येथे सरपंच श्री रमेश नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.28 व 29 ऑक्टोबर रोजी मोफत आधार कार्ड ,पॅनकार्ड,युनिव्हर्सल पास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला
या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड ,नावातील दुरुस्ती ,पत्ता दुरुस्ती ,जन्म तारीख दुरुस्ती ,मोबाइलला नंबर लिंक करणे ,बायो मेट्रिक अपडेट करणे त्याचबरोबर नवीन पॅनकार्ड,कोविडचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना युनिव्हर्सल पास, या सोयी उपलब्ध करण्यात आल्या होत्या .यांमध्ये 148 नागरिकांनी आधार कार्ड 78 नागरिकांनी पॅनकार्ड व 130 युनिव्हर्सल पास मोफत उपलब्ध करून देण्यात आले.लाभार्थी नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.व मा.योगेश पाटणकर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या शिबिराचे उदघाटन राजे संघर्ष प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष मा.सचिन काजारी यांनी केले यावेळी करपेवाडीचे सरपंच व शिबिराचे आयोजक श्री.रमेश नावडकर (तात्या) उपसरपंच सौ.अर्चना करपे,ग्रामपंचायत सदस्यां सौ.पुष्पा साळुंखे,सौ.छाया करपे,राजेसंघर्ष प्रतिष्ठान चे पदाधीकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा