कुंभारगाव :माणुसकीने उजळली वंचितांची दिवाळी गोजाई फौंडेशन व ग्रामविकास मंडळ गलमेवाडी मुंबई यांच्याकडून दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप
गलमेवाडी : कुंभारगाव ता.पाटण - भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि उज्वल सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक आहे. हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे, दागिने, फराळ या गोष्टींबरोबर हा सण साजरा करतात. पण समाजात काही कुटुंब अशी आहेत कि ते केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे सण साजरा करू शकत नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन गोजाई फौंडेशन व ग्रामविकास मंडळ गलमेवाडी मुंबई यांच्या वतीने दिवाळीत मोफत फराळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काल शनिवारी दि.30 रोजी त्यांनी समाजातील गरजू व गरीब कुटुंबांना मोफत फराळ वाटप करण्यात आले. याप्रकारे त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण देण्याचा आमचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होतो असे संपत यशवंत चोरगे यांनी सांगितले यावेळी 60 कुटुंबाना फराळाचे वाटप करण्यात आले. अतिशय कौटुंबिक स्वरूपाच्या समारंभात हे फराळ वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोजाई फौंडेशन व ग्रामविकास मंडळ गलमेवाडी मुंबई मधील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली यावेळी गलमेवाडीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सर्वांनी संस्थेचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा