या प्रकरणात एकूण पाच सशयितांचा समावेश आहे. जागोजागी ठेवलेले हात बॉम्ब दाखवताना त्यातील दोघे अंधाराचा गैरफायदा उठवत पसार झाले असून तिघांना वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे
याबाबत वनपाल सुभाष राऊत दिलेल्या माहितीनुसार,काल दि.30 च्या रात्री ढेबेवाडी वनक्षेत्रातील भोसगाव वनकक्ष क्रमांक ५५३ मध्ये शिकारी टोळी हात बॉम्ब गोळ्याच्या साह्याने रानडुकरांची शिकार करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता त्या परिसरात सापळा रचला,शिकाऱ्यांचा अचूक माग काढत वनविभागाची टीम तेथे पोहचताच संशयित शिकारी आढळून आले.त्यावेळी त्यांच्याकडून शिकारीसाठी तयार केलेले सहा हातबॉम्ब व दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात एकूण पाच सशयितांचा समावेश आहे.
जागोजागी ठेवलेले हात बॉम्ब दाखवताना त्यातील दोघे अंधाराचा गैरफायदा उठवत पसार झाले असून तिघांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे व पळून गेलेल्या संशयितांचा वनविभागाकडून काल रात्रीपासून शोध सुरू आहे. उपवनसंरक्षक एम.एन मोहिते,सहायक वनसंरक्षक महेश झाजुरणे यांच्या मार्गदर्शनानुसार वनक्षेत्रपाल एल.व्ही पोतदार,वनपाल सुभाष राऊत,वनरक्षक जयवंत बेंद्रे,विशाल डुबल,सुभाष पाटील,सुरेश सुतार,अमृत पन्हाळे,नथुराम थोरात,अनिकेत पाटील,अजय कुंभार आदींनी ही कारवाई केली. सशयितांवर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्यांना पाटण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा