शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

तळमावले :सर्पमित्र अमित पाटील यांनी दिले मण्यार जातीच्या विषारी सापाला जीवनदान

तळमावले :सर्पमित्र अमित पाटील यांनी दिले मण्यार जातीच्या विषारी सापाला जीवनदान
तळमावले -कुंभारगाव रोडवर धुमाळवाडी येथे पाटण पंचायत समितीच्या सदस्या सिमाताई मोरे यांचे रस्त्यालगत घर आहे .घराशेजारी शेड आहे या शेंडात आज दि.२२रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मण्यार जातीचा साप दिसला त्यावेळी त्यांनी आजूबाजूच्या लोकांना ह्या गोष्टीची कल्पना दिली
त्याचवेळी या रस्त्यावरून मेंढ येथील सर्पमित्र अमित पाटील जात होते त्यांना ही माहिती समजताच त्यांनी सदर साप पकडुन एका बाटलीत भरून जंगलात सोडून दिले. सर्पमित्रामुळे एका सापाला जीवनदान मिळाल्याने सर्पमित्र अमित पाटील यांचे कौतुक होत आहे.

मी सापाला कधीही मारले नाही साप पकडण्याची कला मला अवगत असल्याने कोणाच्याही घरात साप आढळल्यास मी त्या सापाला पकडून जंगलात सोडतो माझ्यामुळे एकादा जीव वाचत असल्याने मला समाधान मिळते.जर आपल्या परिसरात कुठेही साप आढळला तर त्याला मारू नका मला फोन करा 8698484705 मी त्याला पकडून जंगलात सोडून देईन-अमित पाटील -सर्पमित्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...