कुंभारगाव : शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जेव्हा बिबट्या करतो शेळीवर हल्ला :चाळकेवाडीतील घटना
कुंभारगाव : पाटण तालुक्यातील कुंभारगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे .बुधवारी भर दिवसा चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने चाळकेवाडी गावच्या हद्दीत दोन शेळ्यावर हल्ला केला त्यातील एक शेळी जखमी झाली व दुसऱ्या शेळीला ठार करून जंगलात घेऊन गेला या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की चाळकेवाडी येथील शशिकांत चाळके हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपली पाळलेली जनावरे घेऊन रानात चरण्यासाठी घेऊन गेले होते.जनावरे चरत असतानाच अचानक बिबट्याने शेळीवर हल्ला केला ही घटना पहातच शशिकांत चाळके यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत बिबट्याने एक शेळी जखमी केली होती. तर दुसरी शेळीला ठार करून तिला फरफटत घेऊन जात होता .
शशिकांत चाळके यांनी बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र मृत शेळीला घेऊन बिबट्या पसार झाला.ढेबेवाडी सह कुंभारगाव परिसरात गत काही वर्षांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे अनेक ठिकाणी पाळीव जनावरावर त्याच्याकडून हल्ले होत आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकरी हतबल झाले आहेत.दिवसेंदिवस त्याची दहशत वाढत आहे. गेल्या आठवड्यात मण्याचीवाडी येथील शेतकरी सचिन सुर्वे यांची एक शेळी व एक बोकड बिबट्याने ठार केले होते आणि चाळकेवाडी येथील शेतकरी विठ्ठल चाळके यांचे रेडकावर बिबट्याने हल्ला करून जंगलात घेऊन गेला या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा