रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

भारत सरकारने थोर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात यावे. यासाठी पाठपुरावा करणार - मा.ना.श्री. रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री

भारत सरकारने थोर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात यावे. यासाठी पाठपुरावा करणार - मा.ना.श्री. रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री      कराड दि. २३ ऑक्टो. आपल्या  बौद्धिक व सामाजिक कर्तृत्वाने तळपणारी अनेक नक्षत्रे विसाव्या शतकात महाराष्ट्रात जन्माला आली. त्यातीलच एक लखलखता तारा  शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे हे होत.  बापूजींनी भारतीय स्वातंत्र्यलढयात मोलाचे योगदान दिले आहे,  तसेच बापूजींनी शिक्षणाला आमूलाग्र परिवर्तनाचे साधन मानले. बापूजींच्या  संकल्पनेतून, दूरदृष्टीतून १९५४ साली  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना झाली. या संस्थेने  महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात ध्रुव-ताऱ्यासारखं अढळ स्थान निर्माण केले आहे. बापूजींच्या विचारांचा वसा आणि तत्वांना आदर्श ठेवून संस्थेने अथक वाटचाल केली आहे.  या संस्थेच्या माध्यमातून  महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या खेडयापाडयांत  शिक्षणप्रसाराचे भरीव कार्य केले.  त्यामुळे बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने शिक्षण घेता आले. ज्यायोगे महाराष्ट्राच्या शिक्षणप्रसार कार्याला गती मिळाली.  जनसेवक असणाऱ्या  बापूजींनी गोरगरीब, ग्रामीण  बहुजन समाजातील असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नरुपी पंखांत बळ दिले त्यामुळे समाजविकास घडून आला, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मा. रामदासजी आठवले यांनी केले.  मा. कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व मा सचिव सौ.प्राचार्य शुभांगी गावडे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा घेऊन काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील मा.प्राचार्य डॉ. अरूण गाडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व गुरुदेव कार्यकर्ते व मा.श्री.संदेश भंडारे (सदस्य, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सांगली) यांनी कराडच्या शासकीय विश्रामगृहावर मा.ना रामदास आठवले यांची भेट घेऊन  लेखी निवेदनाद्वारे डॉ. बापूजी साळुंखे यांना पद्म पुरस्कार बहाल करण्यात यावा अशी जोरदार मागणी केली. याप्रसंगी प्रा.राजू जाधव, प्रा. विक्रांत सुुपुगडे,प्रा. संभाजी नाईक, प्रा. डॉ. जी.एन.पोटे, प्रा. एस.एन. सावंत,प्रा. सुभाष कांबळे  प्रा. सचिन पुजारी,प्रा. सुनिल कुंभार, प्रा.सुरेश पाटील, प्रा.सी जी पुटवाड आदी उपस्थित होते.
मा.प्राचार्य डॉ.अरुण गाडे यांनी बापूजी साऱ्यांचेच असल्याने समाजातील प्रत्येक घटक बापूजींना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी आग्रही असल्याचे सांगितले. त्यासाठी व्यापक  जनआंदोलन साकारत आहे. व या आंदोलनात सर्वजण  उत्स्फूर्तपणे  प्रयत्नशील असल्याची माहिती दिली. मा. आठवलेसाहेब पुढे म्हणाले, बापूजींचे आपणावर अनंत उपकार आहेत. म.फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे शिक्षणप्रसार कार्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या  थोर क्रांतिकारक व शैक्षणिक विचारवंत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे.या महान विभूतीस पद्म पुरस्कार भारत सरकारने सन्मानाने जाहीर करावा व जनमताचा आदर राखावा. यासाठी प्रयत्नशील राहून भारत सरकारकडे  पाठपुरावा करूच त्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे  शिष्टमंडळ व मा.ना.श्री. अमित शहा ( संरक्षण व सहकार मंत्री भारत सहकार) यांचेशी चर्चा घडवून आणणे कामी दिल्लीमध्ये मी स्वतः पुढाकार घेईन असे सांगितले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...