तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने गेली 5 वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवले जात आहे. याची दखल घेत ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांना राज्यस्तरीय डाॅ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार जाहीर केला आहे. अशी माहिती सोलापूर येथील ड्रीम फांऊडेषन चे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी व चाणक्य गुरुकुल अकॅडमी च्या संगीता भतगुणकी यांनी दिली आहे. यशदाचे उपमहासंचालक डाॅ.मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा चे अतुल कुलकर्णी, कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव होणार आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून ड्रीम फाऊंडेशन व चाणक्य गुरुकुल अकॅडमी यांनी हा सोहळा पत्रकार भवन पुणे येथे शनिवार दि.23 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित केला आहे.
यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे 4 पुरस्कार तर विविध सामाजिक संस्थांनी 50 हून अधिक पुरस्कारांनी गौरवले आहे. या पुरस्काराबद्दल डाॅ.संदीप डाकवे व स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा