बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

डाॅ.संदीप डाकवे यांना कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार प्रदान

डाॅ.संदीप डाकवे यांना कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार प्रदान
तळमावले/वार्ताहर
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांचा गौरव हा युवकांना प्रेरणादायी ठरेल व समाजाला दिशा देण्यासाठी कार्यरत लोकांना मार्गदर्शन ठरेल, असे मत अप्पर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवेचे अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याबद्दल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांना जिल्हास्तरीय डाॅ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
ड्रीम फाउंडेशन व चाणक्य गुरुकुल अकॅडमीतर्फे माजी राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती औचित्याने पुणे येथील पत्रकार भवनमध्ये डाॅ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार वितरण व भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमाला अंतर्गत मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमात डाॅ.सुधा कांकरिया, लेखक विठ्ठल क्षीरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डीसले, श्रीकांत साबळे, डाॅ.प्रशांत नाईकवाडे, दीपक होमकर, अजिंक्य पाठक, शिरीषकुमार मजगे, डाॅ.चंद्रकांत फाळके, रूपेश पाटील, रेणुका हिरेमठ, प्रा. डाॅ. सुभाष गायकवाड, सतीश वाघ यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी यशदाचे उपमहासंचालक डाॅ.मल्लिनाथ कलशेट्टी, ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी, कृशी सहसंचालक बसवराज बिराजदार, उद्योजक हरीश पुजारी, कुमार दादा करजगी, शिवाजी चमकिरे, संजय लाड, रवींद्र टापरे, डाॅ.सचिन मांजरेकर, सचिन जाधवर,  शंकरराव अक्कलकोटे, अमोल उंबरजे आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, डाॅ. कलाम यांचे स्वप्न साकार करण्यासाठी युवा प्रेरणा व सामाजिक,  शैक्षणिक, महिला जागर कार्य करणे गरजेचे आहे. समाजातील वंचित घटकासाठी, लेक लाडकी अभियानासाठी कार्य करणाऱ्या सुधा कांकरिया यांचे कार्य मोठे आहे. यातून प्रत्येकांनी प्रेरणा घ्यावी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम जवान यांनी, तर आभार संगीता भतगुणकी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश पाटील, नागेश श्रीचिपा,  शेखर पाटील यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...