गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश सातारा जिल्ह्यात 7 ऑक्टोबर पासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी

जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश सातारा  जिल्ह्यात 7 ऑक्टोबर पासून
धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी

 सातारा दि. 30  :  जिल्ह्यात कोषिड-१९ ची दुसरी लाट आटोक्यात येत असून अद्यापही कोविड ताण आढळून येत असल्याने साथरोग अधिनियम, १८५७ च्या खंड २ नुसार प्राप्त अधिकार व आपत्ती निवारण कायदा, २००५ नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून अध्यक्ष, राज्य व्यवस्थापन समिती ने संपूर्ण राज्यासाठी निर्देश पारित केलेले आहेत. त्या प्रमाणे सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१ पासुन खुली करण्यासाठी खाली नमुद मानक कार्यप्रणाली  व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून शेखर सिंह जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण  यांनी परवानगी दिली आहे.
 
  प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त, मंडळ, अधिकारी यांनी निर्णय घ्यावा. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असतात, अशा ठिकाणी आवारात काहीच -१९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी योग्य सामाजिक अंतर व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे. या आदेशामध्ये कोकोड -१९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपायासोबतच या विशिष्ट ठिकाणी करावयाच्या विशिष्ट उपाययोजनांचा ही समावेश करण्यात आलेला आहे. कन्टेनमेंट झोनच्या आतील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ही नागरिकांसाठी बंद राहतील. फक्त कंन्टेनमेंट झोनच्या बाहेरील स्थळे, प्रार्थना स्थळे सुरु करण्यातस परवानगी असेल.  मास्क परिधान करणे, शारिरिक आंतराचे पालन करणे, धर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना -
  ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि १० वर्षाखालील लहान मुले यांनी  घरीच राहावे, धार्मिक / प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात. कोविड  विषाणू संसर्गाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना बरोबरच साध्या सार्वजनिक आरोग्य उपायांचेही पालन करणे आवश्यक आहे. या सर्व उपायांचे पालन सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी सर्व कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांचेकडून पूर्ण वेळ पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये खालील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश असेल.  
  या सर्व सार्वजनिक ठिकाणी शक्यतोवर वैयक्तिक कमीत कमी ६ फूट शारिरिक अंतर राखणे आवश्यक असेल. चेहरापट्टी, मास्क यांचा वापर करणे बंधनकारक असेल. हात अस्वच्छ नसले तरी साबणाने वारंवार हात धुणे ( किमान – ४० ते ६० सेंकदापर्यंत) बंधनकारक असेल, त्याचबरोबर सर्व ठिकाणी अल्कोहोल युक्त हण्ड सॅनिटायझर चा वापर ( किमान २० सेंकदापर्यत) करावा. श्वसनसंबंधित शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये शिकताना किंवा खोकताना टिश्यू पेपर किंवा हातरूमाल किंवा हाताच्या कोपराने नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची दक्षता घेणे तसेच वापरलेल्या टिश्यू पेपरची योग्य त्या पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिक,कामगार, भाविक, सेवेकरी यांनी स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण करणे तसेच आजारी असल्यास स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनास कळविणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. तसेच याचे उल्लघन केल्यास स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी येणाऱ्या सर्वांनी आरोग्य सेतु अॅपचा वापर करावा.
सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी खालील प्रमाणे उपाययोजना करतील.
  सर्व धार्मिक स्थळे/ प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेशव्दारावर हात स्वच्छतेसाठी सनिटायझर डिस्मेंसर तसेच थर्मल सिक्रनिंगची सोय करणे बंधनकारक असेल. धार्मिक/ प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल. सर्व व्यक्तींना चेहरा पट्टी , मास्कचा वापर केला असेल तरच या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी द्यावी. (NoMask-No Entry). सर्व धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी कोविड विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपायोजना पोस्टर्स च्या माध्यामातून दर्शनी भागात लावण्यात याव्यात. तसेच या ठिकाणी कोहीड -१९ विषाणू संसर्ग रोखण्याबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना ऑडीओ व व्हिडीओ च्या माध्यमातून जनजागृतीसाठी वारंवार ऐकवल्या व प्रसारित केल्या जाव्यात. धार्मिक व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेश देण्याबाबत अभ्यागत, भाविकांबाबत निश्चित धोरण ठरवावे, त्या ठिकाणी निश्चित केलेल्या वेळेमध्ये किती लोकांना प्रवेश दिला जावा, याबाबतचा निर्णय धार्मिक व प्रार्थना स्थळांचा आकार, वायुविजन इत्यादी बाबी विचारात घेवून त्या स्थळांचे नियमन करणारे विश्वस्त, मंडळ,अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून करावे. चप्पल, बुट, पादत्राणे स्वत:च्या गाडीतच ठेवणेबाबत भाविकांना प्रवृत्त करावे. गरज असेल तर भाविकांनी वैयक्तिक, कुटुंबांची पादत्राणे एकत्र नेमून दिलेल्या ठिकाणी ठेवावीत.  वाहन पाकिंगच्या ठिकाणी तसेच परिसराबाहेर सामाजिक अंतराच्या निकषाचे पालन करून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे.  धार्मिक व प्रार्थना स्थळांच्या परिसरातील तसेच आवारा बाहेरील सर्व दुकाने स्टॉल, कैफेटेरिया या ठिकाणी पूर्णवेळ सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल. धार्मिक व  प्रार्थना स्थळाच्या परिसरामध्ये भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि योग्य सामाजिक अंतराचे पालन करणेसाठी योग्य मार्किंग करावे.  भाविक, अभ्यागतासांठी धार्मिक व प्रार्थना स्थळांच्या परिसरामध्ये स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था करणे. धार्मिक- प्रार्थना स्थळांच्या परिसरातील भाविकांच्या अभ्यागातांच्या प्रवेशासाठीच्या रांगामध्ये किमान ६ फुटाचे शारिरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे. यासाठी धामिक प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारी संस्था जबाबदार असेल. धार्मिक - प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी योणाऱ्या सर्व नागरिकांनी प्रवेश करण्याअगोदर हात व पाय साबण व पाण्याने
धुवावेत. धार्मिक - प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी अभ्यागत, भाविकांना बसण्याची व्यवस्था करत असताना योग्य सामाजिक अंतर राखावे. वातानुकूल यंत्र, वायुविजनसाठी CPWD च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात यावे. वातानुकुलित यंत्रणांचे तापमान २४° C ते ३०" C पर्वत राखले जाईल तसेच सापेक्ष आर्द्रता ४०-70% पर्यत असेल. शक्यतोवर पुरेसी ताजी हवा,क्रॉस व्हेंन्टीलेशन याची पुरेसी व्यवस्था करावी. पुतळे, मुर्ती, पवित्र पुस्तके यांना सर्श करण्यास परवानगी असणार नाही. धार्मिक-प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास परवानगी असणार नाही. संसर्गाचा विचार करता शक्य त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेले भक्ति संगीत, गाणी वाजविली जावीत. परंतु कोणत्याही परिस्थितीत गाण्यासाठी एकत्र येणा-या व्यक्तींना परवानगी देणेत येवू नये,  एकमेकांना अभिवादन करताना शारिरिक संपर्क टाळण्यात यावा.  धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्रित येवून एकच चटई, जमखाना वापर करणेस परवानगी नाही. भाविकांनी त्यांची स्वतंत्र चटई किंवा जमखाना आणावा जो कि प्रार्थनेनंतर ते परत घेवून जातील.धार्मिक - प्रार्थना स्थळांच्या आत मध्ये प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी सारख्या शारिरिक अर्पणांना परवानगी असणार नाही. धार्मिक- प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रभावी स्वच्छता व निर्जतुकीकरण करावे. विशेषत: शौचालय, हात-पाय धुण्याचे ठिकाण इत्यादी ठिकाणी स्वच्छतेबाबत विशेष लक्ष दिले जावे, धार्मिक - प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापकान्दारे या परिसरामध्ये वारंवार साफसफाई व निर्जतुकीकरण केले जावे, धार्मिक- प्रार्थना स्थळांच्या परिसरातील इमारतीतील जमिन, फरशी व इतर आवारात वारंवार स्वच्छता केली जावी. अभ्यागत, भाविक, सेवेकरी,कर्मचारी यांनी वापरलेले मास्क, चेहरा पट्टी, हातमोजे यांची योग्य विल्लेवाट लावली जात आहे याची दक्षता घेण्यात याबी. धार्मिक- प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, सेवेकरी यांना कोविड-19 सुरक्षा प्रोटोकॉल गरजेचा आहे. त्याचबरोबर कामावर येणे अगोदर तसे आठवड्यातून एकदा कोहीड-१९ चाचणी करणे आवश्यक असेल. खाण्याच्या तसेच शौचालयाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रण करणे आवश्यक असेल. प्रत्येक धार्मिक - प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची संख्या, जागा आणि सामाजिक अंतराचा प्रोटोकॉल पाळला जाईल याबाबत संबंधीत पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांना हमीपत्र देणे बंधनकारक असेल,
आवारात बाधित किंवा संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत खालीलपमाणे कार्यवाही करावी
आजारी व्यक्तीला इतरापासून दूर असे स्वंतत्र खोलीन किंवा जागेत ठेवावे. डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत त्या व्यक्तीने मास्क,  चेहरा पट्टी वापर करणे बंधनकारक असेल. तात्काळ जवळच्या वैद्यकीय सुविधा (हॉस्पिटल, क्लिनिक) केंद्रात कळवावे, तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनास कळवावे. नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाव्दारे (जिल्हा RRT, उपचार करणारे तज्ञ) सदर रुग्णाबाबत जोखीम मूल्याकंन केले जाईल. त्यानुसार रुग्ण, त्याचे संपर्क आणि निर्जंतुकीकरण याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल.  रुग्ण कोविड-१९ विषाणू बाधित (पॉझिटिव्ह) आल्यास सर्व परिसर निर्जतुकीकरण करण्यात यावा. 
  सर्व सबंधीत प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे यांचेकडून वर नमुद मानक कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबत तपासणी करण्याचे अधिकार त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थांना देणेत येत आहेत.कोविड -१९ व्यवस्थापनासाठी शारिरिक अंतराचे व संसर्ग न पसरणेबाबत यापूर्वी विहित केलेले व वेळोवेळी देणेत आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
  उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहोता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.



*सातारा जिल्ह्यातील 214 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित**137 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 214 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित*
*137 जणांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि.30 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 214 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 5 (9957), कराड 17 (38856), खंडाळा 8 (14069), खटाव 20 (25476), कोरेगांव 8 (21761), माण 24 (17680), महाबळेश्वर 1 (4668), पाटण 4 (10088), फलटण 52 (36898), सातारा 66 (51153), वाई 3 (15658) व इतर 3 (2098) असे  आज अखेर एकूण 248365 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 137 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

युवक काँग्रेसच्या निवडी जाहीर : अध्यक्षपदी नरेंद्र पाटणकर तर उपाध्यक्षपदी उदयसिंह चव्हाण व जगदीश पाटील

युवक काँग्रेसच्या निवडी जाहीर : अध्यक्षपदी नरेंद्र पाटणकर तर उपाध्यक्षपदी उदयसिंह चव्हाण व जगदीश पाटील
ढेबेवाडी (ता.पाटण) :पाटण तालुका युवक काँग्रेस समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. युवक काॅंग्रेसच्या दिवशी बुद्रुक येथील अध्यक्षपदी नरेंद्र पाटणकर तर उपाध्यक्षपदी सुपने येथील जगदीश पाटील आणि कुंभारगावचे उदयसिंह चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

श्री. पाटणकर हे दिवशी बुद्रक, श्री. पाटील हे सुपने, तर श्री. चव्हाण हे कुंभारगावचे राहणारे आहेत. अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : सरचिटणीस- मयूरेश साळुंखे, मयूर वनवे, स्वप्नील पवार, सागर चव्हाण, तोफिक पटेल. चिटणीस- अक्षय घाडगे, निरंजन धस, सुभाष माने, रोहित चव्हाण, योगेश काकडे, मारुती शेलार. सदस्य- परशुराम पवार, रमेश शेलार, रमेश साळुंखे, जमीर डांगे, रोहित माने, विनोद घाडगे, सचिन साळुंखे, जयदीप कदम, तुषार कांबळे, अक्षय सुतार, प्रशांत पालकर. निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हिंदुराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

*सातारा जिल्ह्यातील : 207 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू**264 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील : 207 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू*
*264 जणांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि.29 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 207 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 2 , कराड 24, खंडाळा 11, खटाव 20, कोरेगांव 14, माण 17, महाबळेश्वर 2, पाटण 2 , फलटण 46, सातारा 64, वाई व इतर 3 असे  आज अखेर एकूण 248151 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या (कोरेगांव 1 व वाई 1) असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6084 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 264 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

काळगाव : पवारवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियान उत्साहात साजरा

काळगाव : पवारवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियान उत्साहात साजरा 
प्रतिनिधी / मनोज सावंत
काळगाव : सुदृढ सशक्त बालक हीच राष्ट्राची खरी संपत्ती असते. सामान्य जनमानसात सकस आहारा विषयी जनजागृती व भावी पिढी आरोग्यदायी व्हावी याच संकल्पनेवर भर देऊन शासनाच्या निर्देशानुसार सर्वत्र पोषण अभियान साजरा करण्यात येत आहे.याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून ग्रामपंचायत पवारवाडी ता.पाटण येथे बाल विकास प्रकल्प सातारा नागरी अंतर्गत बीटस्तरीय पोषण अभियान साजरा करण्यात आला. 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पाटण विभाग काळगाव ग्रामपंचायत पवारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने  दि २८/९/२०२१ रोजी पोषण माह अंतर्गत काळगाव विभागाच्या बीट स्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रांगोळी,पोषण शिडी,सेल्फी पॉइंट,घोषवाक्ये, पोस्टर्स,पथनाट्य,आहार मनोरा ई माध्यमातून पोषण विषयक संदेश देण्यात आले. ग्रा प पवारवाडी चे सरपंच मा.दत्तप्रसाद कदम यांनी पाककृती स्पर्धेतील विजेते व सहभागी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.तसेच सर्व सेविका,मदतनीस यांच्या पोषण अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान केला गेला. 
यावेळी कृष्णा हॉस्पिटल कराड येथील आहार तज्ज्ञ कोमल सावंत मानसोपचार तज्ज्ञ शुभांगी जमाले यांचे मार्गदर्शन लाभले.  जन सहकार निधी लिमिटेड , तळमावले चे संस्थापक तथा सातारा जिल्हा समन्वय व सनियंत्रण (दिशा) चे सदस्य मा. मारुती मोळावडे यांचे मार्फत स्तनदा माताना पोषण आहार किट वाटप करण्यात आले.कार्यक्रमास विभागातील मा. सरपंच,ग्रामसेवक,आरोग्य कर्मचारी, जि प प्रा शाळेतील शिक्षक,icds पर्यवेक्षिका अरूंधती गरुड,कुसुम दीक्षित ,सचिन ताईगडे ,सरपंच आत्माराम पाचूपते,किशोरी,पालक,गरोदर माता, ग्रामस्थ उपस्थित होते.

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय

नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय

मुंबई, दि.२८ : नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे.  कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.  या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.

*खा. रजनीताई पाटील यांचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून अभिनंदन*

 *खा. रजनीताई पाटील यांचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून अभिनंदन* 

 मुंबई : राज्यसभेची निवडणूक होणार की नाही हि उत्सुकता असताना भाजप च्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार रजनी पाटील यांची राज्यसभेच्या खासदार पदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर रजनी पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी रजनी पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन काँग्रेस कडून भाजप नेत्यांना केले होते. यानुसार राज्यसभेची हि निवडणूक बिनविरोध होऊन महाविकास आघाडीकडून काँग्रेस च्या रजनी पाटील यांची निवड झाली आहे. याआधी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मी मुख्यमंत्री असताना रजनी पाटील यांना त्यांच्या जागी राज्यसभेची संधी दिली होती त्यावेळी सुद्धा रजनी ताईंची निवड बिनविरोध झाली होती. तसेच भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे निधन झाल्यावर सुद्धा काँग्रेस ने उमेदवार दिला नव्हता व ती सुद्धा निवडणूक बिनविरोध झाली होती. 
 
-------------------------------------------------------

तळमावले : मर्चंड सिंडिकेट ग्रामीण बिगरशेती सहकारी क्रेडिट संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

तळमावले :  मर्चंड सिंडिकेट ग्रामीण बिगरशेती सहकारी क्रेडिट संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न 

तळमावले प्रतिनिधी /मनोज सावंत तळमावले.ता.पाटण दि.29 मर्चंड सिंडकेट ग्रामीण बिगरशेती सहकारी क्रेडिट संस्थेची वार्षिक 14 वी सर्वसाधारण सभा आज मंगळवार दिनांक 28.09.2021 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता संस्थेच्या तळमावले येथील मुख्य कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.प्रारंभी देशातील हुतात्मे, राजकीय नेते, पूरग'स्त तसेच कोविडमुळे मृत नागरिक, सभासद व ठेवीदारांना आदरांजली वाहण्यात आली.
विषयपत्रिकेवरील 10 विषयांवर सविस्तर चर्चा होऊन सर्व ठराव बहुमताने पारित करण्यात आले. संस्थेला या आर्थिक वर्षात 8 लाख 22 हजार 927 रुपये नफा झाला आहे अशी माहिती चेअरमन अनिल शिंदे यांनी दिली.
सभेच्या अध्यक्ष स्थानी चेअरमन अनिल निवृत्ती शिंदे  हे होते. यावेळी व्हा.चेअरमन राजेश शंकर करपे,संचालक ज्ञानदेव श्रीपती जाधव,शिवाजी भाऊसो देसाई,लक्ष्मण मारुती मत्रे,महेश हरिभाऊ कोकाटे,सल्लागार सुरेश देसाई,कायदेशीर सल्लागार अँड.अधिक चाळके ,शिवसेना पाटण तालुका उपअध्यक्ष सागर नलावडे, कुमजाई पर्व न्यूजचे प्रतिनिधी मनोज सावंत,उपसरपंच अधीकराव माने,रामचंद्र पाचूपते , आदी उपस्थित होते.

चेअरमन अनिल शिंदे यांनी सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक केले .संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन व्यवस्थापक दिलीप गुंजाळकर यांनी केले.व्हा.चेअरमन राजेश शंकर करपे यांनी आभार मानले.यावेळी संस्थेचे उपव्यवस्थापक शरद शिंदे,ओंकार शिंदे, सविता सपकाळ,सर्व सेवक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 147 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित* *493 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 147 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित*  
*493 जणांना दिला आज डिस्चार्ज*

सातारा दि. 27  जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 147 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
          तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली  0  (9944), कराड 11  (38802), खंडाळा  2 (14045), खटाव 29   (25418), कोरेगांव  7 (21713), माण 6  (17619), महाबळेश्वर  4  (4665), पाटण  3 (10081), फलटण 44  (36778), सातारा  35 (50998), वाई  5 (15647) व इतर  1 (2088) असे आज अखेर एकूण 247798 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 493 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

कृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन -कृषी मंत्री दादाजी भुसे

कृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला  ठिबक सिंचन 
 -कृषी मंत्री दादाजी भुसे

सातारा दि. 26 : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कृषी  क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे. मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

 किन्हई येथे श्री. भुसे यांच्या हस्ते पिक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार महेश शिंदे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, राहूल बर्गे तसेच शेतकरी उपस्थित होते.

 श्री. भुसे म्हणाले, सेंद्रीय शेतीचे प्रमाणिकरणासाठी कृषी विद्यापीठांना सोबत घेऊन कृषी विभागात स्वतंत्र कक्ष कार्यान्वीत करण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी  खंबीरपणे उभे असून शेतकरी गट, महिला बचत गट यांना कृषी विभागामार्फत आवश्यक मदत केली जाईल. शेतकरी महिलांसाठी कृषी विभागाच्या 30 टक्के योजना आहेत त्याचाही महिला शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

कोरोना संसर्गामुळे देशासह राज्यात निर्बंध घालण्यात आले होते. या निर्बंधाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था संभाळण्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या अनेक योजना असून त्यांचा प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे-जे शक्य आहे ते शासनाकडून केले जाईल, अशी ग्वाही कृषी मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिली.

आमदार श्री. शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसायाकडेही वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी शेततळे घेऊन त्यात मस्त्य शेती करावी.
यावेळी श्री.बानुगडे पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर

मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर

मुंबई, दि.२४ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आज आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आज दिली. अर्ज भरलेल्या प्रत्येक उमेदवाराला परिक्षेसाठी बसण्याची संधी नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार मिळाली पाहिजे म्हणून सर्व उमेदवारांच्या हिताचा विचार करुन लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  ही परीक्षा उद्या शनिवारी आणि रविवारी आयोजित केली होती.

डॉ. पाटील यांनी सांगितले की ही परीक्षा घेण्यासाठी न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार करण्यात आला होता. या कंपनीची निवड राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागा (माहिती तंत्रज्ञान) यांच्या एकवीस जानेवारी २०२१ रोजी ओएमआर व्हेंडौर पॅनेलची नियुक्ती करण्यात आली आहे. या पॅनेलमधील सर्व कंपन्यांच्या सक्षमता तपासणी साठी सर्वंकष चाचणी विभागाच्या वतीने घेण्यात आली होती. शासन नियुक्त पॅनेलमधील चाचणीत प्रथम आलेल्या न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस भरतीचे काम करण्यासाठी करारबद्ध केले होते. करारातील अटीनुसार आरोग्य विभागाने प्रश्न पत्रिका संच गोपनीय रित्या कंपनीस हस्तांतरण करणे एवढीच जबाबदारी विभागाची होती. भरती प्रक्रियेसाठी संकेतस्थळ विकसित करणे, ऑनलाईन अर्ज मागवणे, उमेदवारांना प्रवेशपत्र देणे, शाळा महाविद्यालये अधिग्रहित करुन बैठक व्यवस्था करणे, लेखी परीक्षा घेणे, गुणवत्ता यादी तयार करणे ही सर्व कामे कंपनीची होती. मात्र आरोग्य विभागाने सर्व सहकार्य करुन देखील न्यासा कम्युनिकेशन कंपनी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आणि बैठक व्यवस्था करण्यात अपयशी ठरली आहे. परीक्षेची पूर्व तयारी पूर्ण न झाल्याने कंपनीच्या संचालकांनी आज सायंकाळी सात वाजता परीक्षा घेण्यासाठी असमर्थता दर्शवली. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र मिळाली याची खात्री करुनच परीक्षेचे आयोजन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.  परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे उमेदवारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. ही परीक्षा सर्व तांत्रिक बाबींची पूर्व तयारी करुन लवकरच घेण्यात येईल. परीक्षेची नियोजित तारीख सर्व उमेदवारांना विभागाचे संकेतस्थळ, ई-मेल, एसएमएस व्दारे कळविण्यात येईल, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय

 ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय

आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

मुंबई दि.नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.

धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

पाटण : रानडुकराचे मांस विक्री प्रकरणी तिघांना अटक

पाटण : रानडुकराचे मांस विक्री प्रकरणी तिघांना अटक 


पाटण : रानडुकराची शिकार करून डावरी (ता. पाटण) येथे मांस विकणाऱ्या तिघांवर वनाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दशरथ विष्णू मोहिते, विलास शामराव सत्रे व सोमनाथ संपत तिकुडवे (सर्व रा.डावरी, ता. पाटण) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित व्यक्ती डुकराचे मांस विकत असल्याची माहिती पाटणचे वनक्षेत्रपाल एल. व्ही. पोतदार यांना मिळाली. त्यानुसार डावरी गावच्या हद्दीत ''टॅक'' या स्थानिक नावाने प्रसिद्ध असलेल्या वस्तादाच्या विहिरीजवळ छापा टाकण्यात आला. एका झाडाखाली संशयित लोक डुकराचे मांस विक्री करताना आढळले.

त्यांना वनविभागातील कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. संशयितांजवळ मांस तोडण्याचे तीन सत्तूर, पक्षी पकडण्याची जाळी हे साहित्य मिळाले. संशयितांवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ अन्वये गुन्हा नोंद करून सर्व साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक एम. एन. मोहिते, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे वनक्षेत्रपाल एल. व्ही. पोतदार, वनपाल एस. बी. भाट, ए. डी. राऊत, वनरक्षक व्ही. एम. चौरे, बी. ए. माने, डी. बी. बर्गे, वनमजूर आर. व्ही. कदम यांच्या पथकाने केली.

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

पाटण : धक्कादायक :एकतर्फी प्रेमातून घरात घुसून तरुणीचा खून

पाटण : धक्कादायक :एकतर्फी प्रेमातून घरात घुसून तरुणीचा खून 
पाटण , 24 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत सातत्याने वाढ होतं आहे. अलीकडेच चंद्रपुरातील एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून  तरुणीला भररस्त्यात भोकसून तिची निर्घृण हत्या  केली होती.
ही घटना ताजी असताना, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. येथील एका तरुणाने भरदिवसा अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा गळा चिरला आहे. यानंतर आरोपीनं स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत मुलगी आपल्या घरात टीव्ही बघत बसली होती. तर तिची तीन वर्षांची लहान बहिणी अंगणात खेळत होती. यावेळी मृत मुलीची आईही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं मुलीच्या घरात प्रवेश केला.
मुलीला काही कळायच्या आत आरोपीनं तिचं तोंड दाबलं आणि तिच्या गळ्यावरून धारदार चाकू फिरवला.थंड डोक्याने केलेल्या या हल्ल्यानंतर पीडित मुलगी घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतर संशयित आरोपी अनिकेत मोरे   (२०, रा. शिरंबे, कोरेगाव) स्वत: मल्हारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन हजर राहिला. तसेच त्याने संबंधित मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
हत्या झालेली मुलगी ही सतरा वर्षांची असून ती पाटण तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होती. तर 20 वर्षीय आरोपी अनिकेत मोरे हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपी मृत तरुणीच्या मागे लागला होता.

दरम्यान त्याने मृत मुलीच्या आईची भेट घेऊन लग्नासाठी मागणी देखील घातली होती. पण मुलीच्या आईने लग्नासाठी नकार दिला होता. मुलीच्या आईने लग्नासाठी नकार दिल्याने आरोपीच्या मनात मुलीबद्दल आणि तिच्या आईबद्दल रोष वाढला होता. यातूनच आरोपीनं संबंधित अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केली आहे.

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

तळमावले : विजय काळे आज सातारा आकाशवाणीवर

तळमावले : विजय काळे आज सातारा आकाशवाणीवर
तळमावले/वार्ताहर :मनोज सावंत
पाटण तालुक्यातील मालदन येथील युवा शेतकरी विजय काळे यांची सातारा आकाशवाणी केंद्रावर किसानवाणी या कार्यक्रमात आज गुरुवार दि.23 सप्टेंबर, 2021 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. गांडूळ खत निर्मिती या विषयावर ते संवाद साधणार आहेत. विजय काळे यांनी मालदन येथे आपल्या कुटूंबिय, मित्र मंडळी व कृषी अधिकारी यांच्या सहकार्यातून गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा केला आहे. परिसरातील लोकांना तो आदर्शवत असा आहे. त्यांची ही मुलाखत भागातील सर्वांनी ऐकून त्यांना अभिप्राय कळवावा.
युवा षेतकरी विजय काळे यांची सातारा आकाशवाणीवर मुलाखत हा सर्व पाटणवासियंासाठी अभिमानाचा क्षण आहे.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

डाॅ.संदीप डाकवे यांचा 10 हजार कलाकृती भेटीचा टप्पा पूर्ण

डाॅ.संदीप डाकवे यांचा 10 हजार कलाकृती भेटीचा टप्पा पूर्ण
तळमावले/वार्ताहर
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील मुलाखतीच्या वेळी ‘विचारांच्या पलीकडले’ या विचारमंचावर निवेदक/अभिनेता रोहन गुजर यांना त्याचे रेखाचित्र देवून 10 हजार कलाकृती प्रदान करण्याचा टप्पा डाॅ.संदीप डाकवे यांनी पूर्ण केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत शिल्पकार राजेंद्र कुंभार, अभय वीर, विशाल डाकवे, सुनिल सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, डाॅ.संदीप डाकवे यांनी रोहन गुजर यांना ‘मनातलं हा चारोळी संग्रह भेट दिला. तसेच कार्यक्रमाचे निर्माते डाॅ.आलोक खोब्रागडे, राजेंद्र फरांदे यांना सुद्धा त्यांच्या नावातील अक्षरगणेशा भेट दिले.
ठिपक्यातून रेखाटलेले अप्रतिम चित्र डाॅ.डाकवे यांनी रोहन गुजर यांना दिले. या चित्राचे त्यांनी खूप कौतुक केले व डाॅ.संदीप डाकवे यांच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती, सेलिब्रिटी यांना अक्षरगणेशा, शब्दचित्रे, पेपटर कटींग आर्ट, ठिपका चित्रे भेट दिली आहेत. हे करताना त्यांनी 20 पेक्षा जास्त कलात्मक उपक्रम राबवले आहेत. त्यामधून मिळालेला 1 लाखापेक्षा जास्त निधी त्यांनी गरजुंना दिला आहे. याशिवाय स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजुंना लाखोंचे साहित्य प्रदान केले आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी 20 पेक्षा जास्त हस्तलिखिते तयार केली आहेत.  त्यांनी राबवलेल्या वेगवेगळया उपक्रमांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये तीनदा तर हायरेंज बुक ऑफ   वल्र्ड रेकाॅर्ड मध्ये एकदा झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाकडून त्यांना 4 पुरस्कार तर विविध संस्थांनी 50 पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरवले आहे.
डाॅ. डाकवे यांच्या उपक्रमांची दखल खसखस वेब पेज, वृत्तमानपत्रे, इलेक्ट्राॅनिक मिडीया, दुरदर्शन इ.नी घेतली आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांची 4 पुस्तके प्रकाशित झाली असून 4 पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. याषिवाय 50 पेक्षा जास्त पुस्तकांची मुखपृश्ठे त्यांच्या संकल्पनेतून साकारली आहेत. तसेच स्पंदन प्रकाशनाच्या माध्यमातून 5 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डाॅ.डाकवे यांनी पत्रमैत्रीचा छंद देखील जोपासला आहे.  
10 हजार कलाकृती भेट दिल्याबद्दल डाॅ. संदीप डाकवे यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
 
मान्यवरांकडून डाॅ.डाकवे यांचे कौतुक:
युवराज संभाजीराजे छत्रपती, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उपनेते प्रा.नितीन बानुगडे, खा.श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील,  इदंरजित देशमुख, सिंधुताई सपकाळ, अपर्णाताई रामतीर्थकर, डाॅ.प्रकाश आमटे, सुनिती सु.र., आदिशवर  धारेश्वर  वर महाराज, महंत स्वामी आबानंदगिरीजी महाराज, कर्नल हितेश चोरगे, कॅप्टन अमोल यादव यांनी डाॅ.डाकवे यांच्या कलेचे कौतुक केले आहे.

डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून सेलिब्रिटींना चित्रे भेट :
रविंद्र बेर्डे, अशोक सराफ, अशोक षिंदे, संजय नार्वेकर, प्राजक्ता माळी, भरत जाधव, सयाजी षिंदे, डाॅ.अमोल कोल्हे, स्पृहा जोषी,  मकरंद अनासपुरे, डाॅ.गिरीश ओक, वैभव मांगले, संजय खापरे, सुबोध भावे, जयराज नायर,  ऐष्वर्या नारकर इ.सह अनेक सेलिब्रिटींना चित्रे भेट दिली आहेत.

डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवलेले कलात्मक उपक्रम:
शब्द -ठिपके यामधून चित्रे
मोरपीस-पिंपळ पानावर चित्रनिर्मिती
पेपर कटींग आर्ट
जवान, वारीचे मोठे पोस्टर
आपटयाच्या पानातून संदेश
छत्री/मास्क यावर कॅलिग्राफी
अक्षरगणेशा उपक्रम
मोठी भित्तीपत्रिका
नीलकंठ खाडीलकर यांची 83 चित्रे
ना. शंभूराज देसाई यांची 54 चित्रे
अक्षर अभंग वारी उपक्रम
133 शब्दातून कर्मवीरांना मानवंदना
पुस्तकांची मुखपृश्ठे, व्यंगचित्रे रेखाटन
कलात्मक उपक्रमातून लाखो रुपयांची मदत

सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

इयत्ता बारावी परीक्षा निकलाबाबत विद्यार्थ्यांनी 25 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन

इयत्ता बारावी परीक्षा निकलाबाबत विद्यार्थ्यांनी 25 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन 
मुंबई, दि.20 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 12 वी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना या निकालावर काही आक्षेप/तक्रारी असतील तर त्या संबंधित विद्यार्थ्यांनी विहित करण्यात आलेल्या नमुन्यात (प्रपत्र -अ)मध्ये अर्ज करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार दि. 25 सप्टेंबर 2021 अखेर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याबाबत सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी. असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत व अन्य मंडळामार्फत  घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021 च्या मूल्यमापनासंदर्भात दाखल याचिका क्र.620/2021 बाबत सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी दि. 24/06/2021 रोजी निकाल दिला आहे. त्यानुसार परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर झाल्यानंतर या निकालावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्याच्या निराकरणासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबत आदेशित केलेले आहे.

दूरदर्शनवरील मुलाखतीबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

दूरदर्शनवरील मुलाखतीबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव 

तळमावले/वार्ताहर : मनोज सावंत
दूरदर्शन सहयाद्री वाहिनीवर ‘विचारांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात झालेल्या विशेष मुलाखतीमुळे पाटण तालुक्याचा अभिमान ठरलेले डाॅ.संदीप डाकवे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, फोनव्दारे, मेसेजव्दारे डाॅ.डाकवे यांच्या कर्तृत्वाचे मनापासून कौतुक केले आहे.धामणी (ता.पाटण) येथील श्री विठ्ठल रखुमाई उत्सव मंडळ यांच्यावतीने सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सत्कार नरेंद्र पाटील (चेअरमन,अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशन) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फौजी आनंदा दिंडे, सरपंच आशाताई नेर्लेकर, संजय सावंत, अनिल दिंडे, दिपक दिंडे व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री रामकृपा विकास मंडळ, रामनगर धामणी यांनी शाल, श्रीफळ देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केला. या प्रसंगी सारंग पाटील (प्रदेशाध्यक्ष, माहिती व तंत्रज्ञान राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य), योगेश पाटणकर (अध्यक्ष, राजे संघर्ष प्रतिष्ठान), प्रतापराव देशमुख (उपसभापती, पं.स.पाटण), राजाभाऊ काळे (सदस्य, जिल्हा नियोजन समिती सातारा), मारुती मोळावडे (अध्यक्ष, जनसहकार निधी लिमिटेड), सौ.संगिता पुजारी (माजी सभापती, पं.स.पाटण), बाजीराव सावंत (माजी सरपंच, ग्रां.पं.धामणी), शितल पाटील(सदस्या, ग्रां.पं.धामणी), दिंडे महाराज व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन समाजसेवक सचिन जयवंत सावंत यांनी केले होते.
सुभेदार जगन्नाथ शिद्रुक यांनी मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुस्तक देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सन्मान केला. यावेळी मेजर पांडूरंग उदूगडे, प्रा.दादाराम साळुंखे, प्रा.ए.बी.कणसे, सपोनि संतोश पवार, महादेवराव पानवळ, रघुनाथ मानुस्करे, लेखक शिवाजी मस्कर, फौजी विष्णू चव्हाण, संजय सावंत, संतोष करपे व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन विजयराव पाचुपते यांनी केले.
चाळकेवाडी (कुंभारगांव) येथील बाल गणेश मंडळा तामजाई वार्ड वतीने देखील डाॅ.संदीप डाकवे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष मारुती निवडूंगे, गणेश डोंबे, विघ्नेश डोंबे, विजय चाळके, शामराव कोळेकर, छायाचित्रकार अनिल देसाई, कुमजाई पर्व चे संपादक प्रदीप माने, शंभूराज देसाई, व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी डाॅ.डाकवे यांची दूरदर्शनवर मुलाखत झालेबद्दल अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
लोकांनी मोठया प्रमाणात केलेल्या स्वागत आणि सत्कारामुळे आता काम करण्याची आणखी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे. तसेच समाजाप्रती काम करण्याची जबाबदारीही वाढल्याची भावनिक प्रतिक्रिया डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे.

जवानांमुळेच आपण सर्वजण सुरक्षित - नरेंद्र पाटील

जवानांमुळेच आपण सर्वजण सुरक्षित - नरेंद्र पाटील
तळमावले/वार्ताहर :मनोज सावंत
देशाच्या सीमेवर असलेल्या जवानांमुळेच आपण सर्वजण सुरक्षित आहोत, सेवानिवृत्तीनंतर त्यांना गावात सन्मानाने वागवले पाहिजे असे मत अण्णासाहेब पाटील महामंडळ, फौडेंशन चे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. ते श्री विठृठल रखुमाई उत्सव मंडळ, धामणी यांच्यावतीने आयोजित केलेल्या वृक्षारोपण व माजी सैनिक आनंदा दिंडे यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच आशाताई नेर्लेकर, डाॅ.संदीप डाकवे, सचिन सावंत, बाजीराव सावंत, संजय सावंत, अशोक सावंत, अनिल दिंडे, धनाजी सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.
सेवानिवृत्त फौजींनी गावातील मुलांना, स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, गावाला मार्गदर्शन करावे. असेही श्री.पाटील पुढे बोलताना म्हणाले. फौजी अशोक दिंडे यांनी विविध ठिकाणी केलेल्या सेवेचा त्यांनी बोलताना उचित गौरव केला.
याप्रसंगी डाॅ. पाटील, पोलिस पाटील विजय सुतार, संजय सावंत, विनोद कदम यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. दरम्यान डाॅ.डाकवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी फौजी अशोक दिंडे आणि नरेंद्र पाटील यांना त्यांची चित्रे भेट दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल दिंडे, दिपक दिंडे व मंडळाच्या  पदाधिकारी यांनी विषेश परिश्रम घेतले. 

पाटण तालुक्‍यातील 61 गावांना मिळणार रास्तभाव दुकानाचा परवाना

पाटण तालुक्‍यातील 61 गावांना मिळणार रास्तभाव दुकानाचा परवाना 
पाटण .दि.19 पाटण तालुक्‍यातील 61 गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकाने देण्यासाठी परवाने मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून या गावातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट सहकारी संस्था महिलांच्या सहकारी संस्था आदींना यासाठी अर्ज करता येणार असून त्यासाठी 6 ऑक्‍टोबर 2021 अखेर मुदत असल्याची माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दिली.पाटण तालुका दुर्गम आणि डोंगराळ असल्याने अनेक गावे दुर्गम भागात आहेत. अशा गावातील ग्राहकांना रास्त भाव दुकानातून धान्य नेण्यासाठी सुलभता यावी तसेच काही कारणास्तव इतर दुकानांना जोडली गेलेली दुकाने व परवाने रद्द झालेली दुकाने अशा एकूण 61 गावांमध्ये नव्याने रास्तभाव दुकानासाठी परवाने दिले जाणार आहेत. त्यासाठी शासनाच्या अटी असून ही दुकाने प्राधान्याने ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राधान्याने रास्तभाव दुकानाचे परवाने मंजूर केले जाणार आहेत.

त्यासाठी 61 गावांमध्ये जाहीरनामे लावण्यात आले असून इच्छुक असणाऱ्या संस्थांनी 6 ऑक्‍टोबर 2021 अखेर तहसीलदार पाटण यांच्याकडे अर्ज करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

नव्याने रास्त भाव दुकानाचे परवाने मंजूर होणारी गावे -
चिटेघर, जाईचीवाडी, वन, आरल - कातवडी, आडुळ, चाफोली, जुंगटी, चोपदारवाडी, गिरेवाडी, शेडगेवाडी, येराडवाडी, पेठशिवापूर, किल्ले मोरगिरी, डोंगळेवाडी, गोकुळ तर्फ पाटण, काहिर, आंबेघर तर्फ मरळी, पाचगणी, आटोली, वाडी कोतावडे, बांधवट, विरेवाडी, माथनेवाडी, खराडवाडी, तोरणे, किसरुळे, मिरगाव, बाजे, गोषटवाडी, कामरगाव, गोवारे, मळा, पाथरपुंज, नाव, सुपुगडेवाडी, मुट्टलवाडी, चौगुलेवाडी (काळगाव) मस्करवाडी, ताईगडेवाडी, भिलारवाडी, वरेकरवाडी (कुंभारगाव) बोर्गेवाडी (कुंभारगाव) शिद्रुकवाडी (खळे), राहुडे, दुटाळवाडी, शितपवाडी, तामकडे, जोतिबाचीवाडी, चेवलेवाडी, नेरळे, पिंपळगाव, डोंगरोबाचीवाडी, तळीए, गोठणे, गोरेवाडी, घाटेवाडी, डागिष्टेवाडी, असवलेवाडी, पापर्डे बुद्रुक आदी गावांमध्ये नव्याने रास्त भाव दुकाने होणार आहेत. ही दुकाने प्राधान्याने ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत बचत गटासाठी आहेत. त्यासाठी जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. सदर गावांमधून इच्छुकांकडून अर्ज मागविले जात आहेत.

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

शेळकेवाडी : वाढदिनी जपली सामाजिक बांधिलकी : ग्रामपंचायत सदस्य सौ.सुनंदा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

शेळकेवाडी : वाढदिनी जपली सामाजिक बांधिलकी : ग्रामपंचायत सदस्य सौ.सुनंदा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
शेळकेवाडी म्हसोली ता.कराड  ग्रामपंचायत सदस्य सौ.सुनंदा शेळके यांच्या42व्या  वाढदिवसानिमित्त शेळकेवाडी ता.कराड येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले.

शिबिराचे उदघाटन प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ.श्री नरेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले,तसेच या कार्यक्रमाला डॉ. नितीन जाधव,डॉ. सारीखा गावडे,डॉ सौ.सुक्ष्मा मोटे, आदर्श शिक्षिका निलिनी बैले, सौ.स्मिता पवार,शेळकेवाडी चे सरपंच श्री चंद्रकांत चोरगे,ग्रामसेविका सौ.कदम मॅडम ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब शेळके व कालवडे येथील ग्रामपंचायत सदस्य सौ.गीतांजली थोरात आदी प्रमुख उपस्थिती होती.
        शिबिराच्या उदघाटन प्रसंगी उपस्थितांना या शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते व त्याच प्रमाणे कार्यक्रमाला  200 पेक्षा अधिक लोकांनी शिबिराचा फायदा घेत  कार्यक्रमाची व शिबिराची शोभा वाढवली.
  तसेच हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा या साठी ग्रामपंचायत शेळकेवाडी व सर्व ग्रामस्थ मंडळ व युवक वर्ग यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करत हा कार्यक्रम पार पाडला हा शिबिराचा समारोप झाल्यानंतर  सौ.सुनंदा शेळके यांनी आभार मानले.

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

सातारच्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेस राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाची मान्यता -खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

कराड : प्रतिनिधी 
सातारा जिल्ह्यात मंजूर झालेल्या शासकीय महाविद्यालयासाठी केंद्रीय स्तरावरील आवश्यक असणारी अंतिम परवानगी अखेर मिळाली असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांच्या यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेऊन केलेल्या मागणीनुसार या कार्यवाहीस गती प्राप्त झाली होती. आता अंतिम परवानगी जाहिर झाल्याने सातारा मेडिकल कॉलेज सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.
   सातारा जिल्ह्यात मंजूर झालेल्या शासकिय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयार असलेल्या पर्यायी ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पाहणी दौऱ्या अभावी ही प्रवेश प्रक्रिया प्रलंबित राहिली होती. त्यामुळे सदर ठिकाणची पाहणी करून त्यासाठी आवश्यक असणारी अंतिम परवानगी तातडीने द्यावी अशी आग्रही मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीत केली होती. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान त्यांनी ही महत्वपूर्ण भेट घेतली होती.
    सातारा मेडिकल कॉलेजसाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी 495 कोटीचा भरून निधी व 62 कर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॉलेजसाठी मंजूर असलेल्या जागेवर इमारत बांधली जाणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. परंतू तोपर्यंत कॉलेजची प्रवेश प्रक्रिया रखडू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये व कॉलेज प्रत्यक्ष सुरू व्हावे याकरिता तात्पुरत्या स्वरूपात सातारा येथे तयार असलेल्या पर्यायी इमारतीत कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्याबद्दल शैक्षणिकदृष्ट्या लागणाऱ्या सर्व पायाभूत सोयीसुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र तरीही राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पहाणी अभावी येथील प्रवेश प्रक्रिया प्रलंबित राहिली होती. याची दखल घेत खा.श्रीनिवास पाटील यांनी मंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेऊन हा पाहणी दौरा आयोजित करून अंतिम परवानगी तातडीने द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर लगेचच आयुर्विज्ञान आयोगाच्या पथकाने दि. 12 ऑगस्ट रोजी सातारा येथे भेट देऊन ही पहाणी केली होती. तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या व्यवस्थेसह अन्य बाबींची त्यांनी सविस्तर पहाणी केली होती. त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी 100 विद्यार्थ्यांच्या पहिल्या सत्रासाठी अनुमती दिली आहे. त्यामुळे सातारा मेडिकल कॉलेजचा समावेश हा नुकत्याच राबविलेल्या नीट परिक्षेतून होणा-या त्यांच्या अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत समावेश होण्याची शक्यता आहे. ही अंतिम परवानगी मिळाल्याने मेडिकल कॉलेजची पहिली बॅच सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भात खा.श्रीनिवास पाटील यांनी तातडीने पाठपुरावा करून वेळेत केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. अन्यथा पहाणी दौ-या अभावी अद्याप इच्छुक विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्याची भिती व्यक्त केली जात होती.
    दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे पाठपुरावा केल्याने व त्यांनी देखील याची तात्काळ दखल घेऊन पथक पाठवल्यामुळे यास गती मिळाली आहे. याबद्दल मंत्री मनसुख मांडवीय यांचे खा.श्रीनिवास पाटील यांनी जिल्हावांसियांतर्फे आभार मानले आहेत.

पाटण तालुक्यात आज महालसीकरण

पाटण तालुक्यात आज महालसीकरण
पाटण : आज शुक्रवार दि. 17 सप्टेंबर रोजी पाटण तालुक्यात कोरोना ( COVID 19) लसीचे  महालसीकरण आयोजन करण्यात आले आहे.एकूण 17000 डोस उपलब्ध होणार आहेत.तरी नागरिकांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्तरावर येऊन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पाटण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद खराडे  यांनी केले आहे.

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

डाॅ.संदीप डाकवे व राजेद्र कुंभार यांनी मानले जाहीर आभार

डाॅ.संदीप डाकवे व राजेद्र कुंभार यांनी मानले जाहीर आभार
तळमावले/वार्ताहर
रविवार दि.12 सप्टेंबर, 2021 रोजी   दूरदर्शन सहयाद्री वाहिनीवर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा  शब्दचित्रकार डाॅ.संदीप डाकवे व उमरकांचन (जिंती) येथील शिल्पकार  राजेंद्र कुंभार यांची मुलाखत प्रसिध्द झाली होती. मुलाखत प्रसारित होण्यापूर्वी ती पाहण्याचे आवाहन या दोघांनी विविध वृत्तमानपत्रातील बातम्या, मोबाईल स्टेटस, इन्स्टाग्राम, मोबाईल डीपी, फेसबुक, वेब पोर्टल, पोस्ट व अन्य सोशल मिडीयावरुन आवाहन केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी इतरांना फोनवरुन व त्यांच्या सोशल मिडीयावरुन मुलाखतीची कल्पना दिली यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सदर मुलाखत पाहिली आहे. यातून या दोघांच्या कलेविषयी आणि उपक्रमांविषयी माहिती मिळाली आहे. यामुळे या दोघांनी मुलाखत पाहिलेल्या तसेच मुलाखतीचे फोटो, व्हीडिओ पाठवलेल्या सर्व लोकांचे, प्रेक्षकांचे मनापासून जाहीर आभार मानले आहेत. सर्वांनाच फोन करुन, मेसेज पाठवून देणे शक्य होणार नाही म्हणून त्यांनी या बातमीच्या माध्यमातून लोकांप्रती आपले ऋण व्यक्त केले आहे. पाटण तालुकावासियांना या दोघांचा अभिमान वाटत आहे.
काही कारणास्तव ज्यांना ही मुलाखत पाहणे शक्य झाले नाही. त्यांना हा अनुभव घेण्यासाठी त्या मुलाखतीची लिंक दिली आहे. ती पाहून आपण आपल्या प्रतिक्रिया शब्दचित्रकार डाॅ.संदीप डाकवे, मो. 9764061633,  शिल्पकार राजेंद्र कुंभार मो. 9702307019 यावर नक्की कळवाव्यात. तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने वेळोवेळी राबवत असलेल्या विधायक उपक्रमात सहभागी व्हावे याशिवाय आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहाव्यात असेही आवाहन त्यांनी केले आहे.
सदर मुलाखतीमुळे भविष्यात काम करण्यासाठी आणखी ऊर्जा आणि पाठबळ मिळाले असल्याची प्रतिक्रिया डाॅ.डाकवे आणि कुंभार यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!

मुलाखत पाहण्यासाठी लिंक.

https://youtu.be/eoniqfSHwiE

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

ढेबेवाडी : बनपुरीत देशी दारूचे 18 बॉक्स जप्त उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ढेबेवाडी : बनपुरीत देशी दारूचे 18 बॉक्स जप्त उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ढेबेवाडी प्रतिनिधी / मनोज सावंत

बनपुरी ता.पाटण दि.15 गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर  हातभट्टी दारू, ताडी व अवैध मद्य चोरटी वाहतुक वा वीक्री या वर  प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विशेष मोहीम राबविण्यात येत आहे त्यानुसार कराड विभागाच्या पथकाने बनपुरी ता.पाटण गावच्या हद्दीत सापळा रचून अवैध मद्याची  बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना बनपुरी  येथे ताब्यात घेतले. या प्रकरणी बुधवार दि.15  केलेल्या कारवाईत एकूण एक ह्युंदाई असेंट चारचाकी वाहन व देशी दारूचे 18 बॉक्स असा सर्व मिळून ५ लाख १ हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक शिरीष जंगम तसेच जवान भीमराव माळी,विनोद बनसोडे यांनी सहभाग नोंदवला यापुढे सदर कालावधीमध्ये अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे कराड विभागाचे उपनिरीक्षक श्री.शिरीष जंगम यांनी कुमजाई पर्व शी बोलताना सांगितले

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

वाझोली येथे माजी विध्यार्थी संघाची स्थापना

वाझोली येथे माजी विध्यार्थी संघाची स्थापना :

कुमजाई पर्व प्रतिनिधी / मनोज सावंत

वाझोली येथील जि. प.शाळेत गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व माजी विद्यार्थी व युवक एकत्र येत गावची शाळेला भेट देण्यात आली व यातून शाळेला लागणाऱ्या उपाययोजना व उज्वल यशासाठी एकत्र येत माजी विध्यार्थी संघ तयार करण्यात आला 
    माजी विद्यार्थी यांच्या वतीने तरुण तडफदार .श्री प्रवीण पाटील (सर) यांची संघाच्या अध्यक्ष पदी तर जयवंतराव मोरे यांची उपाध्यक्ष म्हणून तर सचिव पदी सुभाष मोरे यांची निवड करण्यात आली.
        या भेटीच्या आनंदासोबत आठवणींच्या दुनियेत रममान होताना डोळ्यांतून डोकावणारे अश्रूही अनेकांना थोपविता आले नाही. एकमेकांशी हितगूज करताना शालेय जीवनातील आठवणींची पाने परस्परांच्या साथीने उलगडू लागली. तसतसे भूतकाळात शिरताना आणि वर्तमानाची त्याच्याशी सांगड घालताना सर्वांनाच अनोख्या दुनियेची सफर घडली आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातील सुखानुभूतीचा प्रत्यय रोमांचित करून गेला.
         वाझोली गावच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप वीर यांनी व उपशिक्षक श्री सतीश कोकाटे यांनी प्रस्थावना व सूत्रसंचालन करत गावातील मुलांची गुणवत्ता ही अतिशय चांगल्या प्रकारे असून गावच्या शाळेसाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांची पूर्तता या कार्यक्रमातून बोलून दाखवली व सर्व माजी विद्यार्थी यांनी त्यांच्या सर्व मागण्या एकमताने मान्य केल्या.व या कार्यक्रमाचे आभार आनंदा मोरे यांनी व्यक्त केले.
      या कार्यक्रमासाठी माजी सरपंच अशोक मोरे ,पोलीस पाटील विजय सुतार, शाळा व्यवस्थापन चे अध्यक्ष आनंदा मोरे,शिवसेना तालुका प्रमुख राजेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन सदस्य संदीप पाटील,  अशोक मोरे,प्रकाश मोरे ,लालासो मोरे,निवास पाटील,विलास पाटील,,दिपक पाटील, इ.व गावातील सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

*शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्यासाठी 35 कोटी मंजूर*खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

*शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्यासाठी 35 कोटी मंजूर*
खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
कराड : प्रतिनिधी
    सातारा जिल्ह्यातून जाणा-या महाड-भोर-शिरवळ रा.मा.965 डी रस्त्यापैकी शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्याचे काम वार्षिक आराखडा 2021-22 अंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून या कामासाठी 35 कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
    सातारा जिल्ह्यातून रायगडकडे जाणा-या या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्ती, रूंदीकरण व मजबुतीकरण कामाचा सन 2021-22 वार्षिक आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सातारा जिल्हा हद्दीतील शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्याच्या कामासाठी 35 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुरव्याने हा निधी मंजूर झाला असून त्यातून रस्त्याची दुरुस्ती, रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे.
   दरम्यान सातारा जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आ.मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी वेळोवेळी मागणी केली होती. त्यासंदर्भात खा.श्रीनिवास पाटील यांनी सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांशी पत्रव्यवहार केला होता. तसेच याविषयी पाठपुरावा करून त्यांना तशी सूचना केली होती. त्यानुसार या कामास सन 2021-22 या वार्षिक आराखड्यामध्ये मंजुरी मिळाली आहे. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे नागरिकांचे व वाहनधारकांचे दळणवळण सुखकर होणार आहे. तर हे काम पूर्णत्वास जाणार असल्याने शिंदेवाडी परिसरातील नागरिकांनी खा.श्रीनिवास पाटील यांचे आभार मानले आहेत.

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

राज्यात १५ ऑक्टोबर पासून ऊसाचा गाळप हंगाम

१५ ऑक्टोबर पासून ऊसाचा गाळप हंगाम 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई दि.१३ : राज्यात २०२१-२२ साठी ऊसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जे कारखाने १५ ऑक्टोबर २०२१ पूर्वी उसाचे गाळप सुरु करतील त्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत, असा निर्णयही या बैठकीत सर्वसहमतीने घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री विश्वजित कदम, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी गुप्ता, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र बँकेचे संचालक विद्याधर अनास्कर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, साखर संघाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

अभ्यासगटाच्या अहवालावर तत्काळ निर्णय घ्यावेत

केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एफआरपी निश्चित करण्यासाठी साखर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या अभ्यासगटाने आपला अहवाल आज शासनास सादर केला असून, त्यावर सहकार विभागाने हा अहवाल ऊस नियंत्रण मंडळाकडे सादर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावेत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम तातडीने द्यावी

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम तातडीने द्यावी असेही बैठकीत निश्चित करण्यात आले. जे कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत आणि पूर्णत्वाने देत नाहीत अशा कारखान्यांकडे आगामी हंगामात गाळपासाठी ऊस द्यायचा किंवा नाही हे शेतकऱ्यांनी ठरवावे, यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या जाव्यात असेही बैठकीत निश्चित करण्यात आले.

राज्यातील १४६ साखर कारखान्यांनी एफएआरपीची १०० टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आल्यानंतर ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना पूर्णत्वाने दिली ते कारखाने सोडून इतर कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला. बँकांकडून मालतारण कर्जाची मिळणारी रक्कम कारखान्याने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, असेही निर्देशही बैठकीत देण्यात आले.

गाळप हंगाम २०२१-२२

गाळप हंगाम २०२१-२२ साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या एफआरपी दराप्रमाणे १० टक्के उताऱ्यासाठी २९०० रुपये प्रतिटन दर निश्चित करण्यात आला आहे. २०२१-२२ मध्ये राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र १२.३२ लाख हेक्टर असून ९७ टन प्रति हेक्टर उत्पादन अपेक्षित आहे. १०९६ लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज असून ११२ लाख टन साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली. या हंगामात अंदाजे १९३ साखर  कारखाने सुरु राहतील.

इथेनॉल निर्मिती

राज्यात सहकारी आणि खासगी मिळून ११२  कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्प राबविला जातो. व त्यातून २०६ कोटी लि. इथेनॉलची निर्मिती होते.  केंद्र शासनाने शुगर, शुगर सिरप आणि बी-हेवी  मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्याचे धोरण स्वीकारल्याने २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रणाचा लक्षांक पूर्णत्वाला जाईल असेही बैठकीत सांगण्यात आले.

ऊसाचे क्षेत्र ठिबकखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे

ऊस ठिबक सिंचनाखाली आणल्यास उत्पादन वाढते. ऊसाचे अधिकाधिक क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, यादृष्टीने विभागाने शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांच्यात जागृती निर्माण करावी असेही बैठकीत ठरले.

बैठकीत सहकारी साखर कारखान्यांच्यावतीने राज्य साखर संघाने केलेल्या मागण्यांची माहिती बैठकीत देण्यात आली. यावर बैठकीत सर्वंकष चर्चा करण्यात आली.

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

*राज्याचे गृह(ग्रामीण)राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचेकडून*टोल नाक्यावर थांबून गणेश भक्तांची विचारपूस*

*राज्याचे गृह(ग्रामीण)राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचेकडून*टोल नाक्यावर थांबून गणेश भक्तांची विचारपूस*

  सातारा दि. 9 : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगड व पुणे येथून खाजगी वाहनाने येणाऱ्या गणेश भक्तांना विविध टोल नाक्यावर काही अडचण आली आहे का याविषयी प्रवाशांची विचारपूस आज राज्याचे गृह(ग्रामीण)राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. 
 गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आनेवाडी टोलनाक व तासवडे टोलनाक्यावर प्रवाशांची विचारपूस करुन येणाऱ्या अडचणींबाबत जाणून घेतले.  यावेळी अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील  उपस्थित होते. 
 यावेळी श्री. देसाई यांनी  मुंबईहुन इथपर्यंत येण्यास आपणास   टोल नाक्यावर काही अडचण आली का? याबाबत प्रवाशांशी चर्चा करुन अडचणी जाणुन घेतल्या. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या. तसेच गणपती सणासाठी येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी टोलनाक्यावरील व्यवस्थापकांना योग्य त्या सुचना केल्या. गणेश भक्तांनी व गणेश मंडळांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत शासनाने घालुन दिलेल्या निर्देशाचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करुन गणेशोत्सवानिमित्त राज्यातील सर्व जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.  

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

*रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर ४५ कोटीचा अद्ययावत पूल होणार* *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती ; जुना पूल मे अखेरीस पूर्ववत होणार.*

 *रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर ४५ कोटीचा अद्ययावत पूल होणार* 

 *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती ; जुना पूल मे अखेरीस पूर्ववत होणार.* 


 *कराड, प्रतिनिधी :* रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा नदीवर ४५ कोटी रुपये खर्चाचा नवीन उभारला जाणार आहे. व जुन्या पुलाची दुरुस्तीही होणार आहे. या दोन्ही कामांना शासनाने प्राधान्य दिले आहे. दोन्ही पुलाच्या कामी एकूण 51 कोटी रुपये खर्च होणार आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरीस जुना पूल दुरुस्त होईल. व त्यावरील वाहतूक पूर्ववत होईल. व नवीन पुलाचे दोन वर्षात काम पूर्ण होणार आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

आ. चव्हाण यांच्या प्रयत्नातून रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवर नवीन पुल बांधला जाणार व जुन्या पुलाची दुरुस्ती होणार आहे. नवीन पुलासाठी जमीन धर तपासणीचे काम नुकतेच सुरू झाले आहे. या कामाची आ. चव्हाण यांनी आज सकाळी पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव, उपअभियंता ए. जे. हुद्दार, शाखा अभियंता डी. एन. जाधव, कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, पैलवान नानासाहेब पाटील, नरेंद्र नांगरे - पाटील, शिवाजीराव मोहिते, जे. डी. मोहिते, मदनराव मोहिते, अमरसिंह मोहिते, कृष्णत चव्हाण - पाटील, कराड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. शोभाताई सुतार, दिग्विजय उर्फ आबा सुर्यवंशी, बिपीन उर्फ सनी मोहिते, धनंजय मोहिते, शरद पाटील, राम मोहिते, धनाजी शिंदे, देवदास माने, विनोद पाटील, महेश कणसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सुरुवातीस बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आ. चव्हाण यांनी कामाचा आढावा घेतला. नवीन पुलाचे 20 मीटरचे 15 गाळे तयार होवून तो सद्याच्या पुलापेक्षा 12 फूट उंच होणार आहे. त्याचा पाया भक्कम असेल. व तो तयार झाल्यानंतर त्याची भार क्षमता चाचणी केली जाणार आहे. येत्या मे अखेरीस जुना पूल दुरुस्त होईल. असे अधिकाऱ्यांनी आढाव्यात नमूद केले.

आ. चव्हाण म्हणाले, जुना पूल 6 कोटी रुपये खर्चून दुरुस्त होणार आहे. तो मे अखेरीस पूर्ववत होईल. नवीन पुलाचे मद्रास येथील आयटी तज्ञांनी डिझाईन केले आहे. तो पूल उंची होवून अद्ययावत होणार आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर जुना व नवीन हे दोन्हीही पुल वाहतुकीस उपयुक्त ठरणार आहेत. त्यावर एकेरी वाहतूक होणार आहे.
------------------
 


मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

*सातारा ; एकरकमी कर्ज परतफेड योजनेस 31 मार्च 2022 अखेर मुदतवाढ*

*सातारा ; एकरकमी कर्ज परतफेड योजनेस 31 मार्च 2022 अखेर मुदतवाढ*
सातारा दि. 7 : जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकाकरीता शासनाने एकरकमी कर्ज परतफेड योजनेस  दि. 31 मार्च 2022 अखेर मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती मनोहर माळी अवसायक सातरा जिल्हा सहकारी कृषी गामीण बहुद्देशीय विकास बँक मर्या. सातारा तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांनी दिली. 
 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार संभासदांनी मुदतीत अर्ज द्यावेत. या योजनेचा लाभ घेतल्याने कर्जदार कमी रक्कम भरून कर्जमुक्त होणार असून, त्यांच्यातारण गटावरील बँकेच्या बोजाची नोंदही कमी होणार आहे. या योजने अंतर्गत व्याजाची आकारणी 6 टक्के दराने सरळव्याजाने करण्यात येणर आहे. तरी शासनाच्या या एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे. 

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

डाॅ.संदीप डाकवे यांची दुरदर्शन सहयाद्री वाहिनीवर मुलाखत

डाॅ.संदीप डाकवे यांची दुरदर्शन सहयाद्री वाहिनीवर मुलाखत
तळमावले/वार्ताहर
दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरील ‘विचारांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांची 
विशेष मुलाखत रविवार दि.12 सप्टेंबर, 2021 रोजी रात्री 7.30 वाजता व पुनःप्रक्षेपण रात्री 10 वाजता दाखवण्यात येणार आहे. सुप्रसिध्द अभिनेता व निवेदक रोहन गुजर यांनी ही मुलाखत घेतली आहे. डाॅ.संदीप डाकवे आणि शिल्पकार राजेंद्र कुंभार यांची दूरदर्शनवरील मुलाखत तमाम पाटण तालुका वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या मुलाखतीसाठी त्यांना डाॅ.आलोक खोब्रागडे, हस्ताक्षर संग्राहक निकेत पावसकर व इतर मान्यवर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
डाकेवाडीसारख्या ग्रामीण भागात राहून डाॅ.डाकवे यांनी विविध कलात्मक छंद जोपासले आहे. ही मुलाखत अर्ध्या तासाची असून ती जास्तीत जास्त रसिकांनी पहावी असे आवाहन डाॅ.संदीप डाकवे व ‘विचारांच्या पलीकडले’ या कार्यक्रमाचे निर्माते डाॅ.आलोक खोब्रागडे यांनी केले आहे.

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

कोरोना संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज - ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत.

कोरोना संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज -  ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत.

कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी!

मुंबई, दि.५ : कोविडपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून त्याच्याबरोबरच कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे, आजार होऊन उपचार करण्यापेक्षा हा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याची गरज आज ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी अधोरेखित केली.

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाने उद्घाटन झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या परिषदेत राज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले आणि जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

… तर कोविड पसरण्याची शक्यता – डॉ. मेहुल मेहता

अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातील डॉ. मेहुल मेहता यांनी संभाव्य तिसरी लाट आणि त्यामागची कारणे शोधली पाहिजे असे सांगून आज कोरोना संपला असे आपल्याला वाटायला लागले म्हणून अनेक लोक मास्क वापरत नाहीत, सण, उत्सव, विवाह, पार्टी सोहळे मोठ्या संख्येने करायला लागले त्यातून कोविड पसरण्याची शक्यता आहे. अजूनही लस घेतलेल्यांची संख्या कमी आहे. त्यातच विषाणूमध्ये बदल होत असून डेल्टाचा फैलाव वेगाने होतो आहे, डेल्टानंतर कोलंबियामध्ये नवा स्ट्रेन आढळून आल्याचे सांगून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉ. मेहता यांनी केले.

प्रत्येकाने ‘जाणता मी, जबाबदार मी’ भूमिका घेण्याची गरज- डॉ. संजय ओक

संभाव्य लाटेची शक्यता गृहित धरून राज्य शासन, डॉक्टर्स, रुग्णालये यांनी तयारी सुरु केली आहे, मात्र या संपूर्ण प्रक्रियेत कोरोनाच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याची गरज कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली. कोविडची विविध लक्षणे आढळली, काही रुग्णांना चव आणि वास येत नाही, पोटरीचे स्नायू आणि पाटदुखी वाढली, डायरिया, उलटी होण्याचे लक्षणे दिसले. त्रास झाला किंवा कोणतीही लक्षणे दिसली तर ‘कोविड नाही ना?’ हा प्रश्न प्रत्येक डॉक्टर्सने आणि सुजाण नागरिकाने आपल्या मनाला विचारणे आवश्यक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ नंतर ‘जाणता मी, जबाबदार मी’ ही भूमिका घेण्याची गरजही डॉ. ओक यांनी व्यक्त केली.

दुखणं अंगावर काढण्याची सवय महागात पडू शकते, यात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची असून आपल्या रुग्णांची केवळ स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, लॅप्टो आदी आजारांची लक्षणे एकसारखीच असून एनएसवनएनएसटू बरोबरच मलेरिया, लॅप्टोच्या चाचण्यांसह कोविडसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचेही डॉ. ओक यांनी सांगितले. कोविड हे तीन आठवड्याचे दुखणे आहे, त्यातील दुसऱ्या आठवड्यातील शेवटचे दिवस हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तीन आठवडे काळजीपूर्वक विलगीकरणात अथवा रुग्णालयात राहून काळजी घेण्याची गरज आहे. कोविड झाल्यानंतर उपचार, विलगीकरण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे आवश्यक असून हा रोग लपविण्याची कोणतीही आवश्यकता नाही, शासन दरबारी याची नोंद होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.  दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसचा फटका बसला त्याच्या निदानासाठी सिटी स्कॅनपेक्षा एमआरआय करणे आवश्यक असल्याचे सांगतानाच सध्या तरी कोविडपासून संरक्षणासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून मास्क घालणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे सांगण्याची वेळ आली आहे, असेही डॉ. ओक यांनी सांगितले.

प्रत्येक स्ट्रेनवर मास्क प्रभावी- डॉ. शशांक जोशी

मास्क घालून कोविडला घराच्या उंबरठ्याच्याबाहेरच ठेवणे हे आपले सर्वाचे आद्यकर्तव्य असल्याचे डॉ. शशांक जोशी यावेळी म्हणाले. कोरोनाच्या या पहिल्या, दुसऱ्या लाटेत आपल्याला हर्ड आणि हायब्रीड इम्युनिटी पहायला मिळाली.  राज्य शासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष पुरवल्यामुळे धारावीत परिस्थिती यशस्वीपणे हाताळता आली, दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये रोजची रुग्णसंख्या २० पेक्षा अधिक आढळले नाहीत हे केवळ हर्ड इम्युनिटीमुळे झाल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले. कोविडची लक्षणे आढळली तरी विलगीकरणात राहून संपर्क तोडा, चाचणी करा, ऑक्सिजन दर, नाडीचे ठोके, ताप, आदींच्या नोंदी करा, ज्यांच्या संपर्कात आलात त्यांनाही चाचणी करायला सांगा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांशी डॉक्टरांनी बोलण्याचे आवाहन करतानाच मास्क हा प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी असून दुहेरी मास्क संरक्षणासाठी मजबूत ढाल असल्याचेही यावेळी डॉ. जोशी यांनी सांगितले.

लक्षणे दिसताच चाचणी करा- डॉ. राहुल पंडित

फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित म्हणाले की, कोविडने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या, शिस्त लावली. एखाद्या गुरुसारखे कोविडने आपल्याला शिकवले आहे. नव्या लक्षणांकडे लक्ष ठेवतानाच हाय रिस्क फॅक्टरमधील रुग्णांना जपण्याचे आवाहन त्यांनी केले. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करतानाच रोज मास्क बदला आणि ओला झालेला मास्क कधीही लावू नका तो तात्काळ बदलण्याच्या सूचना देतानाच कोविडचे लक्षणे दिसली की वेळेत चाचण्या करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑक्सिजन प्रमाण ९३ पेक्षा कमी झाले असेल तर पोटावर झोपण्याचा सल्ला आम्ही देतो, त्याचे निश्चितच चांगले परिणाम बघायला मिळतात.

कोविडपश्चात जीवनशैली चांगली ठेवा- डॉ. अजित देसाई

डॉ. अजित देसाई कोविड पश्चात लक्षणे ही मुख्यतः ४ ते १२ आठवडे असतात, ही केवळ गंभीर रुग्णांमध्येच नाहीत तर साधारण आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा ही लक्षणे दिसतात. सहा महिन्यापर्यंत ही लक्षणे असली तरी ती दीर्घ काळची लक्षणे मानले जातात, थकवा, सांधेदुखी, श्वसनास त्रास, ताणतणाव, निद्रानाश, भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून तणावात जाणे, डोकेदुखी, छातीत वेदना आदी त्रास होतात. कोविड लक्षणांच्या काळात ईसीजीमध्ये अथवा टूडी इको मध्ये काही आढळल्यास त्यावर उपचार करणे खूप आवश्यक असते. ताण तणाव, चिंता असेल तेव्हा कुटुंबातील सदस्य, मित्रांबरोबर बोला त्यापेक्षाही अधिक गंभीर स्वरुपाचा तणाव असेल तर मानसोपचार तज्ज्ञांशी बोलण्याचा सल्ला देऊन कोविड पश्चात आपली जीवनशैली अधिकाधिक चांगली ठेवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. देसाई यांनी केले.

पहिल्या दोन लाटांमध्ये मुलांमध्ये कमी संक्रमण- डॉ. सुहास प्रभू

बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनी कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत कोणती काळजी घेतली पाहिजे यावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि काही पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. पहिल्या दोन लाटेमध्ये मुलांमध्ये कोविडचे कमी संक्रमण झाले. मुलांनी देखील संभाव्य धोका लक्षात घेता मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

ज्या मुलांमध्ये संक्रमण झाले तर त्याची तीव्रता सर्वसाधारणपणे सौम्य असते, त्यांच्यावर घरीही उपचार करू शकतो, रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत, गंभीर लक्षणे आढळल्यास मुलांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहेत, मुलाबरोबर पालकापैकी एकाला या मुलांसाठीच्या कोविडसेंटरमध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली आहे असे सांगून या आजारामुळे मुलांना मानसिक त्रास होऊ नये याकरिता त्यांच्याशी फोनवरुन अथवा इतर माध्यमांद्वारे संवाद साधणे अधिक गरजेचे आहे. शाळा सुरू होण्याअगोदर पुरेशी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रभू यांनी सांगितले. नवजात शिशु आणि आई यांची काळजी घेत असतानाच आईला जर कोविड असेल तर बाळाची आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

*सावली प्रतिष्ठानचा शिक्षकदिनी ग्रंथालय उभारणीचा शुभारंभ*

*सावली प्रतिष्ठानचा शिक्षकदिनी ग्रंथालय उभारणीचा शुभारंभ*
प्रतिनिधी / कुणाल माने
पाटण : सावली प्रतिष्ठान कुंभारगाव या सामाजिक संस्थेतर्फे आज 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी चिखलेवाडी येथे भव्य ग्रंथालय उभारणीचा शुभारंभ झाला.
सावली प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था असून अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. या संस्थेमार्फत अनेक शाळांना त्यांनी पुस्तके वाटप केलेले आहेत तसेच वेगवेगळ्या ऑनलाईन स्पर्धेचे नियोजन केलेले आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून या संस्थेने ग्रंथालय उभारणीचा भव्य शुभारंभ घडवून आणला. याप्रसंगी पाटण पंचायत समितीचे उपसभापती मा. रमेश मोरे, सावली प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा. सुरेश यादव, अध्यक्ष श्री. विक्रम वरेकर, खजिनदार श्री. सुरेश चिखले, सदस्य प्रमोद मोरे, सागर मोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मा. रमेश मोरे यांच्याकडून प्रतिष्ठानला चाळीस पुस्तके, श्री. अरुण मोरे फौजी यांच्याकडून दहा पुस्तके, प्रा. शोभा चाळके - म्हमाणे यांच्याकडून वीस पुस्तके, प्रा.सुरेश यादव यांच्याकडून पाच पुस्तके, प्रा. दादासाहेब माटेकर, प्रा. वनिता माटेकर, श्री. सुरेश चिखले यांचेकडून पाच पुस्तके, श्री. उत्तम मोरे यांच्याकडून पाच पुस्तके भेट देण्यात आली. तसेच युवा उद्योजक श्री. जालींदर यादव यांच्याकडून ग्रंथालयासाठी कपाटे भेट देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठान कडून शिक्षक दिनी प्रा. रमेश मोरे, प्रा. सुरेश यादव, प्रा.सुरेश चिखले सर यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी श्री रमेश मोरे म्हणाले, सावली प्रतिष्ठानचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. प्रतिष्ठाने खूप चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करावे आणि आम्ही लागेल ते मदत करू. यावेळी त्यांनी प्रतिष्ठानला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक प्रा. सुरेश यादव म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. एमपीएससी, यूपीएससी यासारख्या स्पर्धापरीक्षा पासून आज खेडेगावातील विद्यार्थी योग्य मार्गदर्शनवाचून वंचित आहे. त्यामुळे सावली प्रतिष्ठान कडून या गोष्टीचा विचार करून ग्रंथालय उभे करत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. विक्रम वरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सदस्य श्री. प्रमोद मोरे यांनी केले आणि खजिनदार श्री. सुरेश चिखले सर यांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

*काळगाव ; कुठरे येथील शिक्षकांच्या कलेचे होतंय कौतुक*

*काळगाव ; कुठरे येथील शिक्षकांच्या कलेचे होतंय कौतुक*
काळगाव / मनोज सावंत
कुठरे ता.पाटण, दि.4 लॉकडाऊन मध्ये अनेक लोक घरी बसून, असल्याने त्यांना विविध छंद जोपासले आहेत.त्यापैकीच एक म्हणजे सातारा  जिल्ह्यातील  पाटण  तालुक्यातील कुठरे  गावचे रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त कला शिक्षक दामोदर दीक्षित. दीक्षित सरांनी लॉक डाऊनमधील मोकळ्या वेळेत पिंपळाच्या  पानांवर व्यक्तिरेखांसह विविध प्रकारची आकर्षक आणि हुबेहूब चित्रे साकारली आहेत.
सध्या त्यांच्या या छंदाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आपली ही अनोखी कला केवळ आपल्या जवळच मर्यादित न राहता सर्वांना ती समजावी म्हणून लवकरच ते शाळा - महाविद्यालये सेवाभावी संस्था, व्यक्ती आणि मंडळांच्या माध्यमातून या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करत आहेत. विद्यार्थी  आणि नवोदित चित्रकारांना त्यातून प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचा त्यांचा संकल्प आहे.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...