एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पाटण विभाग काळगाव ग्रामपंचायत पवारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि २८/९/२०२१ रोजी पोषण माह अंतर्गत काळगाव विभागाच्या बीट स्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रांगोळी,पोषण शिडी,सेल्फी पॉइंट,घोषवाक्ये, पोस्टर्स,पथनाट्य,आहार मनोरा ई माध्यमातून पोषण विषयक संदेश देण्यात आले. ग्रा प पवारवाडी चे सरपंच मा.दत्तप्रसाद कदम यांनी पाककृती स्पर्धेतील विजेते व सहभागी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.तसेच सर्व सेविका,मदतनीस यांच्या पोषण अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान केला गेला.
यावेळी कृष्णा हॉस्पिटल कराड येथील आहार तज्ज्ञ कोमल सावंत मानसोपचार तज्ज्ञ शुभांगी जमाले यांचे मार्गदर्शन लाभले. जन सहकार निधी लिमिटेड , तळमावले चे संस्थापक तथा सातारा जिल्हा समन्वय व सनियंत्रण (दिशा) चे सदस्य मा. मारुती मोळावडे यांचे मार्फत स्तनदा माताना पोषण आहार किट वाटप करण्यात आले.कार्यक्रमास विभागातील मा. सरपंच,ग्रामसेवक,आरोग्य कर्मचारी, जि प प्रा शाळेतील शिक्षक,icds पर्यवेक्षिका अरूंधती गरुड,कुसुम दीक्षित ,सचिन ताईगडे ,सरपंच आत्माराम पाचूपते,किशोरी,पालक,गरोदर माता, ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा