ही घटना ताजी असताना, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. येथील एका तरुणाने भरदिवसा अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा गळा चिरला आहे. यानंतर आरोपीनं स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत मुलगी आपल्या घरात टीव्ही बघत बसली होती. तर तिची तीन वर्षांची लहान बहिणी अंगणात खेळत होती. यावेळी मृत मुलीची आईही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं मुलीच्या घरात प्रवेश केला.
मुलीला काही कळायच्या आत आरोपीनं तिचं तोंड दाबलं आणि तिच्या गळ्यावरून धारदार चाकू फिरवला.थंड डोक्याने केलेल्या या हल्ल्यानंतर पीडित मुलगी घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतर संशयित आरोपी अनिकेत मोरे (२०, रा. शिरंबे, कोरेगाव) स्वत: मल्हारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन हजर राहिला. तसेच त्याने संबंधित मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

हत्या झालेली मुलगी ही सतरा वर्षांची असून ती पाटण तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होती. तर 20 वर्षीय आरोपी अनिकेत मोरे हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपी मृत तरुणीच्या मागे लागला होता.
दरम्यान त्याने मृत मुलीच्या आईची भेट घेऊन लग्नासाठी मागणी देखील घातली होती. पण मुलीच्या आईने लग्नासाठी नकार दिला होता. मुलीच्या आईने लग्नासाठी नकार दिल्याने आरोपीच्या मनात मुलीबद्दल आणि तिच्या आईबद्दल रोष वाढला होता. यातूनच आरोपीनं संबंधित अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा