तळमावले प्रतिनिधी /मनोज सावंत तळमावले.ता.पाटण दि.29 मर्चंड सिंडकेट ग्रामीण बिगरशेती सहकारी क्रेडिट संस्थेची वार्षिक 14 वी सर्वसाधारण सभा आज मंगळवार दिनांक 28.09.2021 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता संस्थेच्या तळमावले येथील मुख्य कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.प्रारंभी देशातील हुतात्मे, राजकीय नेते, पूरग'स्त तसेच कोविडमुळे मृत नागरिक, सभासद व ठेवीदारांना आदरांजली वाहण्यात आली.
विषयपत्रिकेवरील 10 विषयांवर सविस्तर चर्चा होऊन सर्व ठराव बहुमताने पारित करण्यात आले. संस्थेला या आर्थिक वर्षात 8 लाख 22 हजार 927 रुपये नफा झाला आहे अशी माहिती चेअरमन अनिल शिंदे यांनी दिली.
सभेच्या अध्यक्ष स्थानी चेअरमन अनिल निवृत्ती शिंदे हे होते. यावेळी व्हा.चेअरमन राजेश शंकर करपे,संचालक ज्ञानदेव श्रीपती जाधव,शिवाजी भाऊसो देसाई,लक्ष्मण मारुती मत्रे,महेश हरिभाऊ कोकाटे,सल्लागार सुरेश देसाई,कायदेशीर सल्लागार अँड.अधिक चाळके ,शिवसेना पाटण तालुका उपअध्यक्ष सागर नलावडे, कुमजाई पर्व न्यूजचे प्रतिनिधी मनोज सावंत,उपसरपंच अधीकराव माने,रामचंद्र पाचूपते , आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा