ढेबेवाडी : बनपुरीत देशी दारूचे 18 बॉक्स जप्त उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
ढेबेवाडी प्रतिनिधी / मनोज सावंत
बनपुरी ता.पाटण दि.15 गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हातभट्टी दारू, ताडी व अवैध मद्य चोरटी वाहतुक वा वीक्री या वर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विशेष मोहीम राबविण्यात येत आहे त्यानुसार कराड विभागाच्या पथकाने बनपुरी ता.पाटण गावच्या हद्दीत सापळा रचून अवैध मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना बनपुरी येथे ताब्यात घेतले. या प्रकरणी बुधवार दि.15 केलेल्या कारवाईत एकूण एक ह्युंदाई असेंट चारचाकी वाहन व देशी दारूचे 18 बॉक्स असा सर्व मिळून ५ लाख १ हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक शिरीष जंगम तसेच जवान भीमराव माळी,विनोद बनसोडे यांनी सहभाग नोंदवला यापुढे सदर कालावधीमध्ये अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे कराड विभागाचे उपनिरीक्षक श्री.शिरीष जंगम यांनी कुमजाई पर्व शी बोलताना सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा