कुमजाई पर्व प्रतिनिधी / मनोज सावंत
वाझोली येथील जि. प.शाळेत गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व माजी विद्यार्थी व युवक एकत्र येत गावची शाळेला भेट देण्यात आली व यातून शाळेला लागणाऱ्या उपाययोजना व उज्वल यशासाठी एकत्र येत माजी विध्यार्थी संघ तयार करण्यात आला
माजी विद्यार्थी यांच्या वतीने तरुण तडफदार .श्री प्रवीण पाटील (सर) यांची संघाच्या अध्यक्ष पदी तर जयवंतराव मोरे यांची उपाध्यक्ष म्हणून तर सचिव पदी सुभाष मोरे यांची निवड करण्यात आली.
या भेटीच्या आनंदासोबत आठवणींच्या दुनियेत रममान होताना डोळ्यांतून डोकावणारे अश्रूही अनेकांना थोपविता आले नाही. एकमेकांशी हितगूज करताना शालेय जीवनातील आठवणींची पाने परस्परांच्या साथीने उलगडू लागली. तसतसे भूतकाळात शिरताना आणि वर्तमानाची त्याच्याशी सांगड घालताना सर्वांनाच अनोख्या दुनियेची सफर घडली आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातील सुखानुभूतीचा प्रत्यय रोमांचित करून गेला.
वाझोली गावच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप वीर यांनी व उपशिक्षक श्री सतीश कोकाटे यांनी प्रस्थावना व सूत्रसंचालन करत गावातील मुलांची गुणवत्ता ही अतिशय चांगल्या प्रकारे असून गावच्या शाळेसाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांची पूर्तता या कार्यक्रमातून बोलून दाखवली व सर्व माजी विद्यार्थी यांनी त्यांच्या सर्व मागण्या एकमताने मान्य केल्या.व या कार्यक्रमाचे आभार आनंदा मोरे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच अशोक मोरे ,पोलीस पाटील विजय सुतार, शाळा व्यवस्थापन चे अध्यक्ष आनंदा मोरे,शिवसेना तालुका प्रमुख राजेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन सदस्य संदीप पाटील, अशोक मोरे,प्रकाश मोरे ,लालासो मोरे,निवास पाटील,विलास पाटील,,दिपक पाटील, इ.व गावातील सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा