सातारा दि. 7 : जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकाकरीता शासनाने एकरकमी कर्ज परतफेड योजनेस दि. 31 मार्च 2022 अखेर मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती मनोहर माळी अवसायक सातरा जिल्हा सहकारी कृषी गामीण बहुद्देशीय विकास बँक मर्या. सातारा तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांनी दिली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार संभासदांनी मुदतीत अर्ज द्यावेत. या योजनेचा लाभ घेतल्याने कर्जदार कमी रक्कम भरून कर्जमुक्त होणार असून, त्यांच्यातारण गटावरील बँकेच्या बोजाची नोंदही कमी होणार आहे. या योजने अंतर्गत व्याजाची आकारणी 6 टक्के दराने सरळव्याजाने करण्यात येणर आहे. तरी शासनाच्या या एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा