शेळकेवाडी : वाढदिनी जपली सामाजिक बांधिलकी : ग्रामपंचायत सदस्य सौ.सुनंदा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
शेळकेवाडी म्हसोली ता.कराड ग्रामपंचायत सदस्य सौ.सुनंदा शेळके यांच्या42व्या वाढदिवसानिमित्त शेळकेवाडी ता.कराड येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले.
शिबिराचे उदघाटन प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ.श्री नरेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले,तसेच या कार्यक्रमाला डॉ. नितीन जाधव,डॉ. सारीखा गावडे,डॉ सौ.सुक्ष्मा मोटे, आदर्श शिक्षिका निलिनी बैले, सौ.स्मिता पवार,शेळकेवाडी चे सरपंच श्री चंद्रकांत चोरगे,ग्रामसेविका सौ.कदम मॅडम ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब शेळके व कालवडे येथील ग्रामपंचायत सदस्य सौ.गीतांजली थोरात आदी प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराच्या उदघाटन प्रसंगी उपस्थितांना या शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते व त्याच प्रमाणे कार्यक्रमाला 200 पेक्षा अधिक लोकांनी शिबिराचा फायदा घेत कार्यक्रमाची व शिबिराची शोभा वाढवली.
तसेच हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा या साठी ग्रामपंचायत शेळकेवाडी व सर्व ग्रामस्थ मंडळ व युवक वर्ग यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करत हा कार्यक्रम पार पाडला हा शिबिराचा समारोप झाल्यानंतर सौ.सुनंदा शेळके यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा