संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०
तळमावले : ‘अक्षरगणेशा’ उपक्रमास सहकार्य करण्याचे ‘सेलिब्रिटीं’चे आवाहन
सातारा ; जिल्ह्यातील नवीन 489 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित तर 15 बधीताचा मृत्यु
रविवार, ३० ऑगस्ट, २०२०
तळमावले : मत्रेवाडीच्या घाटात दरड कोसळली
अनलॉक 4 संदर्भात नवीन नियम केंद्र सरकारने जारी: काय आहेत नवे नियम ?
शाळा बंद असल्या तरी अनलॉक 4.0 मध्ये नववीच्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल तेव्हा शाळेत जायची परवानगी देण्यात आली आहे.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता ई पास किंवा परवानगीची आवश्यकता नाही.
काय आहेत नवे नियम
- थिएटर, मनोरंजन केंद्र, स्विमिंग पूल राहणार बंद
- शाळा बंदच, पण एका वेळी 50 टक्क्याहून कमी शिक्षकांना शाळेत बोलवायला परवानगी
- ऑनलाईन शिक्षणासंदर्भात कामासाठी निम्मे शिक्षक शाळेत जाऊ शकतात.
- नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी.
- शिक्षकांकडून मार्गदर्शन, पुस्तकं किंवा इतर साहित्य घेण्यासाठी माध्यमिक - शाळेतले विद्यार्थी पालकांच्या परवानगीने शाळेत शिक्षकांना भेटायला जाऊ शकतात.
- वय वर्षं 65 आणि त्यापुढच्या व्यक्तींनी ज्यांना काही आजार आहेत अशांनी आणि 10 वर्षांच्या आतल्या मुलांनी घरातच राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. गरोदर स्त्रियांनीही गरज असल्याखेरीज घराबाहेर पडू नये.
- सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक किंवा राजकीय संमेलनांना परवानगी नाही. पण 21 सप्टेंबरपासून नियम होणार शिथिल
- कुठल्याही प्रकरच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 100 जणांनी एकत्र यायला 21 सप्टेंबरनंतर परवानही. पण प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर वापरणं बंधनकारक. प्रत्येकाच्या शरीराचं तापमान मोजूनच संमेलनाला जायची परवानगी
- 21 सप्टेंबरपासून ओपन एअर थिएटर उघडायला परवागनी. एसी सिनिमा हॉल बंदच राहणार
- राज्यांतर्गत किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायला परवानगीची आवश्यकता नाही
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
सातारा ; जिल्ह्यातील 620 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु*
शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०
सातारा : जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार @ 669 बाधित.
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०
सातारा : 332 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 533 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा;जिल्ह्यातील नवीन 575 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित;
गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०
सातारा : जिल्ह्यातील नवीन 505 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 11643 वर; आतापर्यंत 333 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यु
बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०
सातारा जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु*
**मी जवळून पाहिलेले साहेब*
**मी जवळून पाहिलेले साहेब*
1967 पासुन माझ्या ढेबेवाडी विभागातील जनतेवर होत आलेली कृपादृष्टी म्हणजेच भुकंपापासुन आजोबा पासुन आजपर्यंत विभागातील जनतेवर एखाद्या कुटुंबातील सदस्या सारखे लक्ष केंद्रित करत जर कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त साहेब. ........माझे वडील माझ्या गावच्या लोकांना सांगत असत त्या वेळी मी लहान असताना ऐकत असायचो म्हणायचे "आर लोकांनो आपल्या घराच्या छपराला पत्र दिल कीर! देसाई सायबानी ! म्हणजे देसाई साहेबांनी दिलेले पत्रे आजुन ही विचाररुपी शाबूत आहेत! !तसे मंत्री साहेबांच्या जवळ येण्यास मला उशीरच झाला. ..त्याची ऊणीव मी माझ्या साहेबांना फारच त्रास देत भरुन काढण्याचा मी प्रयत्न करत आहे! साहेब माझ्या वर रागवतही असतील कदाचित परंतु काय करणार गावची नैसर्गिकरीत्या स्थितीच तसी आहे. गाव सह्याद्री च्या कुशीत कडेकपारी डोगर खोऱ्यात सातारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला वसलेले आहे तसी गावची लोकसंख्या बेताचीच 450 च्या आसपास तरीही साहेबांचे बारीक लक्ष राहते हेच आमच्या साठी लाख मोलाचे आहे. आपला देश स्वतंत्र होऊन जवळपास 73 वर्षे होत आहेत परंतु माझ्या गावात साधी सायकल चालत नव्हती? आज साहेबांनी जवळपास चार कोटी रुपये मंजूर केले ढेबेवाडी ते जिंती ते मोडकवाडी ते सातर आज घडीला रस्त्याचे काम सुरू आहे! गावातील खास करुन महिला वर्गातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती! त्यावर सुध्दा साहेबांनी उपाययोजना केली. जवळपास 23 लाखांची पिण्याच्या पाण्यासाठी स्कीम सध्या सुरू होणार आहे! आमच्या ढेबेवाडी विभागात चांगले नेते झाले ढेबेवाडी विभागातच काय पाटण तालुक्यात सुद्धा नेते आहेत! परंतु होईल बघतो तुम्ही जावा काम होईल परंतु कोणत्याही नेत्यांनी हिम्मत दाखवली नाही! ती फक्त माझ्या मंत्री महोदय साहेबांनी दाखवत शिवसेनेचे ब्रिद वाक्य खरे करून दाखवले! आज साहेबांनी ज्या दिवशी मंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवसापासून आज पर्यंत 24×7 नुसते काम! आणि काम. परंतु साहेब आपण दिवसातून थोडा आराम करावा तब्येत चांगली संभाळा माझ्या जिवनात आज पर्यंत आपल्या तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीला ईतके काम करताना पाहिले नाही! आज सगळीकडे एवढी कोरोनामुळे भयानक वातावरण निर्माण झाले आहे तरी स्वत:ची काळजी न करता अहोरात्र काम आणि जणतेची सेवा करणारे माझे मंत्री साहेबांना ! मानाचा मुजरा !जय महाराष्ट्र!आपला लहान कार्यकर्ता! रमेश साळुंखे! सातर
मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०
तळमावले : कोरोनाला हरवून पोलीस पाटील योद्धा घरी.
सातारा ; जिल्ह्यातील 496 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु
सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०
तळमावले : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या जीर्णाेध्दारासाठी मदत करण्याचे आवाहन
*सातारा दि.24 : जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 443 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु*
सातारा दि.23- जिल्ह्यात करोनाच्या धडाका सुरुच असून रविवारी एकाच दिवसात आजपर्यंतचे उच्चांकी म्हणजे 443 जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 10157 झाली आहे.
करोनामुळे रविवारी दहा रुग्णांचा म्रुत्यू झाला. त्यामुळे करोनाच्या एकूण बळींची संख्या 306 झाली आहे. रविवारी रात्री उशिरा पाँझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील
*जिल्ह्यातील 443 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु*
सातारा दि.24 : जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 443 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
*कराड* तालुक्यातील हरपळवाडी 1, ओंड 2, कराड 12, हजारमाची 3, आगाशिवनगर 2, मसुर 1, सावडे 2, वाठार 2, जुलेवाडी 1, मंगळवार पेठ 2, खोडशी 1, मलकापूर 1,शनिवार पेठ 1, राजाचे कुर्ले 1, कोयना वसाहत 1, कोडोल 1, शनिवार पेठ 2, रविार पेठ 1, वडगाव हवेली 1, आनंदकाले 1, गुरुवार पेठ 1, वाघेरी 1, मंगळवार पेठ 1, बेलमाची 1, होटेवाडी 1,उंडाळे 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, बनवडी 2, कराड 1, पाल 1, किवळ 2, बेलवडे बु 3, बनवडी 3, कोपर्डे हवेली 1, शनिवार पेठ 3, उपजिल्हा रुग्णालय 1, गोवारे 1, हजारमाची 1, आगाशिवनगर 3, मलकापूर 2, रेठरे बु 1,
*सातारा* तालुक्यातील सातारा 3, विलासपूर 4, नागठाणे 1, केसरकर कॉलनी 1, आंबेदरे 3, राजेवाडी निगडी 81, क्षेत्रमाहुली 2, सासपडे 1, धामणी 1 सिंबेवाडी 1, सुपुगडेवाडी 1, रामशेटेवाडी 1, भोसगाव 2, भातमारली 1, शनिवारपेठ 1, बजाज कॉलनी माहुली 1, मंगळवार पेठ 1, सातारा 1, रविवार पेठ 5, खेड 1, आबाचीवाडी 1, यादोगोपाळपेठ 1, कारंडवाडी 3, करंजेपेठ 4, पळशी 2, बोरगांव 1, सदरबझार 1, शुक्रवारपेठ 1, विसावा नाका 1, कोंडवे 1, शाहुपुरी 1, सातारा 1, गोडोली 1, अतीत 1, पळशी 5, सम्राटनगर 1, मंगळवार पेठ 1, कोडोली 1, शनिवार पेठ 1 , करंजे 1, रविवार पेठ 1, केसरकर पेठ 1, शाहुपुरी 2, सातारा 1, शिवथर 1, कोंढवे 1, धोंडेवाडी 1, अमृतवाडी1, गुरुवार पेठ 1, नागठाणे 1, खोडद 9, नागठाणे 3, अतित 4 , सासपडे 6, अपशिंगे 4, सामेवार पेठ 1, मल्हारपेठ 1, कोंडवे 1, संगमनगर 1, किन्ही 1, सातारा 1, केसरकर पेठ 1, करंजे 1, कुमठे 1, एमआयडीसी 1, मंगळवार पेठ 3, सदरबझार 2, सातारा 2, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 1, सिटीपोलीस लाईन 1, सातारा 1
*खटाव* तालुक्यातील मायणी 2, पुसेसावळी 3, येनकुळ 1, नांदोशी 2, बुध 2, विसापूर 1, औंध 2, पुसेगाव 1, नेर 4, वडुज 1, राजापुर 1, खटाव 4, विसापुर 2, औंध 1, भोसले 2, डिस्कळ 2, पुसेसावळी 1, वेटणे 1, येळीव 1]
*कोरेगांव* तालुक्यातील सातारा रोड 4, भक्तवडी 1, चिमणगांव 4, रेवडी 1, बोलेवाडी 1, पिंपोडे बु 8, आंबवडे 1, महाडवेनगर 1,
*फलटण* तालुक्यातील फलटण 1, कोळकी 1, अलगुडेवाडी 1, धुळदेव 1, मंगळवार पेठ 1, तरडगाव 1,
*महाबळेश्वर* तालुक्यातील महाबळेश्वर 5 ,
,
*माण* तालुक्यातील पळसावडी 1, म्हसवड 1, वाडी 1, म्हसवड 18, स्वरुपखानवाडी 3
*पाटण* तालुक्यातील ढेबेवाडी 2,पाटण 1, खांडववाडी 2,
*खंडाळा* तालुक्यातील शिरवळ 3, केसुर्डी 1, लोणंद 7, संभाजी चौक 1, सुखेड 1, हराळी 1, अजनुज 1, भादे 3, जावले 1, शिंदेवाडी 1, शिवाजीनगर 2,
*वाई* तालुक्यातील भुईंज 3, सुरुर 1 , उडतारे 6, वेलंग 4, पाचवड 4, आसले 3, शेलारवाडी 4, वहागांव 3, वाई 1, बावधन 6, कवठे 2, सोनगीरवाडी 1, पाचवड 1, दह्याट 1, बावधन नाका 1, यशवंतनगर 1, उडतारे 1, जांभ 1,
*इतर* 4
जाधववाडी 1,
*9 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे ओंड ता. कराड येथील 51 वर्षीय पुरुष, सोळशी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 68 वर्षीय महिला, चोरे ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष तसेच जिल्यान तील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये तामाजाई नगर सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, बनवडी ता. कराड येथील 79 वर्षीय पुरुष, विक्रमनगर पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील 71 वर्षीय पुरुष, तासगाव ता. सातारा येथील 30 वर्षीय महिला असे एकूण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
रविवार, २३ ऑगस्ट, २०२०
*सातारा जिल्ह्यातील 342 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 10नागरिकांचा मृत्यु*
आईवडिलांच्या हस्ते ‘दीप उजळतो आहे’ या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन
शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०
*जिल्ह्यातील 361 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 8 नागरिकांचा मृत्यु*
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 337 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु
गणपती गौरी आगमन आणि विसर्जनाचा शुभ मुहूर्त !
यावर्षी मंगळवार 25 आॅगस्ट रोजी दुपारी 1.58 नंतर गौरी आणावयाच्या आहेत. बुधवार 26 आॅगस्ट रोजी गौरीपूजन आहे. गुरुवार 27 ऑगस्ट रोजी दुपारी १२-३६ नंतर गौरी विसर्जन करायचे आहे. यावर्षी मंगळवार 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. पुढच्यावर्षी गणपतीबाप्पाचे आगमन उशीरा म्हणजे शुक्रवार 10 सप्टेंबर २०२१ रोजी होणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
सातारा ; कोरोनाचा कहर सुरूच ३३७ नवे बाधित तर ८ जणांचा मृत्यू
स्वच्छ भारत अभियानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड ; कराड एकनंबरी
स्वच्छ भारत अभियानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २० : नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम राखली आहे, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऑनलाईन सोहळ्यास महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री श्री.शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरविकास विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव महेश पाठक आदी यावेळी उपस्थित होते. .
यावेळी मंत्री श्री.शिंदे म्हणाले की, नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत.
दरम्यान,आज झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला मिळाला आहे. विशेष म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील शहरांनी मिळविले आहे. त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे.
पश्चिम विभाग श्रेणीमधील २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पन्हाळा शहराला स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता शहर म्हणून जेजुरी तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अकोले शहराला पुरस्कार मिळाला आहे.
२५ ते ५० हजार या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीतील शिर्डीला स्वच्छ शहर म्हणून तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या विटा शहराला पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या वरोरा शहराला देखील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ५० हजार ते एक लाखाच्या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये शाश्वत स्वच्छ शहर म्हणून बल्लारपूरचा गौरव करण्यात आला असून नागरिकांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसाद या श्रेणीत हिंगोली तर गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या शेगाव शहराला आणि स्वच्छ शहर म्हणून रत्नागिरीला सन्मानित करण्यात आले आहे. देहू रोड कॅन्टोमेंट परिसराला गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणारे शहर या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्र अमृत शहरांच्या स्वच्छ श्रेणीमध्ये राष्ट्रीयस्तरावरील १०० अव्वल अमृत शहरांपैकी महाराष्ट्रातील ४३ पैकी ३१ शहरांचा समावेश आहे. राज्यातील ७५ टक्के अमृत शहरे पहिल्या १०० शहरांमध्ये आली आहेत. २५ नॉन अमृत शहरांपैकी २० महाराष्ट्रातील आहेत. कचरामुक्त राष्ट्रीय तारांकित १४१ शहरांमध्ये महाराष्ट्रातील ७७ शहरांचा समावेश आहे. संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त असून राज्यातील २१६ शहरे ओडीएफ प्लस तर ११६ शहरे ओडीएफ प्लस प्लस झाली आहेत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानात (नागरी) महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षापासून दर्जेदार काम करत देशातील अव्वल कामगिरीचे सातत्य राखले आहे. या अभियानात राज्यातील शहरांनी केलेल्या कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक पुरस्कार देऊन घेण्यात आली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देखील राज्याने सर्वोत्तम कामगिरीचा तृतीय क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर देशात सर्वाधिक 46 पुरस्कार राज्याने मिळविले होते. पहिल्या 100 अमृत शहरांमध्ये यावर्षी राज्यातील 29 अमृत शहरांचा सहभाग होता. कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनामध्ये देशपातळीवर 53 शहरांना तीन स्टार मानांकन प्राप्त झाले होते त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे 27 शहरं महाराष्ट्रातील होती. याचवर्षी देशातील 500 शहरांनी ओडीएफ प्लस आणि ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त केला यात महाराष्ट्रातील 154 शहरांचा समावेश होता.
2018 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील 46 पुरस्कारांपैकी सर्वाधिक 10 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले होते. पहिल्या 100 अमृत शहरांमध्ये राज्यातील 27 अमृत शहरांचा सहभाग होता.
गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०
न्यू. इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी संघ .कुठरे यांच्या वतीने कोरोना योद्धेनचा सन्मान
चला अक्षरगणेशा रेखाटूया, विद्याथ्र्यांना मदत करुया.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच काल दिवसभरात @ 396
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...