**मी जवळून पाहिलेले साहेब*
1967 पासुन माझ्या ढेबेवाडी विभागातील जनतेवर होत आलेली कृपादृष्टी म्हणजेच भुकंपापासुन आजोबा पासुन आजपर्यंत विभागातील जनतेवर एखाद्या कुटुंबातील सदस्या सारखे लक्ष केंद्रित करत जर कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त साहेब. ........माझे वडील माझ्या गावच्या लोकांना सांगत असत त्या वेळी मी लहान असताना ऐकत असायचो म्हणायचे "आर लोकांनो आपल्या घराच्या छपराला पत्र दिल कीर! देसाई सायबानी ! म्हणजे देसाई साहेबांनी दिलेले पत्रे आजुन ही विचाररुपी शाबूत आहेत! !तसे मंत्री साहेबांच्या जवळ येण्यास मला उशीरच झाला. ..त्याची ऊणीव मी माझ्या साहेबांना फारच त्रास देत भरुन काढण्याचा मी प्रयत्न करत आहे! साहेब माझ्या वर रागवतही असतील कदाचित परंतु काय करणार गावची नैसर्गिकरीत्या स्थितीच तसी आहे. गाव सह्याद्री च्या कुशीत कडेकपारी डोगर खोऱ्यात सातारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला वसलेले आहे तसी गावची लोकसंख्या बेताचीच 450 च्या आसपास तरीही साहेबांचे बारीक लक्ष राहते हेच आमच्या साठी लाख मोलाचे आहे. आपला देश स्वतंत्र होऊन जवळपास 73 वर्षे होत आहेत परंतु माझ्या गावात साधी सायकल चालत नव्हती? आज साहेबांनी जवळपास चार कोटी रुपये मंजूर केले ढेबेवाडी ते जिंती ते मोडकवाडी ते सातर आज घडीला रस्त्याचे काम सुरू आहे! गावातील खास करुन महिला वर्गातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती! त्यावर सुध्दा साहेबांनी उपाययोजना केली. जवळपास 23 लाखांची पिण्याच्या पाण्यासाठी स्कीम सध्या सुरू होणार आहे! आमच्या ढेबेवाडी विभागात चांगले नेते झाले ढेबेवाडी विभागातच काय पाटण तालुक्यात सुद्धा नेते आहेत! परंतु होईल बघतो तुम्ही जावा काम होईल परंतु कोणत्याही नेत्यांनी हिम्मत दाखवली नाही! ती फक्त माझ्या मंत्री महोदय साहेबांनी दाखवत शिवसेनेचे ब्रिद वाक्य खरे करून दाखवले! आज साहेबांनी ज्या दिवशी मंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवसापासून आज पर्यंत 24×7 नुसते काम! आणि काम. परंतु साहेब आपण दिवसातून थोडा आराम करावा तब्येत चांगली संभाळा माझ्या जिवनात आज पर्यंत आपल्या तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीला ईतके काम करताना पाहिले नाही! आज सगळीकडे एवढी कोरोनामुळे भयानक वातावरण निर्माण झाले आहे तरी स्वत:ची काळजी न करता अहोरात्र काम आणि जणतेची सेवा करणारे माझे मंत्री साहेबांना ! मानाचा मुजरा !जय महाराष्ट्र!आपला लहान कार्यकर्ता! रमेश साळुंखे! सातर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा