मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

तळमावले : कोरोनाला हरवून पोलीस पाटील योद्धा घरी.

तळमावले : कोरोनाला हरवून पोलीस पाटील योद्धा  घरी.
     
 तळमावले / प्रतिनिधी 
जगभरात कोरोना रोगाने थैमान घटलेनसून देशही या महामारीने हतबल असून ,अशा स्थितीत सामाजिक पातळीवर समाज व प्रशासन यामधील महत्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटील अमित शिंदे यांनी या रोगावर मात केली.
        पाटण तालुक्यातील शिबेवाडी(कुंभारगाव) चे पोलीस पाटील अमित शिंदे यांना कर्तव्ये बजावत असताना कोरोना महामारीचा संसर्ग झाला,मात्र त्यांनी 12 दिवसात सकारात्मक इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली,त्यांना सध्या घरी पाठवण्यात आले असून काही दिवसात ते पुन्हा नव्या जोमाने सेवेत पुन्हा रुजू होणार आहेत.
         यावेळी समस्त ढेबेवाडी हद्दीतील पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...