गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

न्यू. इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी संघ .कुठरे यांच्या वतीने कोरोना योद्धेनचा सन्मान

तळमावले : .20 रोजी न्यू. इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी संघ .कुठरे यांच्या वतीने कोरोना योद्धेनचा सन्मान करण्यात आला.
         गेल्या चार  ते पाच महिन्यापासून संपूर्ण जगाला कोरोना संक्रमणाने वेढले असून याचा त्रास प्रामुख्याने कोरोना योध्याना सोसावा लागत आहे.
     कोरोना महामारीच्या कठीण संकटात समाजासाठी अतुलनीय काम करून समाजापुढेमानवतेचा आदर्श निर्माण केल्याबद्दल तसेच    याच पार्श्वभूमीवर न्यू. इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी संघ .कुठरे यांच्या वतीने ढेबेवाडी पोलीस ठाणे येथे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उत्तम भजनावळे साहेब,पोलीस उपनिरीक्षक श्री विजय पाटील ,पोलीस पाटील विजय सुतार व व विशाल कांबळे यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.           Adv.
        संस्थेने आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामजिक उपक्रम राबवत आशा सेविका ,अंगणवाडी सेविका,तलाठी,ग्रामसेवक सरपंच व ssc परीक्षेत प्रथम आलेले विध्यार्थी यांचा सन्मान करत सामाजिक आदर्श निर्माण केलेला आहे.
        यावेळी संघाच्या वतीने अध्यक्ष सुनील पवार उपाध्यक्ष राजेंद्र पवार कार्याध्यक्ष मारुती मोळावडे , सचिव लक्ष्मण पाटील व महेश लोहार  ,व भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष श्री अविनाश पवार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...