शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

सातारा ; कोरोनाचा कहर सुरूच ३३७ नवे बाधित तर ८ जणांचा मृत्यू

सातारा दि.२० जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्याचा आलेख काही केल्या कमी होत नाही. गुरुवारीही ३३७ पॉझिटिव्ह आढळले असून बाधितांचा आकडा ९००८ वर पोहोचला आहे. सातारा शहरात बुधवारी रात्री तब्बल ५२ कोरोनाग्रस्त आढळून आले असून, शहरातील बाधितांची संख्या तब्बल ४५९ झाली आहे. त्यामुळे शहराची चिंता वाढली आहे. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून, बळींची संख्या २७७ झाली आहे. दरम्यान, यात कोरोना योद्धा असणार्‍या पोलिस आणि डॉक्टरांना बाधा झाली. गुरुवारी २६० जणांनी कोरोनावर मात केली असून, कोरोनामुक्‍त रुग्णांचा आकडा ५ हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे.
सविस्तर वृत्त थोड्या वेळाने

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...