यावर्षी मंगळवार 25 आॅगस्ट रोजी दुपारी 1.58 नंतर गौरी आणावयाच्या आहेत. बुधवार 26 आॅगस्ट रोजी गौरीपूजन आहे. गुरुवार 27 ऑगस्ट रोजी दुपारी १२-३६ नंतर गौरी विसर्जन करायचे आहे. यावर्षी मंगळवार 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. पुढच्यावर्षी गणपतीबाप्पाचे आगमन उशीरा म्हणजे शुक्रवार 10 सप्टेंबर २०२१ रोजी होणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०
गणपती गौरी आगमन आणि विसर्जनाचा शुभ मुहूर्त !
दि.22 ऑगस्ट रोजी सायं. 7.57 पर्यंत भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे. त्यामुळे याच दिवशी गणेशस्थापना करावयाची आहे. गणेशस्थापना मध्यान्हकाली करण्याची परंपरा आहे. शनिवार, दि. 22 आॅगस्ट रोजी सकाळी 11.25 पासून दुपारी 1.66 पर्यंत मध्यान्हकाली श्रीगणेशमूर्ती स्थापना करावी असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देतांना सोमण म्हणाले की ज्यांना या वेळेत गणेशस्थापना करता येणार नाही त्यांनी त्यादिवशी पहाटे पाच पासून दुपारी तीन वाजेपर्यंत गणेशस्थापना केली तरी चालेल.यावर्षी कोरोनाची साथ आहे. सर्वांनी गणेशोत्सव साधेपणाने पण मोठ्या उत्साहाने साजरा करावा. कोरोना प्रतिबंधक उपाय व शिस्त यांचे कसोशीने पालन करावे. गणेशमूर्ती आकाराने लहान आणि मातीची असावी. स्वत: माती आणून जमेलतशी गणेशमूर्ती तयार केली तरी चालेल. गणेशपूजनासाठी जेवढे साहित्य उपलब्ध होईल तेवढे वापरावे. जे नसेल त्याजागी अक्षता अर्पण कराव्या. गणेशपूजेसाठी पुरोहित नसतील तर पुस्तकावरून किंवा आॅनलाईन ॲप वापरून पूजा करावी.कोरोना संकटामुळे गणेशदर्शनासाठी यावर्षी शक्यतो आप्तेष्ट-मित्राना बोलवू नये. त्याऐवजी त्यांना आॅनलाईन ॲपवरून पूजेमध्ये, आरतीच्यावेळी, अथर्वशीर्ष म्हणताना सामील करून घ्यावे. गणेशमूर्तींचे विसर्जन घरीच स्वच्छ पाण्याने भरलेल्या बादलीत करावे. कृत्रिम तलावाचा वापर करावा. गर्दी करू नये.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !
पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा