तळमावले/वार्ताहर
ग्रामीण भागातील गरजू होतकरु मुलांना मदत करता यावी यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘एक अक्षरगणेशा कलाकृती विद्याथ्र्यांसाठी’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत सेलिब्रिटी स्टार्सनी केले आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांच्या संकल्पनेतून ‘एक अक्षरगणेशा कलाकृती विद्याथ्र्यांसाठी’ हा उपक्रम सुरु झाला आहे. गेली 5 वर्षे अशाप्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये एक वही-एक पेन, माणुसकीच्या वह्या, मोफत वहया वाटप, गणवेश वाटप, ज्ञानाची शिदोरी असे नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
‘‘चला अक्षरगणेशा रेखाटूया, विद्याथ्र्यांना मदत करुया’’ अशी टॅगलाईन ठेवत सर्वाना या उपक्रमात सहभागी होण्याचेे आवाहन करण्यात आले आहे.आपल्याला हव्या असलेल्या नावात अक्षरगणेशा डाॅ.संदीप डाकवे यांच्याकडून रेखाटून घ्यायचा आणि त्याबदल्यात आपण त्यांना कलाकृतीने मुल्य रु. 300/- च्या वरती कितीही आपल्या इच्छेनूसार द्यायचे. या उपक्रमातून जमलेली रक्कम हुषार, गरजू विद्याथ्र्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे.
अक्षरगणेशा या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी ‘स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट’ यांच्या वतीने डाॅ.संदीप डाकवे, उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेश्मा डाकवे व त्यांची टीम सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. सध्या सोशल मिडीयाचा जमाना आहे. या सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये चांगल्या प्रकारे जागृती करता येते. हे ध्यानात घेवून व्हाॅटस्अप, फेसबुक इ.सारख्या माध्यमांवर मदतीसाठी आवाहन केले आहे.याचाच एक भाग म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत सेलिब्रिटी स्टार्स कडून ‘अक्षरगणेशा’ या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन करत असलेल्या ‘व्हिडीओ क्लीप’ तयार करुन त्या सोशल मिडीयावर ‘व्हायरल’ केल्या जात असून त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे अक्षरगणेशा रेखाटण्यास मदत होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी स्टार्स आणि स्पंदन ट्रस्ट यामध्ये समन्वय साधण्याचे काम महेश मस्कर हे करत आहेत. आतापर्यंत अभिनेते संजय खापरे, सुप्रसिध्द पाश्र्वगायिका कविता राम, अभिनेत्री डाॅ.भाग्यश्री शिंदे, बाळू मामाच्या नावानं चांगभलं फेम ‘तात्या’ अभिनेते अक्षय टाक, आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्री पुनम चांदोरकर, अभिनेते राहूल राजे व अन्य सेलिब्रिटीं स्टार्सनी ‘व्हीडीओ क्लीप’ च्या माध्यमातून सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. सेलिब्रिटी स्टार्स च्या आवाहनामुळे या उपक्रमाला ‘चार चाॅंद’ लागले आहेत. अजूनही ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे मो.9764061633 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
:
स्पंदन ट्रस्टचे दुवा साधण्याचे काम:
समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि गरजू विद्यार्थी यामध्ये दुवा साधण्याचे काम स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे. लोकांकडून मदत मिळवून ती गरजू योग्य विद्याथ्र्यांपर्यत पोहोचवणे हे काम प्रामाणिकपणे ट्रस्ट करत आहे.लोकांच्या सहकार्यामुळे गरजू विद्याथ्र्यांपर्यंत मदत पोहोचत असल्यामुळे मनाला वेगळे मानसिक समाधान मिळत असल्याचे मत ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा