तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील शेडगेवाडी (पो.धामणी) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु असून त्यासाठी आर्थिक स्वरुपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे येथील समाजसेवक श्री.संतोष तोडकर (शेठ) यांनी मंदीराच्या जीर्णोध्दार कामासाठी रु.10,000/- रोख मदत दिली आहे. संतोष तोडकर यांनी कोरोनाच्या काळात अनेकांना आर्थिक व वस्तू स्वरुपात मदत केली आहे. या मदतीबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
ग्रामस्थ मंडळ शेडगेवाडी, सतीश (भाऊ) शेडगे, दिलीप शेडगे, जनार्दन शेडगे (नाना), राजेश यरवळकर (भाऊ), यशवंत शेडगे, बाबुराव शेडगे, आनंद कदम यांनी श्री.तोडकर यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
परिसरातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनीदेखील मंदीराच्या जार्णोध्दार कामासाठी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा