शाळा बंद असल्या तरी अनलॉक 4.0 मध्ये नववीच्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल तेव्हा शाळेत जायची परवानगी देण्यात आली आहे.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता ई पास किंवा परवानगीची आवश्यकता नाही.
काय आहेत नवे नियम
- थिएटर, मनोरंजन केंद्र, स्विमिंग पूल राहणार बंद
- शाळा बंदच, पण एका वेळी 50 टक्क्याहून कमी शिक्षकांना शाळेत बोलवायला परवानगी
- ऑनलाईन शिक्षणासंदर्भात कामासाठी निम्मे शिक्षक शाळेत जाऊ शकतात.
- नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी.
- शिक्षकांकडून मार्गदर्शन, पुस्तकं किंवा इतर साहित्य घेण्यासाठी माध्यमिक - शाळेतले विद्यार्थी पालकांच्या परवानगीने शाळेत शिक्षकांना भेटायला जाऊ शकतात.
- वय वर्षं 65 आणि त्यापुढच्या व्यक्तींनी ज्यांना काही आजार आहेत अशांनी आणि 10 वर्षांच्या आतल्या मुलांनी घरातच राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. गरोदर स्त्रियांनीही गरज असल्याखेरीज घराबाहेर पडू नये.
- सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक किंवा राजकीय संमेलनांना परवानगी नाही. पण 21 सप्टेंबरपासून नियम होणार शिथिल
- कुठल्याही प्रकरच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 100 जणांनी एकत्र यायला 21 सप्टेंबरनंतर परवानही. पण प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर वापरणं बंधनकारक. प्रत्येकाच्या शरीराचं तापमान मोजूनच संमेलनाला जायची परवानगी
- 21 सप्टेंबरपासून ओपन एअर थिएटर उघडायला परवागनी. एसी सिनिमा हॉल बंदच राहणार
- राज्यांतर्गत किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायला परवानगीची आवश्यकता नाही
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा