शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

सातारा : 332 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 533 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा : 332 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 533 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
 
सातारा दि. 28:  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 332  नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 533  जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.  
   विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  जावली तालुक्यातील 8, कराड तालुक्यातील 146, खंडाळा तालुक्यातील 7, खटाव तालुक्यातील 14, कोरेगांव तालुक्यातील 39*, महाबळेश्वर तालुक्यातील 3, माण तालुक्यातील 13, पाटण तालुक्यातील 7, फलटण तालुक्यातील 26, सातारा तालुक्यातील 62, वाई तालुक्यातील 7 असे एकूण 332 नागरिकांचा समावेश आहे.
  
533 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 66, फलटण 11, कोरेगांव 40, वाई 18, खंडाळा 56,  रायगांव 20, पानमळेवाडी 42, मायणी 50, महाबळेश्वर 19, पाटण 18, दहिवडी 52, ढेबेवाडी 28 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 104   असे एकूण 533 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...