संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
मंगळवार, ३० जून, २०२०
सातारा ; 20 जणांना आज डिस्चार्ज ; 240 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर दोन कोरोना बाधितांचा आज मृत्यु
तळमावले : गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडून शिवसमर्थ वर कौतुकाची थाप
जिल्ह्यातील 14 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर145 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
गावांच्या विकासासाठी थेट ८० टक्के निधी .
गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. २९ : पंधराव्या वित्त आयोगामधून सन २०२०-२१ या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून राज्याला एकूण ५ हजार ८२७ कोटी रुपये इतका निधी मंजूर आहे. या निधीपैकी १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपये इतका निधी पहिला हप्ता बेसिक ग्रँट (अनटाईड) म्हणून प्राप्त झाला आहे. या निधीचे वितरण ८० टक्के ग्रामपंचायत, १० टक्के पंचायत समिती आणि १० टक्के जिल्हा परिषद या प्रमाणात तिन्ही स्तरावर करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
गावांच्या विकासासाठी थेट ८० टक्के निधी .
चौदाव्या वित्त आयोगाचा कालावधी मागील वर्षी समाप्त झाला.आता चालू आर्थिक वर्षापासून पुढील ५ वर्षाच्या कालावधीसाठी पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांसाठी निधी मिळणार आहे. या निधीपैकी ८० टक्के निधी हा थेट गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना वितरित केला जातो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रत्येकी १० टक्के निधी दिला जातो. गावांना मोठा निधी मिळत असल्याने यामुळे गावांमधील विविध पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. पंधराव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीमधून राज्यातील सर्व गावांमध्ये चांगल्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला बेसिक ग्रँट (अनटाईड) व टाईड ग्रँट (Tied Grant) अशा दोन प्रकारच्या ग्रॅन्टच्या स्वरूपात ५० – ५० टक्के या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार बेसिक ग्रँट (अनटाईड) ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचारी पगार किंवा आस्थापना विषयक बाबी वगळून इतर स्थानिक गरजेनुसार आवश्यक बाबींवर वापरावयाची आहे, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.
वाढत्या वीज बीलांच्या तक्रारीची महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून दखल
तक्रारींचे निवारण करण्याचे वीज कंपन्यांना निर्देश
मुंबई दि. २९ : वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहे.
महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्राचे नियमन करण्यासाठी विद्युत अधिनियम, 2003 अंतर्गत स्थापन करण्यात आलेला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, राज्यातील वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांवर आकारावयाचे वीज दर नियम कांलातराने निश्चित करते. वीजेच्या वाढलेल्या देयकाविषयी ग्राहकांमध्ये असंतोष असल्याचे दिसून आल्यानंतर आयोगाने वीज कंपन्यांच्या विशेषत: जून, 2020 महिन्याच्या देयक आकारणी पद्धतीचा आढावा घेतला.
1 एप्रिल 2020 पासून सुधारित वीज दर कमी करण्यात आले आहेत. हे दर मागील वर्षाच्या तुलनेत लाक्षणिकरित्या कमी आहेत. या सुधारणेनंतर महाराष्ट्रातील सर्व निवासी ग्राहकांसह सर्व वर्गवारींसाठीच्या वीज दरात घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. सुधारित वीज दर निर्गमित झाल्यानंतर, एप्रिल महिन्यानंतरच्या वीज वापरासाठी महिन्यामध्ये आकारण्यात आलेल्या देयकांसाठी इंधन समायोजन आकार (एफएसी) लावण्यात आलेले नाहीत. तसेच यापुढेही इंधन समायोजन आकार लागू नये याची उपाययोजना करण्यात आली आहे.
वीज दराचा आदेश कोविड 19 च्या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान निर्गमित झाल्यामुळे, वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे शक्य होण्यासाठी आणि ग्राहकांना काहीसा दिलासा देण्यासाठी आयोगाने काही बाबतीत वीज कंपन्यांना परवानगी दिली. उदा. मीटरमधील नोंदी घेण्यासाठी ग्राहकांच्या इमारती/घरी न जाता मार्च ते मे या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान (ॲटोमॅटिक मीटर रिडिंगची सुविधा जेथे उपलब्ध आहे त्यांना वगळून) सरासरी वीज वापराच्या आधारावर वीज देयके आकारावीत.
लॉकडाउनच्या निर्बंधातील शिथिलतेनंतर, ज्या कालावधीसाठी निर्धारित तत्त्वावर देयक आकारले होते त्याचे समायोजन करुन, प्रत्यक्ष मीटरमधील नोंदीच्या आधारावर देयक देण्यास वीज कंपन्यानी सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्ष वीज वापराबरोबर सरासरी देयकाच्या समायोजनामुळे जून महिन्याचे वाढलेले देयक पाहून ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून आले. यासंदर्भात आयोगाने दि. 27 जून, 2020 रोजी सर्व चार वितरण परवानाधारकांच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यात स्पष्ट झाले की, लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान, देयके मार्च 2020 च्या आधीच्या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापराच्या आधारावर आकारण्यात आली होती. त्यावेळी हिवाळा चालू असल्यामुळे वीज वापर नेहमीच कमी असतो आणि त्यामुळे सरासरी देयके कमी रकमेची होती. आताची देयके उन्हाळ्यातील असून यावेळी वीज वापर सामान्यतः जास्त असतो आणि देयके नेहमीच जास्त रकमेची असतात. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या प्रत्येक महिन्यासाठीच्या सरासरी देयक रकमेच्या समायोजनानंतर शिल्लक देय रकमेसह जास्त रकमेचे देयक आले, जे जूनमध्ये देण्यात आले आहे.
वीजेच्या देयक आकारणीत पारदर्शकता आणखी वाढवावी तसेच तक्रारींना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा उभारावी असे निर्देश आयोगाने दिले. गाऱ्हाणी प्राप्त झाल्यापासून एक दिवसाच्या आत त्याला प्रतिसाद द्यावा; मीटरमधील नोंदी, लागू असलेला वीज दर, वीज दराच्या टप्प्यातील लाभ आणि मागील वर्षीच्या संबंधित महिन्याशी तुलना यानुसार ग्राहकांना त्यांच्या देयकातील वापरलेल्या युनिट्सच्या अचूकतेची स्वयं-तपासणी करण्यासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर देण्यात यावे; जेथे वीज देयक मार्च ते मे या कालावधीसाठीच्या सरासरी देयकाच्या दुप्पट आहे, अशा ग्राहकांना 3 हप्त्यात देयकाचा भरणा करण्याचा पर्याय देण्यात यावा. देयकांचा भरणा मासिक हप्त्यांमध्ये करण्याचा पर्याय देण्यासह, देयकासंबंधातील ग्राहकाच्या गाऱ्हाण्यांचे निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीज पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये असे आयोगाने निर्देश दिले. जर ग्राहकाचे वितरण परवानाधारकाच्या प्रतिसादाने समाधान झाले नाही तर, आयोगाच्या विनियमांमध्ये ठरवून देण्यात आल्यानुसार वैधानिक निवाडयासाठी त्यांना अंतर्गत गा-हाणे निवारण कक्ष, ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच आणि विद्युत लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.
आयोग वीज देयकांच्या प्रश्नाबाबत लक्ष ठेवत असून कोणत्याही ग्राहकाची वितरण कंपनीकडून गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत असल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाव्दारे आश्वस्त केले आहे.
सातारा ; जिल्ह्यात आणखी 19 नागरिक कोरोनाबाधित
सोमवार, २९ जून, २०२०
राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविला ; राज्य सरकारचे परिपत्रक जारी
*7 नागरिकांना आज दिला डिस्चार्ज ; एक मृत व्यक्तीसह 535 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
कुंभारगाव परिसरात माकडांचा हैदोस ;शेतकरी त्रस्त
कुंभारगाव (ता.पाटण) गेल्या काही दिवसापासून कुंभारगाव परिसरात वानरांनी हैदोस घातला आहे. ही वानरे पिकांचे व अन्य साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत, मात्र या वानरांची तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. समृद्ध वनसंपदा लाभलेल्या पाटण तालुक्यात या परिसरात आता वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागला आहे. गेल्या 10-12 वर्षांपासून परिसरात रानडुकरे, रानगवे, माकडे व वानरांनी रानात, शेतीत धुमाकूळ घालत लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. पूर्वी साधारणपणे माकड, वानर या जाती सर्रास जंगलात आढळत असत, मात्र गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात वानरांनी हैदोस घातला आहे.
कुंभारगाव,मान्याचीवाडी,बोरगेवाडी,चाळकेवाडी,जांभूळवाडी,चिखलेवाडी,मोरेवाडी,शेंडेवाडी आणि गलमेवाडी या परिसरातील शेतीमधील खास करून भुईमूग पिकाचे नुकसान ही वानरे करीत आहेत. मात्र या वानरांची तक्रार वनविभागाकडे करायची की ग्रामपंचायतीकडे? ही समस्या निर्माण झाली आहे. वानरांचा उपद्रव रोखण्यासाठी वन खात्याने काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. वनखात्याने एकतर वानर पकड मोहीम राबवावी किंवा वानरना जंगलात परतवण्यासाठी उपाय योजावेत, अशी मागणी विभागातील शेतकऱ्याकडून होऊ लागली आहे.
मराठा क्रांती मोर्चा पुन्हा धडकणार
पुणे - मराठा समाज आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून योग्य प्रयत्न केले जात नाहीत. समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या मान्य करा, अन्यथा 9 ऑगस्टपासून मराठा समाज राज्यव्यापी आंदोलन सुरू करेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची ऑनलाइन बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. प्रलंबित मागण्यांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. यावेळी वीरेंद्र पवार, विनोद पाटील, राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, दिलीप पाटील, विनोद साबळे, अंकुश कदम, करण गायकर, माउली पवार व इतर विविध जिल्ह्यांतील प्रमुख समन्वयकांची उपस्थिती होती.
सातारा ; जिल्ह्यात 39 नागरिकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह
रविवार, २८ जून, २०२०
सातारा ; जिल्ह्यात 36 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर 191 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
शनिवार, २७ जून, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील आणखी 19 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांची आज दिवसभरातील एकूण संख्या 47
सातारा; कोरोना चाचणीसाठी साताऱ्यात सुविधा उपलब्ध करून देणार; वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास गती देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोना संकटकाळात नाविन्यता सोसायटीमार्फत ५२ कोटींहून अधिक मदत :कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मास्क, पीपीई किट्स वाटपापासून लाखो श्रमिकांसाठी केली जेवणाची व्यवस्था – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई, दि. २६ : कोरोना संकटकाळात कौशल्य विकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने सीएसआर देणगी समन्वयाचे उत्कृष्ट काम करुन लाखो आपत्तीग्रस्तांना मोठी मदत मिळवून दिली आहे.
यासाठी सोसायटीमार्फत धैर्य मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत विविध कॉर्पोरेट्स आणि खाजगी देणगीदारांकडून सुमारे ५२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकारच्या मदत साहित्याची उभारणी आणि त्याचे गरजूंना वाटप करण्यात आले, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
आतापर्यंत मिळालेल्या मदत साहित्यात सुमारे ८ लाख सर्जिकल मास्क, ४६ व्हेंटिलेटर्स, ८५ हजार पीपीई किट्स, २ लाख २५ हजार एन ९५ मास्क, ३८ हजार लिटर सॅनिटायझर इत्यादी सामग्रीचा समावेश आहे.
नाविन्यता सोसायटीमार्फत धैर्य मोहिमेमधून सीएसआर निधीअंतर्गत आवश्यक उपकरणे आणि अन्न वितरण खरेदीसाठी समन्वय करण्यात आला. मार्च २०२० मध्ये सोसायटीने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेडच्या सहकार्याने जे. जे. हॉस्पिटलमध्ये कोविड – १९ चाचणी प्रयोगशाळेची स्थापना देखील केली आहे.
सर्जिकल मास्क, पीपीई किट्स, सॅनिटायझरचे वाटप
आतापर्यंत मिळालेली सर्जिकल मास्क, व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्स, एन ९५ मास्क, सॅनिटायझर ही सामग्री हाफकीन संस्था, जे. जे. हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस दल, बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुख्य देणगीदारांमध्ये कॅस्ट्रॉल इंडिया, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, विप्रो फाउंडेशन, एचटी पारेख फाउंडेशन, नोव्हार्टिस इंडिया, फाइझर लि., डीएल शाह ट्रस्ट, गोदरेज ग्रुप, अमेरिकेअर्स, पेटीएम, रेकिट बेनस्कीसर इत्यादींचा समावेश आहे. यातून नाविन्यता सोसायटीला ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मदत उभारण्यात यश आले आहे.
३५ लाखापेक्षा अधिक लोकांना जेवण, १ लाख किराणा सामान किट्स
वैद्यकीय उपकरणांव्यतिरिक्त नाविन्यता सोसायटीने स्थलांतरित मजूर, दैनंदिन मजुरी करणारे नागरिक, झोपडपट्टीवासीय, कंटेंनमेंट झोनमधील नागरिक तसेच फ्रंटलाइन कामगारांना मुबलक प्रमाणात अन्न पुरवण्याच्या कामातही योगदान दिले. मागील तीन महिन्यांमध्ये ३५ लाखापेक्षा अधिक लोकांना जेवण, १ लाख किराणा सामान किट्स, १४ लाखाहून अधिक सॅनिटरी पॅडची व्यवस्था केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, नवी मुंबई महानगरपालिका, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई पोलिस या क्षेत्रातील लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. सर नेस वाडिया फाऊंडेशन, युनिसेफ, डीएल शाह ट्रस्ट, बीसीजी ग्रुप, सीआयआय, टेस्टी बाइट्स, गोदरेज ग्रुप, क्रेडो फाऊंडेशन, प्रोजेक्ट मुंबई, सीएसीआर फाऊंडेशन, जायन्ट्स ग्रुप ऑफ भायखळा, श्री रेणुका शुगर्स लिमिटेड, अदानी ग्रुप यांसारख्या प्रमुख देणगीदार आणि भागीदारांचा समावेश आहे. यामाध्यमातून नाविन्यता सोसायटीला २२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मदत उभारण्यात यश आले आहे.
युनिसेफच्या जीवन रथ प्रकल्पाद्वारे स्थलांतरित कामगारांना मदत
युनिसेफद्वारे स्थलांतरित कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या जीवन रथ प्रकल्पासही नाविन्यता सोसायटीकडून सहकार्य करण्यात आले. जास्तीत जास्त स्थलांतरित लोकांपर्यंत पोहोचून त्यांना अन्न व जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. वेगवेगळ्या रेल्वे स्थानक आणि टोलनाक्यांवर सुमारे १.५ कोटी रुपये किंमतीच्या मदत साहित्याचे वाटप करण्यात आले. यात श्रमिक एक्स्प्रेस आणि राज्य परिवहन बसेसमधून प्रवास करणारे अतिथी कामगार आणि त्यांचे कुटुंबीयांना थेपला, शिरा, कुकीज, बिस्किटे, ताक, पाणी, औषधे आणि पादत्राणे इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.
सातारा ; जिल्ह्यात 28 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, 185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह
राज्यात १जुलैपासून ‘कृषी संजीवनी सप्ताह’ कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती
कृषिदिनी कृषिमंत्र्यांसह अधिकारी, शास्त्रज्ञ नवीन तंत्रज्ञान पोहोचविणार शेतकऱ्यांच्या बांधावर
मुंबई, दि. २६: राज्यात कृषि दिनानिमित्त ‘कृषी संजीवनी सप्ताह’ साजरा करण्यात येणार असून या काळात कृषिमंत्र्यांसह अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करीत दि.१ ते ७ जुलै दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दि.१ जुलै रोजी कृषिदिन साजरा केला जातो. यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सप्ताहात घ्यावयाच्या कार्यक्रमांबाबत नियोजन करण्यासाठी काल कृषिमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
कृषी तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते त्यासाठी कृषि विभागातील अधिकारी – कर्मचारी, शास्त्रज्ञ आणि कृषि विस्तार यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत कृषि विद्यापीठे, केंद्रीय संशोधन संस्था यांनी संशोधित केलेल्या अद्ययावत कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. त्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश कृषिमंत्री श्री. भुसे यांनी दिले आहेत.
या सप्ताहांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी दररोज किमान एका गावातील तर उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावांतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे आहे, असे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.
या सप्ताहामध्ये गावात बैठक आयोजित करतानाच शेतकऱ्यांनी राबविलेल्या कृषिविषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांनादेखील भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. एम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी मोहीम हाती घ्यावी. पुरस्कारप्राप्त, प्रयोगशील शेतकरी तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांचे तालुकास्तरीय कार्यक्रमात व्याख्यान आयोजित करावे, कृषि विषयक योजना, पतपुरवठा याबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती मोहिम हाती घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
वीज बिल विषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करा-ऊर्जामंत्री
लॉकडाउनच्या काळातील एकत्रित वीज बिलामुळे ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम तातडीने दूर करण्यासाठी डॉ. राऊत यांनी सदर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. महावितरणच्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill या लिंकवर ग्राहकांनी वीज बिल तपासून घ्यावे आणि शंका असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून समस्येचे निवारण करावे असे आवाहन ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे. महावितरण वीज ग्राहकांचे समाधान करण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
यासोबतच, ग्रामीण व शहरी भागातील लोकप्रिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांचा सर्वसमावेशक स्वतंत्र व्हॉट्सएप ग्रुप उप विभागीय अधिकारी स्तरावर तयार करून त्यावर वीज बिलाची संपूर्ण माहिती देऊन वीज विषयक समस्या/शंकांचे संपूर्ण समाधान करावे, त्यांचे सोबत वेबिनार आयोजित करून संवाद साधावा असे त्यांनी सुचविले.
“शासन आपल्या दारी” या संकल्पनेनुसार, शहरी भागात महत्त्वाच्या/मोक्याच्या ठिकाणी तर ग्रामीण भागात आठवडी बाजाराच्या दिवशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बाजाराकरिता येत असतात, तेथील नजीकच्या हॉल/कार्यालयात सामाजिक अंतराचे पालन करून विशेष शिबीरे/ग्राहक मेळावे घेऊन वीज ग्राहकांचे समाधान करावे, तसेच तक्रारींचे निरसन करण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांबाबत विविध प्रसारमाध्यमे, सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना ऊर्जामंत्र्यांनी दिल्या आहेत.
महावितरण मुख्यालयाने या संदर्भात राज्यातील सर्व मुख्य अभियंत्यांना पत्राद्वारे कळविले असून या माध्यमातून राज्यातील वीज ग्राहकांचे लवकरात लवकर समाधान होण्यास हातभार लागेल असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला
सातारा; लॉकडाऊनमधील वीजबील माप करा ; भारतीय मराठा संघाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
सातारा :दि.२६ लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या कालावधीत आलेलं वीज बिल माफ करावं, अशी मागणी भारतीय मराठा संघाने पत्ररद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.अशी माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाशदादा पवार यांनी "कुमजाई पर्व"शी बोलताना दिली
राज्यात वीज बिलाबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. लाॅकडाऊनच्या काळात तीन महिन्यातलं भरमसाठ बिल आलं आहे, त्यामुळे लोकांची नाराजी आहे. त्यामुळेच लाॅकडाऊनमध्ये तीन महिन्यात आलेलं वीज पूर्णपणे माफ करावं, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जनता घरी आहे. अनेक जणांचे ‘वर्क फ्रॉम होम’ असल्यामुळे दिवसाचे नऊ-दहा तास कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि तत्सम इलेक्ट्रिक उपकरणे चालू असतात. त्यातच उन्हाळ्यात पंखे आणि एसी यांचाही वापर दिवसभर होत असल्याने वीज बिल वाढले आहे.
आधीच कोरोनात रोजगाराचं संकट, त्यात वीज बिल जास्त आल्यानं अनेकांवर मोठं संकट ओढवलं आहे. लॉकडाऊनच्या काळात विजेचा घरगुती वापर जास्त झाला आहे. शिवाय विजेचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना विजेचं बिल जास्त आलं आहे.
दुसरीकडे, विजेचा वापर झाला नसतानाही अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारले जात असल्याच्या तक्रारीही काही जण करत आहेत. त्यामुळे वीज बिल पाहूनच अनेकांना मोठा ‘शॉक’ बसला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली.
दरम्यान, जास्त वीज बिल आलेल्या ग्राहकांना महावितरणकडून बिलाचे हप्ते पाडून देण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.
शुक्रवार, २६ जून, २०२०
कराड येथे 3 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
गुरुवार, २५ जून, २०२०
सरपंच, उपसरपंच मानधन भेटले नाही तर त्वरित नोंदणी करा
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन
मुंबई, दि. २५ : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे.राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे.
तसेच मार्च २०२० पर्यंत नोंदणी झालेल्यांपैकी ३ हजार ८१४ सरपंचाचे व ४ हजार २८७ उपसरपंचाचे मानधन अदा करणे प्रलंबित असल्याचे दिसून येते. सर्व कार्यरत व पात्र असलेल्या सरपंच व उपसरपंचांचे मानधन तसेच मार्च २०२० पर्यंत प्रलंबित सर्व देयके अदा करणेबाबत १ जुलैपर्यंत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सर्व जिल्हा परिषदांना दिल्या आहेत.
सरपंच व उपसरपंच यांचे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत संगणक प्रणाली कार्यरत आहे. संबंधित ग्रामसेवकांमार्फत लॉगिन करून गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेनंतर राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान कार्यालयामार्फत मानधन अदा करण्यात येते.
कुंभारगाव : IDBI बँकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात मनसे चे आंदोलन
बुधवार, २४ जून, २०२०
आज 2 जणांना सोडले घरी; 148 जणांचे नमुने पाठविले तपासणीलाओझरे येथील 75 वर्षीय बाधित पुरुषाचा उपाचारा दरम्यान मृत्यू
आर्वीचे वीर जवान अक्षय यादव यांच्या कुटुंबाची गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली भेट
सातारा ; 5 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह तर 305 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीजबिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत ; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई, दि. २३ : लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी डॉ. राऊत म्हणाले, महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही.
त्यानंतरही काही शंका असल्यास ग्राहक आवश्यकतेनुसार https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवरून वाढीव वीजबिलांची पडताळणी करू शकतात. तसेच महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीजबिलांची आकारणी समजून घेता येईल. तसेच ग्राहकांना मीटर रिडींग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचे वीजबिल गेले असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिली.
डॉ. राऊत म्हणाले, लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीज बिल देण्यात आले. मात्र या कालावधीत महावितरणच्या आवाहनानुसार स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत.
आता जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रिडींग घेईपर्यंत एकूण वीजवापराचे एकत्रित व अचूक बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. या बिलामध्ये ग्राहकांवर एका पैशाचाही भुर्दंड बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांनी एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येत आहे, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितले.
यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे आणि महावितरणचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाने मृत्यू झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई, दि. २४ : अखंडित वीज उत्पादनाचे कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे.
महानिर्मितीमध्ये विविध कंत्राटदारामार्फत बाह्यस्त्रोताद्वारे कार्यरत असणारे कंत्राटी कामगार तसेच सुरक्षारक्षक यांचा मृत्यूदेखील कोरोनामुळेच झाल्यास त्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे अनुदान सहाय्य पुरवण्यात येणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभाग गंभीर असून, त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
महानिर्मितीमध्ये तांत्रिक तसेच अतांत्रिक संवर्गांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू असेल.
ह्याकरिता, मृत्यूचे कारण हे कोविड-१९ विषाणूशी संबंधित असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र शासकीय/पालिका/महानगरपालिका/आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये/प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात आलेले असावे. सदर सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबत अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार - गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई दि. २४ - सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे.
ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे.यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेतअसे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी या प्राप्त होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.
ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचनासुद्धा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली..
मंगळवार, २३ जून, २०२०
गुणवत्तापूर्ण बि-बियाणे आणि खते मिळावे यासाठी कृषी विभाग दक्ष;खत विकणाऱ्यांनी साठा आणि दर याचे फलक दर्शनी भागात लावावेत - कृषिमंत्री दादासाहेब भुसे
सातारा ; बरे झालेल्या 10 जणांना आज दिला डिस्चार्ज;218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
तळमावले ; मुख्यमंत्री कार्यालयाकडून डाॅ.संदीप डाकवे यांना आभाराचा मेल
सोमवार, २२ जून, २०२०
सातारा ; 20 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह
खुशखबर ; कोरोनावर औषध आलं फक्त ₹ १०३/-
नवी दिल्ली | संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूविरूद्ध लढाई लढत आहे. देशातील शेकडो शास्त्रज्ञ आणि तज्ञ कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांना आतापर्यंत यश आलेले नाही. मात्र, आता या प्राणघातक व्हायरसबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूचे नवीन औषध लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. आणि या औषधाच्या टॅबलेटसाठी तुम्हाला फक्त 103 रुपये द्यावे लागणार आहे.
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटींगची मान्यता मिळाल्यानंतर, औषध कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने कोरोना विषाणूमुळे ग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी अँटीवायरल औषध फॅव्हिपायरवीर 'फॅबीफ्लू' टॅबलेटची निर्मिती केली आहे.
" हे औषध विषाणूची लक्षणे चार दिवसात वेगाने कमी करते आणि शरीरात रेडिओलॉजिकल सुधार आणते. औषध निर्मात्याने म्हटले आहे की कोरोना व्हायरस पीडित व्यक्तींमध्ये फेव्हपीरवीर 88 टक्के वाढ दर्शविली आहे.
प्रिस्क्रिप्शनच्या आधारे हे औषध रुग्णाला दिवसातून दोनदा (प्रथम डोस) 1800 मिलीग्राम दिले जाईल आणि त्यानंतर दररोज 800 मिलीग्राम दोनदा दिले जाईल. ते तयार करणार्या कंपनीच्या म्हणण्यानुसार हे औषध रुग्णालये आणि मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल. भारतात सुद्धा या औषधाला मंजूरी मिळाली असून मुंबईमधील एका कंपनीने शुक्रवारी सांगितले की या औषधाची निर्मिती व विक्री करण्यासाठी भारतीय कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीजीसीआय) परवानगी मिळाली आहे. कंपनीने म्हटले आहे की कोरोनावर उपचार करणारी फॅबीफ्लू ही पहिली फूड फेव्हपीरवीर औषध आहे, ज्यास मान्यता मिळाली आहे.
रविवार, २१ जून, २०२०
जेव्हा कृषिमंत्री सामान्य शेतकरी बनून खत विक्री दुकानात जातात तेव्हा...
औरंगाबाद: शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळतायेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे आज स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेले. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर कृषीमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला. औरंगाबाद येथील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी दिले.
खतांचा साठा मुबलक असतानाही जर दुकानदार शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा देणार नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा देतानाच गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यांमध्ये अधिक प्रभावीपणे कारवाई करायची गरज असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
औरंगाबाद येथे युरिया मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज दुपारी औरंगाबाद शहराला अचानक भेट दिली. जिल्हा यंत्रणेला न कळवता ते थेट बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायझर या दुकानात स्वत: कृषीमंत्री सामान्य शेतकरी म्हणून गेले. त्यांनी दुकानदाराकडे १० गोणी युरिया मागितला. त्यावर युरिया शिल्लक नसल्याचे दुकानदाराने सांगितले. १० ऐवजी पाच गोण्यांची मागणी केल्यावरही दुकानदाराने युरिया दिला नाही.
दुकानामध्ये शिल्लक साठ्याच्या फलकावर युरीया शिल्लक असल्याचे निदर्शनास आणून देतानाच स्टॉक रजिस्टरची मागणी कृषीमंत्र्यांनी केली. ते घरी असल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यानंतर कृषीमंत्र्यांनी जिल्हा कृषि अधीक्षकांना दुकानात बोलावून घेतले. युरिया शिल्लक असतानाही तो शेतकऱ्यांना दिला जात नाही यावर कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी तीव्र नाराजी दर्शविली. दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केल्यानंतर दुकानात युरीयाच्या १३८६ पिशव्या शिल्लक असल्याचे आढळून आले. या दुकानदारावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या प्रकाराने व्यथीत झालेल्या कृषीमंत्र्यांनी औरंगाबाद येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना दिल्या आणि दुकानातूनच कृषी विभागाच्या सचिवांना दूरध्वनीकरून यंत्रणांनी अधिक प्रभावी कार्यवाही करण्याची गरज असल्याच्या सूचनाही दिल्या. राज्यभरातील कृषी निविष्ठा दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करू नये, शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे याबाबी खपवून घेतल्या जाणार नाही, अशा इशाराही कृषीमंत्र्यांनी दिला आहे.
ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा !
महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन
मुंबई, दि. २१ – सध्याच्या काळात बरेच ज्येष्ठ नागरिकसुद्धा बँकांचे व्यवहार, प्रत्यक्ष बँकेत जाऊन करण्यापेक्षा इंटरनेट बँकिंगद्वारे करणे पसंत करीत आहेत. ऑनलाईन बँकिंग व्यवहार करत असताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.
ऑनलाइन आर्थिक व्यवहार सोबतच इंटरनेटचा वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत पण वाढ होत आहे. महाराष्ट्र सायबर सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती करते की, आपण कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
बरेच ज्येष्ठ नागरिक सध्या फेसबुकचा वापर करायला पण शिकत आहेत व आपल्या परिचयातील जुन्या व्यक्तींना फेसबुकवर शोधून add करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवर स्वतःची सर्व माहिती देणे टाळावे तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फेसबुकवर friend request स्वीकारू नये. सायबर गुन्हेगारांच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक हे सर्वात सोपे टार्गेट असतात, त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी इंटरनेट बँकिंग व सोशल मीडिया वापरताना सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.
तक्रार नोंदवा
जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन आर्थिक किंवा अन्य कोणत्या प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी लगेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंद करावी, तसेच या गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही (website) द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.
सातारा ; पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी बचतगटांना तुर व खते वाटप
काळगाव ; शिवारात कोळपणीची धांदल; शिवार फुललाय माणसांनी
कोरोना संकटाचे भान ठेऊन,आरोग्य जपत गणेशोत्सव साजरा करूया - मुख्यमंत्री
कोरोना विषाणूच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव कोविड-१९च्या आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा. यंदाचा उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा होत असला, तरी पुढील वर्षी मात्र गेल्यावर्षीच्या उत्सवापेक्षा अधिक उत्साहात आणि भव्य-दिव्य असा साजरा करण्याचे प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्याच्या शासनाच्या प्रय़त्नांना सर्वतोपरी सहकार्य करू, अशी भूमिकाही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली. मुंबईतील गणेश मंडळांची समाजाभिमुख उपक्रमात योगदान देण्याची परंपरा आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात मंडळे आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्य मेळावे, शिबिरे आदी उपक्रमांद्वारे यावर्षीही हिरिरीने पुढे राहतील, असा विश्वास मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला, यासाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी गणेश मंडळांच्या या वैशिष्ट्यांचा पुनरूच्चार करतानाच, त्यांचे कौतुकही केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना विषाणूचे सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्वरुपावर मर्यादा येईल. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांनी मूर्तींची उंची लहान ठेवण्याबाबत विचार करावा. प्रत्येक छोट्या – मोठ्या गोष्टींचे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांच्या अंगाने नियोजन करावे. उत्सव मंडपही लहान असावेत. सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्यविषयक सर्व काळजी घेण्याचे नियोजनही याठिकाणी करावे लागेल. विषाणूचे संकट टळल्यानंतर, पुढच्या वर्षी हाच गणेशोत्सव गतवर्षीच्या उत्सवाच्या कितीतर पट उत्साहाने साजरा करता येईल. हा विश्वास बाळगून यंदाचा उत्सव साजरा करूया.
चर्चेत सहभागी समितीचे पदाधिकारी तसेच सदस्यांनीही आरोग्य शिबारे, विषाणू प्रादुर्भावाबाबत जनजागृती तसेच वैद्यकीय सेवा-सुविधा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रमांचे नियोजन करू. मूर्तींच्या उंचीबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्यास, त्यांचे पालन केले जाईल. कोरोना विषाणू आणि आरोग्यविषयक आणि स्वच्छतेबाबत शासनस्तरावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केले जाईल, अशी भूमिका मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी मूर्तीची उंची, उत्सवाचे स्वरूप यांसह पारंपारिक विसर्जन मार्ग आणि गणेश विसर्जन व्यवस्था या अनुषंगानेही चर्चा झाली.
सातारा ; 14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह
कोणत्या शहरात किती वाजता सूर्यग्रहण दिसणार?
रविवारी सकाळी 10 वाजून 21 मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. दुपारी 12 वाजून 01 मिनिटांपासून 12 वाजून 02 मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल. तर दुपारी 1 वाजून 48 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.
का आहे खास ?
संपूर्ण भारतातून दिसणारं सूर्यग्रहण हे अनेक कारणांनी खास मानलं जात आहे. विशेष म्हणजे दरवर्षी 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. यानतंर उत्तरायन संपून दक्षिणायन सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. तर जगभरात 21 जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. तसेच पुढची जवळपास अकरा वर्ष भारतातून कंकणाकृती ग्रहण दिसणार नाही.
कोणत्या शहरात किती वाजता सूर्यग्रहण दिसणार?
शहर - साधारण वेळ
- मुंबई - सकाळी 10.01 ते दुपारी 1.28
- पुणे - सकाळी 10.03 ते दुपारी 1.31
- नाशिक - सकाळी 10.04 ते दुपारी 1.33
- नागपूर - सकाळी 10.18 ते दुपारी 1.51
- औरंगाबाद - सकाळी 10.07 ते दुपारी 1.37
सूर्यग्रहण कधीही साध्या डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी फिल्टर चष्मे, फिल्म आणि दुर्बिणीचा वापर करावा. फोटो काढताना किंवा दूर्बिणीतून सूर्यग्रहण पाहताना योग्य फिल्टरचा वापर करावा. हे सूर्यग्रहण भारताप्रमाणेच आफ्रिका, दक्षिण पूर्व यूरोप, मिडलइस्ट, इंडोनेशिया, मायक्रोनेशिया येथून दिसेल.
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...