मंगळवार, २३ जून, २०२०

तळमावले ; मुख्यमंत्री कार्यालयाकडून डाॅ.संदीप डाकवे यांना आभाराचा मेल

मुख्यमंत्री कार्यालयाकडून डाॅ.संदीप डाकवे यांना आभाराचा मेल

तळमावले/वार्ताहर
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांना आभाराचा मेल पाठवण्यात आला आहे.
लाॅकडाऊनच्या काळात ‘एक कलाकृती कोरोनाविरुध्दच्या योद्यांसाठी’ हा उपक्रम पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून मिळालेला मोबदला थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये त्यांनी पाठवला. या उपक्रमाचे पैसे पाठवल्यानंतर डाकवे यांना आॅनलाईन सर्टीफिकेट देखील मिळाले होते. याची दखल सीएम कोविड फंड कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. यामध्ये Dear Sir, Thank you for the donation made towards chief Ministers Relief Fund- COVID 19. Regards, Accounts Officer, CMRF असे म्हटले आहे. या आभाराच्या मेलमुळे संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे खुश झाले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या फंडात दिलेल्या खारीच्या वाट्यााची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेतल्यामुळे काम करण्यास आणखी ऊर्जा मिळाली असल्याचे मत डाकवे यांनी व्यक्त केले आहे.

1 टिप्पणी:

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...