सोमवार, २९ जून, २०२०

*7 नागरिकांना आज दिला डिस्चार्ज ; एक मृत व्यक्तीसह 535 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

*7 नागरिकांना आज दिला डिस्चार्ज ; एक मृत व्यक्तीसह 535 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*  

सातारा दि. 28 : विविध रुग्णालय व कोरोना केंअर सेंटरमध्ये  उपचार घेऊन कोरोनातून बऱ्या झालेल्या 7 नागरिकांना आज 10 दिवसानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये *मुंबई* चेबूर येथील 51 वर्षीय महिला
*जावली* तालुक्यातील गांजे यैथील 45 वर्षीय महिला
*कोरेगाव* तालुक्यातील पवारवाडी येथील  48 वर्षीय पुरुष, 38 व 21 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक   
*पाटण* तालुक्यातील धामणी येथील 21 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
*535 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 15, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 84, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 126, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 21, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 12, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 56, शिरवळ येथील 58, रायगाव येथील 25, पानमळेवाडी येथील 12, मायणी येथील 6, महाबळेश्वर येथील 20, पाटण येथील 67, दहिवडी येथील 33 असे एकूण 535  जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
*37 वर्षीय मृत पुरुषाचा संशियत म्हणून नमुना पाठविला तपासणीला* 
 आज दुपारी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेल्या जैतापूर रोड देगाव सातारा येथील 37 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. कोविड संशयित म्हणून उपचार करतावेळेस त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...