रविवार, २१ जून, २०२०

सातारा ; पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी बचतगटांना तुर व खते वाटप

पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी बचतगटांना तुर व खते वाटप
सातारा दि. 21 : कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा विकास कार्यक्रमांतर्गत कृषी बचतगटांना तुर वाटप व बांधावर खते पोहोच वाटप राज्याचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राधान्य कुटुंबाचे 207 लाभार्थींना मोफत धान्य वाटपही करण्यात आले.
कोरेगाव तालुक्यातील मौजे साप येथे आयोजित केलेल्या कार्यकमास कोरेगाव तहसीलदार रोहिणी शिंदे,  राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, साप ग्रामपंचायतीच्या सरपंच शशिकला शेडगे, उपसरपंच नागेश अडसुळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे इतर सदस्य, ग्रामसेवक संतोष पाटील, मंडळाधिकारी श्री.सावंत, तलाठी देविदास जाधव, कृषी सहायक श्री भोसले आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...