बुधवार, २४ जून, २०२०

आज 2 जणांना सोडले घरी; 148 जणांचे नमुने पाठविले तपासणीलाओझरे येथील 75 वर्षीय बाधित पुरुषाचा उपाचारा दरम्यान मृत्यू

आज 2 जणांना सोडले घरी; 148 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
ओझरे येथील 75 वर्षीय बाधित  पुरुषाचा उपाचारा दरम्यान मृत्यू

सातारा दि. 23 : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा दाखल असलेल्या  स्टाफ नर्स, खिंडवाडी सातारा येथिल 44 वर्षीय महिला व कोविड केअर केंद्र खावली येथील दाखल असलेल्या निशिगंधा कॉलनी बारवकर नगर, सातारा येथील 42 वर्षीय पुरुष असे एकूण 2 रुग्णांना  आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
148 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातरा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 36, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 14, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 8, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 6, वाई  11, शिरवळ 13, पानमळेवाडी 3, दहिवडी 39 असे एकूण 148 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. 
उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू 
तसेच दि. 2 जून रोजी मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या ओझरे ता. जावली येथील 75 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...