रविवार, २१ जून, २०२०

कोणत्या शहरात किती वाजता सूर्यग्रहण दिसणार?

मुंबई : यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 
आज (21 जून) रविवार संपूर्ण भारतातून दिसणार आहे. भारताच्या काही भागात ते कंकणाकृती दिसणार असून काही भागात ते खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी आणि सर्वात लहान रात्री ही खगोलीय घटना घडणार आहे. 
या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. तर उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे जेथे महाभारत युद्ध झाले त्या कुरुक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

रविवारी सकाळी 10 वाजून 21 मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. दुपारी 12 वाजून 01 मिनिटांपासून 12 वाजून 02 मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल. तर दुपारी 1 वाजून 48 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.

का आहे खास ?

संपूर्ण भारतातून दिसणारं सूर्यग्रहण हे अनेक कारणांनी खास मानलं जात आहे. विशेष म्हणजे दरवर्षी 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. यानतंर उत्तरायन संपून दक्षिणायन सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. तर जगभरात 21 जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. तसेच पुढची जवळपास अकरा वर्ष भारतातून कंकणाकृती ग्रहण दिसणार नाही.

कोणत्या शहरात किती वाजता सूर्यग्रहण दिसणार?

शहर - साधारण वेळ

  • मुंबई - सकाळी 10.01 ते दुपारी 1.28
  • पुणे - सकाळी 10.03 ते दुपारी 1.31
  • नाशिक - सकाळी 10.04 ते दुपारी 1.33
  • नागपूर - सकाळी 10.18 ते दुपारी 1.51
  • औरंगाबाद - सकाळी 10.07 ते दुपारी 1.37

सूर्यग्रहण कधीही साध्या डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी फिल्टर चष्मे, फिल्म आणि दुर्बिणीचा वापर करावा. फोटो काढताना किंवा दूर्बिणीतून सूर्यग्रहण पाहताना योग्य फिल्टरचा वापर करावा. हे सूर्यग्रहण भारताप्रमाणेच आफ्रिका, दक्षिण पूर्व यूरोप, मिडलइस्ट, इंडोनेशिया, मायक्रोनेशिया येथून दिसेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...