साताराजिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यपदी 21 जणांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीत अनेक दिग्गजांचा समावेश आहे. या निवडीची घोषणा अर्थसंकल्पीय सभेत अध्यक्ष उदय कबुले यांनी केली.
सातारा जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलानंतर विषय समित्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.
मागील सभेत सदस्यांना निवडणूक कार्यक्रम वेळेत न पोहोचल्याने निवडीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अर्थसंकल्पीय सभेत या निवडी होणार होत्या. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे या निवडी बिनविरोध झाल्या. अध्यक्ष उदय कबुले यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मंगळवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीत सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब झाले होते.उदय कबुले यांनी अर्थसंकल्पीय सभेत या निवडीची घोषणा केली.
स्थायी समितीवर माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, दीपक पवार, जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीवर वनिता गोरे, कृषी समितीवर माजी शिक्षण सभापती राजेश पवार, अनंत तांबे, समाजकल्याण समितीवर प्रवीण ताटे, सौ. संगीता चव्हाण, शिक्षण समितीवर शिवरुपराजे खर्डेकर, वसंतराव मानकुमरे, बांधकाम समितीवर मनोज पवार, अर्थ समितीवर कविता जगदाळे, मनोज पवार, रेखा घार्गे, अंजना कदम, पशुसंवर्धन समितीवर सौ. जयश्री गिरी, वसंतराव मानकुमरे, आरोग्य समितीवर राजाभाऊ शेलार, राजेश पवार, राजाभाऊ जगदाळे, महिला व बालकल्याण समितीवर सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर सदस्यांनी अभिनंदनपर भाषणे केली. ज्येष्ठ सदस्य भीमराव पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जिल्हा परिषदेत राबवला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा